लोणंद पोलीस ठाणे बसस्टॉण्डमध्ये गर्दीचा फायदा घेवुन महीलांचे गळयातील सोन्याचे दागिने चोरी करणा-या आंतरजिल्हयातील सक्रीय टोळीला लोणंद पोलीसांनी केले जेरबंद…

उपसंपादक -रणजित मस्के
सातारा: (लोणंद ) :- लोणंद पोलीस ठाणे हददीत बसस्टॅण्ड लोणंद येथे महीला बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेवुन वृध्द महीलांचे गळयातील सोन्याचे दागिने चोरी केलेबाबत लोणद पोलीस ठाणेत गुन्हे दाखल झाले होते. सदर गुन्हयाचे तपासाबाबत वरीष्ठ अधिकारी यांनी सुचना दिल्या होत्या. त्या प्रमाणे लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि श्री.विशाल वायकर, व त्यांचे सहका-यांनी सदर घडणा-या गुन्हयांबाबत सीसीटीव्ही फुटेज, तांत्रीक विष्लेषनाचे आधारे यातील आरोपीनी गुन्हा करतेवेळी वापरलेली इनोव्हा कार व आरोपी निष्पन्न केले. सदर आरोपी या महीला असुन त्या उदगीर, लातुर येथून इनोव्हा कारमधुन येवुन त्यांनी लोणंद तसचे वाई, औरंगाबाद (ग्रा) कवठे महाकाळ (सांगली), सांगली शहर, नाशिक, ओतुर (पुणे), लोणीकंद (पुणे) या पोलीस ठाणे हद्दीतील एकुण १६ चोरीचे गुन्हे केलेचे निष्पन्न झालेले आहे. सदर महीला आरोपींची पोलीस कोठडी घेवुन आरोपींकडुन चोरी केलेले एकुण १० तोळे सोन्याचे दागिने, व इनोव्हा कार असा एकुण १५,४०,०००/- रु. किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींनी लोणंद पोलीस ठाणे हददीत तसेच इतर जिल्हयातील खालील प्रमाणे केलेल्या
गुन्हयाची कबुली दिली आहे.

लोणंद पो.स्टे
२८२/२२ कलम ३७९
औरंगाबाद (ग्रा) पो.स्टे.
१०२/२२ कलम ३७९
लोणंद पो.स्टे
४३/२३ कलम ३७९
कवठेमहाकाळ पो.स्टे
७/२३ कलम ३७९
लोणंद पो.स्टे
४९/२३ कलम ३७९
त्रिंबकेश्वर पो.स्टे.
०६/२३ कलम ३७९
लोणंद पो.स्टे
५०/२३ कलम ३७९
सांगली पो.स्टे.
लोणीकंद पो.स्टे.
७१०/२२ कलम ३७९
वाई पो.स्टे.
२७/२२ कलम ३७९
०४/२३ कलम ३७९
वाई पो.स्टे.
४५५/२२ कलम ३७९
लोणीकंद पो.स्टे वाई पो.स्टे.
२९/२३ कलम ३७९ १५
लोणीकंद पो.स्टे
०५/२३ कलम ३७९
७/२३ कलम ३७९
३७/२३ कलम ३७९
ओतुर पो.स्टे.
४७०/२२ कलम ३७९
लोणीकंद पो.स्टेशन
सदर गुन्हयाचा तपास मा.पोलीस अधीक्षक साो सातारा श्री. समीर शेख, मा.अप्पर पोलीस अधीक्षक
साो. श्री. बापु बांगर, मा.उपविभागीय पोलीस अधीकारी फलटण साो. श्री. तानाजी बरडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि श्री विशाल वायकर, पोउनि. गणेश माने, मपोउपनि स्वाती पवार,पो.हवा… संतोष नाळे, अतुल कुमार, पो.ना. श्रीनाथ कदम, सर्जेराव सुळ, अमोल पवार, फैय्याज शेख, अभिजित घनवट, अविनाश शिंदे, केतन लाळगे, प्रमोद क्षिरसागर, चालक विजय शिंदे, विठठल काळे, प्रिया दुरगुडे,अश्विनी माने, तसेच उदगीर पो.स्टे. लातुर कडील पोलीस अंमलदार पुलेवाड यांनी कारवाई केली असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधिक्षक सो, सातारा व श्री. बापु बांगर अपर पोलीस अधिक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com