दादरच्या मीनाताई ठाकरे फुल मार्केटच्या पाठीमागील भागात असलेल्या खत प्रकल्पाविरोधात स्थानिकांचे आंदोलन…

0
Spread the love

संपादक- दिप्ती भोगल

मुंबई:

दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी खत प्रकल्पातून निघणाऱ्या विषारी वायूमुळे आजूबाजूच्या रहिवाश्यांना श्वसनाचे रोग तसेच इतर समस्यांना सामोरे जावे लागत आहे.तिथे टाकण्यात येणाऱ्या कुजलेल्या कचऱ्याचा दुर्गंधीचा त्रास तिथले रहिवासी आणि फुल व्यापाऱ्यांना तसेच ग्राहकांनाही सहन करावा लागत आहे.त्या प्रकल्पातून कुजलेल्या कचऱ्यापासून अगरबत्ती बनविण्याचा जो प्रकार होत आहे त्यामुळे हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.

प्रकल्प तिथून दुसरीकडे स्थलांतर करावा अशी मागणी वारंवार प्रशासनाकडे करूनही काही अधिकाऱ्यांच्या आर्थिक व्यवहार असल्याने प्रकल्प हलविला जात नाही असा स्थानिकांचा आरोप आहे.आंदोलन स्थळी भाजप चे स्थानिक ज्येष्ठ आमदार श्री. कालिदास कोळंबकर साहेब यांनी भेट दिली.रहिवाशी आणि व्यापारी वर्गाने त्यांना प्रकल्प त्वरित इथून हलविण्याची मागणी केली तसेच लेखी निवेदन दिले.

या विषयावर पालकमंत्री दिपक केसरकर साहेब यांना घेऊन प्रकल्पाची पाहणी करण्यात येईल तसेच स्थानिकांची मागणीनुसार प्रकल्पाबाबत निर्णय घेतला जाईल असे आश्वासन आमदार श्री.कालिदास कोळंबकर साहेब यांनी दिले.आंदोलनाचे नेतृत्व स्थानिक रहिवाश्यांतर्फे श्री.प्रमोद सावंत,श्री.जितु कांबळे तसेच व्यापाऱ्यांच्या वतीने श्री.दिनेश पुंडे यांनी केले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट