स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी विना परवाना विदेशी दारु विक्रीसाठी वाहतुक करणा-या इसमावर केली कारवाई

0
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

सांगली

एकुण १०,२१.५८५/- रु. चा मुद्देमाल हस्तगत.

पोलीस स्टेशन

सांगली शहर

गु.घ.ता. वेळ

दिनांक १४.०७.२०२५ रोजी १७.४० वा चे दरम्यान

अपराध क्र आणि कलम

गु.र.नं. ३७६/२०२५, महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम ६५ (ड).

गु.दा.ता. वेळ

दिनांक १४.०७.२०२५ रोजी २२.५० वा

फिर्यादी नाव

सोमनाथ सुनिल पतंगे, स्था.गु.अ. शाखा, सांगली.

माहिती कशी प्राप्त झाली

पोहेकों / अतुल माने, पोकों / विनायक सुतार, पोका / सुमित सुर्यवंशी

कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार

मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली.

मा. कल्पना बारवकर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली

यांचे मार्गर्शनाखाली

पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा,

सहा पोलीस निरीक्षक, नितीन सावंत, स्था. गु. अ. शाखा, सांगली

सहा पोलीस निरीक्षक, जयदिप कळेकर, स्था. गु. अ. शाखा, सांगली

पोहेकों / गुंडोपंत दोरकर, अतुल माने, बाबासाहेब माने, इसान मुल्ला, रणजित जाधव, पोना/ सुशिल मस्के, श्रीधर बागडी, पोकों / विनायक सुतार, सुमित सुर्यवंशी, सोमनाथ पतंगे, रुपेश होळकर.

आरोपीचे नांव पत्ता

१) अझहर दाऊद लांबे, वय ३५ वर्षे, धंदा इलेक्ट्रीशियन, रा. ५ वी गल्ली, गणेशनगर, सांगली.

१.

२१,५८५/- रु. किंमतीचा वेगवेगळ्या कंपनीच्या विदेशी दारुच्या बाटल्या.

जप्त मुद्देमाल

२. १०,००,०००/- रु. एक टोयाटो कंपनीची इनोव्हा कार तिचा आर.टी ओ क्र.एम एच १० डी.टी. ८८८६

अशी कि. जुयाकिंअं.

१०,२१,५८५/- (दहा लाख, एकविस हजार, पाचशे पंचाऐंशी रुपये मात्र)

गुन्हयाची थोडक्यात हकीकत

मा. पोलीस अधीक्षक, संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध व बिगरपरवाना दारु विक्री, बाहतुक व कब्जात बाळगणारे इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक नितीन सावंत, सहा. पोलीस निरीक्षक जयदिप कळेकर व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन सदर सुचनेप्रमाणे माहिती काढून त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते.

त्या अनुशंगाने दि. १४.०६.२०२५ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक नितीन सावंत, सहा. पोलीस निरीक्षक, जयदिप कळेकर यांचे पथकामधील पोहेकों / अतुल माने, विनायक सुतार आणि पोकों/ सुमित सुर्यवंशी यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की, इसम नामे

अझहर लांबे, रा. ५ वी गल्ली, गणेशनगर, सांगली हा इनोव्हा गाडी नं. एम. एच. १२ के. जी. ८८८६ या वाहनामधून विदेशी दारु घेवून प्लॅनेट जिम, गणेशनगर, सांगली येथे येणार आहे.

नमुप पथक मिळाले बातमीप्रमाणे, प्लॅनेट जिम, गणेशनगर, सांगली येथे जावुन निगराणी करीत असता एक फिकट सोनेरी रंगाची इनोव्हा कंपनीची गाडी प्लॅनेट जिमसमोरील डांबरी रोडवर थांबलेली दिसली. मिळाले बातमीप्रमाणे संशय आल्याने पोलीसांनी सदर वाहन चालकास त्याचे नाव गाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव अझहर दाऊद लांबे, वय ३५ वर्षे, धंदा इलेक्ट्रीशियन, रा. ५ वी गल्ली, गणेशनगर, सांगली अये असल्याचे सांगितले. त्यांना मिळाले बातमीची हकीकत सांगुन अझहर लांबे यास झडतीचा उद्देश कळवून त्यांचे ताब्यातील इनोव्हा कारची झडती घेतली असता, सदर इनोव्हा कारच्या पाठीमागील सिठबर विदेशी दारुचे बॉक्स मिळून आले. सपोनि. नितीन सावंत यांनी चालक अझहर लांबे यास सदर मालाच्या वाहतुकीबाबत अगर जवळ बाळगणेबाबतचा परवाना असल्याबाबत विचारले असता त्यांनी परवाना नसल्याचे सांगितले. सदर माल कोवून आणला असून तो काठे घेवून जात आहे याबाबत त्यांचेकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, सदरचा माल सांगलीमध्ये विक्री करणेकरीता घेवून जात असल्याचे सांगितले.

लागलीच सहा. पोलीस निरीक्षक, नितीन सावंत यांनी सदरचा माल पंचनाम्याने जप्त केला असुन सदर आरोपी विरुध्द पोकों/ सोमनाथ पतंगे यांनी सांगली शहर पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारुबंदी कायदयान्यये वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास व कार्यवाही कामी सांगली शहर पोलीस ठाणेकडे वर्ग केला असुन पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट