मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांचा दि.२५/०२/२०२५ रोजीचा दौरा कार्यक्रम..

सह संपादक- रणजित मस्के
सांगली
मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर श्री. सुनिल फुलारी सर हे दि. २०/०२/२०२५ ते दि. २५/०२/२०२५ चे दरम्यान सांगली पोलीस दलाचे वार्षिक निरीक्षण/तपासणी अनुषंगाने सांगली जिल्हा दौऱ्यावर आहेत.


दि. २५/०२/२०२५ रोजी सकाळी पोलीस मुख्यालय सांगली येथे वार्षिक तपासणी कवायत परेड संपन्न झाली. सदर परेड दरम्यान स्कॉड ड्रील, प्रशिक्षण वर्ग, बीडीडीएस प्रात्यक्षिक, जमाव विसर्जन प्रात्यक्षिक घेण्यात आले. त्यानंतर मा. आय. जी. सरांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांची वृंद परीषद घेवून त्यांच्या समस्या जाणून घेवून त्या सोडविण्याबाबत संबधितांना आदेशित केले.





मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर श्री. सुनिल फुलारी सर यांनी पोलीस अधीक्षक सांगली, अपर पोलीस अधीक्षक सांगली व सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा पर्यवेक्षीय कामकाज आढावा घेतला तसेच सांगली जिल्हयातील सर्व पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी, सर्व शाखाचे प्रभारी अधिकारी यांची गुन्हे आढावा बैठक घेण्यात आली. गुन्हे आढावा बैठकीमध्ये सन २०२४ मधील गुन्हयांची माहिती घेवून त्याबाबत सुचना व मार्गदर्शन केले.
गुन्हे आढावा बैठकीवेळी सांगली जिल्हयात चोरीच्या दाखल असलेल्या गुन्हयातील आरोपीकडून जप्त केलेला किमती मुद्देमाल, चोरी केलेली वाहने फिर्यादीना मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर श्री. सुनिल फुलारी सर यांचे हस्ते परत देण्यात आली. यावेळी फिर्यादी नागरिकांनी त्यांचा गेलेला मुद्देमाल परत मिळाल्याबाबतचा आंनद व्यक्त करून पोलीसांचे आभार मानले.
सदर गुन्हे आढावा बैठकीदरम्यान मा. I G सर कोल्हापूर यांनी सांगली जिल्ह्यातील पोलीस ठाणे व शाखांचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रशासपत्र देऊन गौरव करण्यात आला असून त्यांना पुढील काळात अशाच प्रकारचे उत्कृष्टपणे कर्तव्य बजावून कामगिरी करणेबाबत शुभेच्छा दिलेल्या आहेत.