स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी जबरी चोरी करणारे आरोपी जेरबंद करून त्याचेकडून १०,१०,२५०/- रु. चा मुद्देमाल केला हस्तगत .

संपादक- रणजित मस्के
सांगली :पोलीस स्टेशनविटागु.घ.ता वेळदि. ०६/०६/२०२४ रोजीचे २१.०० वाजताअपराध क्र आणि कलमफिर्यादी नाव२४३/२०२४ भा.दं.सं. कलमबाळू जोती कदम, रा भूड, ता खानापूर, जि सांगली३९२, ३४गु.दा.ता वेळ०७/०६/२०२४ रोजी ००.१० वाकारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदारमा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे,मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांचे मार्गदर्शानाखालीमाहिती कशी प्राप्त झालीपोह/सुर्यकांत साळुंखे पोह/संजय पाटील पोशि/सुनिल जाधवपोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सांगलीसहा पोलीस निरीक्षक, सिकंदर वर्धन, स्था. गु. अ. शाखा, सांगली पोहेकों / संजय पाटील, सुर्यकांत साळुंखे, हणमंत लोहार, शिवाजी सिद पोशि / प्रमोद साखरपे, सुनिल जाधव, अभिजित ठाणेकर, सुशांत चिले पोशि / कॅप्टन गुंडवाडे, सायबर पोलीस ठाणेअटक दिनांक दि.२०/०१/२०२४ रोजीआरोपीचे नावे व पत्ते१) अक्षय महादेव माने, वय २६ वर्षे, रा वलवण, ता आटपाडी२) साहिल कुंडलिक चव्हाण, वय २१ वर्षे, सध्या रा घरनिकी, ता आटपाडी, मूळ रा तुर्ची, ता तासगावघरनिकी, ता आटपाडी. ३) सचिन विठ्ठल माने, वय २३ वर्षे, राउघडकीस आलेले गुन्हे१) विटा पोलीस ठाणे गु.र.नं. ३४०/२०२२ भा.दं.सं. कलम ३९४, ३४२) विटा पोलीस ठाणे गु.र.नं. २४३/२०२४ भा.दं.सं. कलम ३९२, ३४३) आटपाडी पोलीस ठाणे गु.र.नं. ३९५/२०२४ बी.एन.एस. कलम ३०५ (अ)जप्त मुद्देमाल१) ९,५०,२५०/- रू. सोन्याचे ब्रासलेट, चैन, लॉकेट, बोरमाळ२) ६०,०००/- रू. एक स्प्लेंडर प्लस मोटार सायकल जु. वा. किं. अं.१०,१०,२५०/-रू. गुन्हयाची थोडक्यात हकीकतमा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करून, मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक, सिंकदर वर्धन व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन जबरी चोरीचे गुन्हे करणारे संशयित इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते.त्या अनुशंगाने विटा विभागात पेट्रोलिंग करीत असताना सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे पथकामधील पोह/सुर्यकांत साळुंखे, पोह/संजय पाटील व पोशि / सुनिल जाधव यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की, विटा येथील खानापूर ते विटा जाणारे रोडवर बळवंत कॉलेज समोर विना नंबर प्लेट मोटार सायकलीवरून तीन इसम चोरीचे दागिने विक्री करीता येणार आहेत.नमुद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे विटा येथील बळवंत कॉलेज येथील खानापूर ते विटा जाणारे रोडवर जवळ जावून सापळा लावून थांबले असता तीन इसम विना नंबर प्लेट मोटार सायकलवरून येत असताना दिसले. तसा त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांना सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व पथकाने पळून जाण्याची संधी न देता त्यांना मोटार सायकलसह ताब्यात घेवून त्यांचे नाव गाय विचारता त्यांनी त्यांची नावे १) अक्षय महादेव माने, वय २६ वर्षे, रा बलवण, ता आटपाडी २) साहिल कुंडलिक चव्हाण, वय २१ वर्षे, सध्या रा घरनिकी, ता आटपाडी, मूळ रा तुर्ची, ता तासगाव ३) सचिन विठ्ठल माने, वय २३ वर्षे, रा घरनिकी, ता आटपाडी अशी सांगितली. सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी त्यांचे अंगझडतीचा उददेश कळवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता, अक्षय माने याचे पँटचे खिशामध्ये सोन्याचे दागिने मिळून आले. त्यास सदर मालाबाबत विचारणा केली असता त्याने सदरचा माल हा विटा पोलीस ठाणे हद्दीतील भूड गावातील दुकानातील वयस्कर व्यक्तीचे गळ्यातील चैन ओढलेला, लेंगरे-माघळमुठी रोडला एका वाहन चालकास धक्का देवून गाडीवरून पाडून त्याचे हातातील व गळ्यातील सोन्याचे दागिने व आटपाडी पोलीस ठाणे हद्दीतील करगणी गावातील घरातून चोरी केलेले दागिने असल्याची कबुली दिली.सदर बाबत विटा व आटपाडी पोलीस ठाणेचा क्राईम अभिलेख तपासला असता वरीलप्रमाणे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली. लागलीच त्यांचे कब्जातील माल पुढील तपास कामी सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी पंचासमक्ष जप्त केला आहे.सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी विटा पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असुन पुढील तपास विटा पोलीस ठाणे करीत आहेत.