स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी गांजा माल विक्री करणारे २ आरोपी जेरबंद ९६८ ग्रॅम गांजा केला जप्त..

0
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

सांगली :

पोलीस स्टेशन मिरज शहर

अपराध क्र आणि कलम

११३/२०२५ गुंगीकारक औषधी द्रव

फिर्यादी नाव

आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) ii (अ) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे

पोह १७२८/ अतुल वसंत माने, स्था. गु. अ. शाखा, सांगली

गु.घ.ता वेळ दि. १८/०३/२०२५ रोजीचे १७.३० वा.

गु.दा.ता वेळ १८/०३/२०२५ रोजी

माहिती कशी प्राप्त झाली

पोह/ अतुल माने पोना / अनंत कुडाळकर

कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार

मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांचे मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सांगली
सहा पोलीस निरीक्षक, नितीन सावंत, स्था. गु. अ. शाखा, सांगली सहा पोलीस निरीक्षक, जयदिप कळेकर, स्था. गु. अ. शाखा, सांगली सपोफौ / ऐनापुरे, पोहेकॉ अमोल ऐदाळे, संकेत मगदुम, आमसिद्धा खोत, इम्रान मुल्ला, अतुल माने, बाबासाहेब माने, पोना अनंत कुडाळकर, पोकों/सोमनाथ पतंगे, रोहन घस्ते

अटक दिनांक दि.१८/०३/२०२५ रोजी

आरोपीचे नहवे व पत्ते

१) रियाज मेहबूब सारवान, वय ४२ वर्षे, रा मंगल टॉकिज समोर, लोणार बल्ली, मिरज

२) अमन आक्रम जमादार, वय २१ वर्षे, रा खाँजा वस्ती, मिरज.

जप्त मुद्देमाल

१) २९,१००/- रू. एक निळ्या रंगाची प्लॅस्टीकची पिशवी त्यात हिरवट काळपट रंगांचा फुलबोंडे

असलेला तयार गांजा ९६८ ग्रॅम असलेला कि. अं.

२) २,०००/- रू. रोख रक्कम

३) ५०,०००/-रू. एक पांढ-या रंगाची अॅक्टीवा मोपेड गाडी

४) ००.००/-

दोन पिशव्या

८१,१००/-रू. एकूण
गुन्हयाची थोडक्यात हकीकत

मा. पोलीस अधीक्षक, संदीप घुगे यांनी अंमली पदार्थ तस्करी, विक्री, वाटप व वितरण करणारे इसमांवर कारवाई करणेसाठी त्यांचे अधिनस्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे विशेष पथक स्थापन करण्यात आलेले आहे.

त्या अनुशंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक, नितीन सावंत यांचे पथकामधील पोहेकों/अतुल माने व पोना/ अनंत कुडाळकर यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की, इसम नामे रियाज महबूब सारवान, रा मिरज हा अमन आक्रम जमादार, रा मिरज याचेकडून तयार गांजा माल घेणेकरीता मिरज शहरातील अबावली कबरस्तानचे मेन गेट समोर येणार आहे.

नमुद पथक मिळाले बातमीप्रमाणे, मिरज येथील अबावली कबरस्तानचे मेन गेट समोर, दर्गा कॉर्नरचे पूर्वेस माळी गल्लीकडे जाणारे रस्त्यावर सापळा लावून थांबले असता थोड्या वेळाने इसम नामे रियाज मेहबूब सारवान हा अॅक्टीवा मोपेड वाहनावरून दर्गा समोरून अबावली कब्रस्तानचे गेटजवळ येवून थांबला व त्यानंतर थोड्या वेळाने एक इसम पिशवी घेवून अबावली कबरस्तानचे मेन गेट समोर येऊन रियाज सारवान याचेशी बोलत थांबला. रियाज सारवान याने त्याचेकडील रोख रक्कम त्यास देवून त्याचेकडील पिशवी घेवून मोपेड गाडीच्या डिकीमध्ये ठेवली. तसा त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सहा. पोलीस निरीक्षक, नितीन सावंत व पथकाने सदर इसमांना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे १) रियाज मेहबूब सारवान, वय ४२ वर्षे, रा मंगल टॉकिज समोर, लोणार बल्ली, मिरज २) अमन आक्रम जमादार, वय २१ वर्षे, रा खाँजा वस्ती, मिरज अशी सांगितली.

त्यानंतर सहा. पोलीस निरीक्षक, नितीन सावंत यांनी त्यांना त्यांचे अंगझडतीचा उददेश कळवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता, त्यांचे कब्जातील गाडीचे डिकीमध्ये तयार गांजा माल मिळून आला. त्यांचेकडे सदर गांजा मालाबाबत विचारणा केली असता रियाज सारवान याने सांगितले की, अमन जमादार यांचेकडून गांजा माल खरेदी करून तो विक्री करीता घेवून जाणार आहे. तसेच अमन जमादार याने सांगितले की, सदरचा गांजा माल हा त्याने जयसिंगपूर येथील महम्मंद तोहिद सिध्दीकी नावचे इसमाकडून घेतला आहे.

लागलीच सदर आरोपी व गांजा माल सहा. पोलीस निरीक्षक, नितीन सावंत यांनी पंचासमक्ष जप्त केला आहे.

सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी मिरज शहर पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आला असून याबाबत वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट