हातात लोखंडी रॉड व एसटी चालकाला दगड फेकून मारल्याप्रकरणी बिजघर तंटामुक्त अध्यक्ष पंढरीनाथ बैकर यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

उपसंपादक- राकेश देशमुख
महाड:
शुक्रवार दिनांक २२ सप्टेंबर २०२३ रोजी एसटी महामंडळ महाड डेपोचे एसटी चालक बाबासाहेब गोविंद राजे महाडिक वय ४८ हे आपल्या ताब्यातील एसटी बस क्रमांक एम एच 14 बीटी 2598 ही घेऊन मौजे सापे वामने मार्गे आंबिवली गावच्या हद्दीत प्रवाशाला उतरवण्याकरिता एसटी बस थांबवली असता त्याच वेळी पंढरीनाथ विठ्ठल बैकर वय वर्ष 60 व्यवसाय तंटामुक्त अध्यक्ष बिजघर तालुका महाड हे त्याच्या ताब्यातील वॅगनर कार गाडी क्रमांक एम एच 06 बी यु 1710 ही देऊळ कोंड बाजू कडून महाड बाजूकडे स्वतः चालवीत घेऊन घटनास्थळी आले.

तेथील रस्ता अरुंद असल्याने कार चालक याने त्याची गाडी मागे घेतली व एसटी चालक यांनी देखील एसटी बस साईड देण्यासाठी पुढे घेतली कोणतेही कारण नसताना कार चालक पंढरीनाथ विठ्ठल बैकर यांनी कार मधून लोखंडी रॉड घेऊन एसटीच्या दरवाजावर मारु लागले व मोठ मोठ्याने आरडाओरडा करून एसटी चालकाला दगड फेकून मारला.

याप्रकरणी महाड तालुका पोलीस ठाण्यात तंटामुक्त अध्यक्ष पंढरीनाथ विठ्ठल बैकर यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 353, 336, 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

या घटनेचा अधिक तपास महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर पी मायने व सहाय्यक पोलीस निरीक्षक एस बी अवसरमोल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आशिष नटे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com