स्थानिक गुन्हे सांगली यांनीएम.आय.डी.सी. येथील खूनाचे गुन्हयातील आरोपीस केले जेरबंद

0
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

सांगली

पोलीस स्टेशन

अपराध क्र आणि कलम

फिर्यादी नाव

एम.आय.डी.सी. कुपवाड

५२/२०२५ बी.एन.एस. कलम

203 (1), રૂ (1)

शमा रियाज नदाफ, रा रॉयल सिटी मारवा आपर्टमेंट, कुपवाड, ता मिरज.

गु.घ.ता वेळ

गु.दा.ता वेळ

माहिती कशी प्राप्त झाली

दि.१४/०४/२०२५ रोजीचे २२.०० वा.चे

१५/०४/२०२५ रोजी ०५.३८ वा.

पोहेकौं / सागर लवटे

सुमारात

कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार

पोहेकों / संदीप गुस्व

मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे,

मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर,

यांचे मार्गदर्शनाखाली

पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सांगली सहा पोलीस निरीक्षक, जयदीप कळेकर, स्था. गु. अ. शाखा, सांगली पोहेकों / सागर लवटे, इम्रान मुल्ला, संदीप गुरव, मच्छिंद्र बर्डे, अमोल ऐदाळे, दन्याप्पा बंडगर, संकेत मगदुम, अतुल माने, आमसिद्धा खोत, पोना / रणजित जाधव, अनंत कुडाळकर, उदयसिंग माळी, पोशि / रोहन घस्ते

अटक दिनांक दि.१५/०४/२०२५ रोजी

मवताचे नाव

समीर रमजान नदाफ, वय ४१ वर्षे, रा रॉयल सिटी मारचा आपर्टमेंट, कुपवाड, ता मिरज.

आरोपीचे नाव व पत्ता

) सोहेल सलीम काझी, वय ३० वर्षे, रा खारे मळा चौक, कुपवाड, ता मिरज,

१ २) सोहेल ऊर्फ साबीर शरीफ मुकादम, वय मिरज. २६ वर्षे, रा बडेपिर कॉलनी, जुना मिरज रोड, कुपवाड, ता-

गुन्हयाची थोडक्यात हकीकत

दि. १४/०४/२०२५ रोजी रात्री २२.०० वा. चे सुमारास वरील आरोपी यांनी त्यांचा मित्र रेकॉर्डवरील आरोपी समीर नदाफ यास बोलावून घेवून त्यास दारु पिण्याचे वादावरून आपसात संगनमत करून समीर नदाफ याचे छातीवर, पोटावर व डोक्याच्या पाठीमागे धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला आहे. सदर बाबत वरील प्रमाणे एम.आय.डी.सी. कुपवाड पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मा. पोलीस अधीक्षक, सांगली संदीप घुगे यांनी सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी भेट देवुन सदर गुन्हा उघडकीस आणून आरोपींना ताब्यात घेणेबाबत आदेशित केले होते.

Scanned with CamScanner

सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन सदरचा खुनाच्च्या गुन्हयातील आरोपी यांना ताब्यात घेणेबाबत सुचना दिल्या.

त्या अनुशंगाने सहा पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांचे पथकामधील पोहेकों / सागर लवटे व पोहेकॉ संदीप गुरव यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराकडून बातमी मिळाली की, सदरचा खून हा मयताचे दोन मित्रांनी केला असून दोन्ही आरोपी हे बडेपीर दर्गा, जुना मिरज रोड, कुपवाड येथे थांबलेले आहेत.

नमुद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे कुपवाड येथील बडेपीर दर्गा, जुना मिरज रोड येथे जावून सापळा लावून थांबले असता दोन इसम संशयितरित्या थांबलेले दिसले. तसा त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांना सहा पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व पथकाने पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेवून त्यांना नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे १) सोहेल सलीम काझी, वय ३० वर्षे, रा खारे मळा चौक, कुपवाड, ता मिरज २) सोहेल ऊर्फ साबीर शरीफ मुकादम, वय २६ वर्षे, रा बडेपिर कॉलनी, जुना मिरज रोड, कुपवाड, ता मिरज अशी सांगितली. त्यांचेकडे सदर गुन्हयाच्या अनुशंगाने चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, समीर नदाफ हा सोहेल काझी याचे पानपट्टीवर येऊन मावा, सिगारेट घेवून त्याचे पैसे न देता निघून जात होता व पैसे मागितले नंतर दमदाटी व जीवे मारण्याची धमकी देत असे. त्याचा राग मनात धरून दि. १४/०४/२५ रोजी कुपवाड येथील पाण्याचे टाकीजवळ येथे सोहेल काझी व सोहेल मुकादम थांबले असता समीर नदाफ हा त्या ठिकाणी आला व तो दारू पिण्यासाठी पैसे मागू लागला. त्यावेळी त्यास दारु पिण्यास जावूया असे सांगून सोहेल काझी व सोहेल मुकादम यांनी समीर नदाफ यास सावळी येथील आरटीओ ऑफिसचे बाजूचे मोकळया मैदानात नेवून त्याचे छातीवर, पोटावर व डोक्याच्या पाठीमागे घारदार शखाने बार केल्याची कबुली दिली.

सदर आरोपी सोहेल काझी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचेवर एम.आय.डी.सी. कुपवाड पोलीस ठाणेस जबरी चोरी व शरिराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत.

सदर आरोपी पुढील तपास कामी एम.आय.डी.सी. कुपवाड पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आले असुन पुढील तपास एम.आय.डी.सी. कुपवाड पोलीस ठाणे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट