जिल्हा परिषद पालघर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी…

प्रतिनिधी. मंगेश उईके
पालघर :- आज दिनांक१/ ८/२०२४रोजी जिल्हा परिषद पालघर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा गंगाधर निवडंगे, मुख्य लेखा वित्त अधिकारी धनराज पांडे, शिक्षणाधिकारी (योजना) शेषराव बडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी उपस्थित होते.
अण्णाभाऊ साठे यांच्यावर कार्ल मार्क्स आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव होता. ते समाजसुधारक आणि साहित्य लेखक देखील होते. त्यांनी अनेक कथा, कादंबरी आणि कवितांचे लिखाण केले. अण्णा भाऊ साठे हे महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. अण्णा भाऊ साठेंच्या साहित्याने अनेकांना प्रेरणा दिली. त्यांचे प्रेरणादायी विचार सुद्धा सर्वांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत.
त्यांनी पोवाडे, गीत आणि लावण्यांच्या माध्यमातून आपले विचार जनतेपर्यंत पोहोचवले. त्यांना लोकशाहीर पदवी दिली. त्यांनी मराठी भाषेत 35 कादंबऱ्या लिहिल्या. त्यांचे निधन 18 जुलै 1969 रोजी झाले.
अशा थोर महापुरुषाची जयंती आज साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com