लोणी काळभोर पोलीसांनीअट्टल घरफोडी गुन्हेगार अतिक लिडकर याला अटक करुन त्याचेकडुन एकुण ६ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त..

सह संपादक -रणजित मस्के
पुणे

मुद्देमाल केला केला जप्त.
दिनांक १२/०७/२०२५ रोजी फिर्यादी हे त्यांचे राहते घरास कुलुप लावुन त्यांचे कुटुंबीयांसह बार्शी येथे गेले होते. दि.१४/०७/२०२५ रोजी ते घरी परत आले असता, त्यांचे राहते घराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत तसेच त्यांचे घरातील लोखंडी कपाटाचे व आतील तिजोरीचे लॉक उचकटलेले व त्यातील सोन्याचे दागीने, रोख रक्कम व मोबाईल फोन चोरीस गेल्याचे त्यांचे निदर्शनास आले. त्याबाबत लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे दि.१५/०७/२०२५ रोजी मु.र. नं. ३२१/२०२५ भा.न्या.सं.क.३३१ (३) ३३१ (४),३०५ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला होता.
दाखल गुन्हयाचे तपासादरम्यान लोणी काळभोर पोलीस स्टेशनकडील पोलीसांनी, अज्ञात आरोपीबाबत गोपनिय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त करणेचे दृष्टीने प्रभावी प्रयत्न केले. तपासादरम्यान लोणी काळभोर पोलीस स्टेशन कडील म्पास पथकाचे पोलीस अंमलदार पाटील व कुदळे यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत प्राप्त झाले माहितीचे अनुषंगाने, लोणी काळभोर पोलीसांनी तांत्रीक पुराव्यांची पडताळणी करुन, अज्ञात आरोपीचे ठाय ठिकाणाबाबत खात्रीशीर माहिती प्राप्त केली. त्यावरुन सदर चोरी इसम नामे प्रतिक हिराचंद लिडकर वय ३१ रा. शिवमंदिर शेजारी रामनगर, खंडवा, ता.जि. खंडवा, मध्यप्रदेश राज्य याने केली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर वरिष्ठांचे मार्गदर्शन व परवानगीने लोणी काळभोर पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे स्वतंत्र पथक खंडवा, मध्यप्रदेश येथे तात्काळ स्वाना झाले. त्यांनी अतिशय कौशल्यपूर्णरित्या आरोपीची सदर भागातील रहिवासीतांकडून माहिती घेवुन त्याचेवर निरंतर पाळत ठेवली. आरोपी राहत असलेल्या भागात सापळा रचुन आरोपीस लोणी काळभोर पोलीसांनी खंडवा, मध्यप्रदेश येथुन दि.२३/०७/२०२५ रोजी ताब्यात घेवुन, त्यास दाखल गुन्हयात अटक केले. नमुद अटक आरोपीविरुध्द मध्यप्रदेश व महाराष्ट्र राज्यात चोरी, घरफोडी, जबरी चोरी अशा प्रकारचे एकुण १५ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
वरिल नमुद अटक आरोपीकडे चौकशी करुन आरोपीने गुन्हयातील चोरुन नेलेले सोन्याचे दागीने रोख रक्कम व मोबाईल हॅन्डसेट असा एकूण ६,३९,९००/-रु.कि.चा ऐवज आरोपीकडून जप्त केला आहे. अशाप्रकारे अतिशय कौशल्यपुर्ण व प्रभावीरित्या तपास करुन लोणी काळभोर पोलीसांनी घरफोडी सारखा गंभीर गुन्हा, बाहेर राज्यातील आरोपी असताना देखील, केवळ ९ दिवसांचे आत उघडकीस आणुन, गुन्हयातील चोरीस गेलेला १०० टक्के माल आरोपीकडुन जप्त केला आहे.
सदरची उत्कृष्ठ कामगिरी मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ०५, डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, श्रीमती अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती स्मिता पाटील, सहा. पोलीस निरीक्षक श्री. कृष्णा बाबर, पोलीस अंमलदार सातपुते, वणवे, भोसले, माने, जगदाळे, देवीकर, विर, पाटील, कुदळे, कुंभार, गाडे, कर्डीले, सोनवणे, शिरगिरे, वडस, थोरात अमोल जाधव यांनी केली आहे.