स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांची एम.डी. ड्रग्ज व ड्रग्ज बनविणारा कारखान्यावर कारवाई करून २९,७३,५५,२००/- रु चा माल केला जप्त..

सह संपादक- रणजित मस्के
सांगली ;पोलीस स्टेशनविटागु.घ.ता.वेळ व ठिकाणदि. २७.०१.२०२५ रोजी १९.४५ वा. दरम्यान रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीज, विटा एम.आय.डी.सी एरीया मध्ये कार्वेगुन्हा रजि नंबर व कलम५२/२०२५ एनडीपीएस अॅक्ट कलम ८ (क) २१ (क), २९गु.दा.ता.वेळ दि. २८.०१.२०२५फिर्यादी नावसागर गिरीजापती टिंगरे, पोहेकों / ७१२, नेमणुक सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा,माहिती कशी प्राप्त झालीपोहेका / सागर टिंगरे पोहेकों / नागेश खरातकारवाई करणारे अधिकारी व अंमलदारमा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र, सुनिल फुलारीमा. पोलीस अधीक्षक, संदीप घुगे,मा. अप्पर पोलीस अधीक्षक, रितु खोखर, पो. अधि. विभाग, तासगांव अति. कार्यभार विटा विभाग सचिन थोरबोले उप.वि यांचे मार्गदर्शनाखालीसतिश शिंदे, पोलीस निरीक्षक, स्था. गु.अ.शाखा, सांगली, धनंजय फडतरे, प्रभारी अधिकारी विटा पोलीस ठाणे स्था.गु.अ. शाखेकडील सपोनि पंकज पवार, सिकंदर वर्धन, सपोफी अच्युत सुर्यवंशी, पोहवा / सागर टिंगरे, संदीप गुरव, अमोल पैदाळे, नागेश खरात, मच्छिद्र बर्डे, दरीबा बंडगर, सागर लवटे,अनिल कोळेकर, उदय साळुंखे, इम्रान मुल्ला, नागेश कांबळे, संजय पाटील, अगर नरळे,सतिश गाने, महादेव नागणेपोना संदीप नलवडे, उदय माळी, अनंत कुडाळकरपोकों विक्रम खोत, प्रमोद साखरपे, सुनिल जाधव, गणेश शिंदेमपोकों/ वनिता चव्हाण सायबर कॅप्टन गुंडवाडेआरोपीची नावः १) रहुदिप धानजी बोरिचा, वय ४१ वर्ष, रा. श्री रेसेडेन्सी, ररुम नं २२, उत्तीयादरा कोसंबा, ता.भरुच, जि. सुरत राज्य गुजरात२) सुलेमान जोहर शेख, वय ३२ वर्ष, रा. मौलाना दादा लेन, दर्गाह गल्ली, बांद्रा, वेस्ट मुंबई) ३) बलराज अमर कातारी, वय २४ वर्ष, रा. साळशिंगे रोड, आयटीआय कॉलेज जवळ, विटागुन्हयाची थोडक्यात हकीकतः मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारत सरकार, मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, म.रा. मुंबई व सांगली जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रात नशा मुक्त अभियान सुरु केले आहे. त्या अनुषंगाने मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र, कोल्हापुर यांनी दिले सुचनेप्रमाणे, गा. पोलीस अधीक्षक, संदीप घुगे यांनी मानवी जीवनावर परिणाम करणा-या अंमली पदार्थीची विक्री, तस्करी, साठा व उत्पादन करणारे इसमांचे बाबत माहिती काढून त्यांचेवर कडक कारवाई करणेबाबत आदेशित केले आहे.मा. पोलीस अधीक्षक, सांगली यांनी दिले आदेशाप्रमाणे स्था गु.अ. शाखेचे पोलीस निरीक्षक, सतिश शिंदे यांनी स्था.गु.अ. शाखेचे अधिकारी व अंमलदार यांना कारवाई करणेबाबत निर्देश दिले होते. त्याप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक, पंकज पवार व त्यांचे अधिनस्त वरील पोलीस अंमलदार यांचे पथकाने अंमली पदार्थ विक्री, तस्करी, साठा व उत्पादन करणारे इसमांचे बाबत गोपनीय माहिती काढून त्यांचेवर कारवाई करणेवर लक्ष केंद्रीत केले. त्याप्रमाणे स्था.गु.अ. शाखेचे पोहया / सागर टिंगरे यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराने माहिती दिली की, ” विटा हद्दीतील कार्ये एम आय डी सी, रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीज या ठिकाणी इसम बलराज कातारी हा चार चाकी वाहनातून मेफॅड्रॉन (एग डी) नावचे अंमली पदार्थ विक्री करीता घेवून जाणार आहे. नमुद गोपनीय बातमी पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांना कळविली असता त्यांनी सदर बातमीची हकीकत संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली यांना कळवुन कारवाई बाबत सुचना व मार्गदर्शन घेवुन वरील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार हे मिळाले बातमीची खात्री करणे करीता शासकीय व खाजगी चार चाकी वाहनाने रवाना होवून शासकीय पंच, अधिकृत वजनकाटा धारक व खाजगी फोटोग्राफर यांना बोलावुन तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, तासगांव विभाग, तासगांव अतिरिक्त कार्यभार विटा उपविभाग, विटा यांचे कडील झडती व कारवाईचे अधिकारपत्र घेवुन कारवाई कामी कार्वे गावचे हद्दीत असले एम आय डी सी येथे रोडने आत जावुन मिळाले बातमीच्या ठिकाणा पासून थोडे अंतरावर अलीकडे येणारे जाणारे वाहनावर वॉच करीत थांबलो असता रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीज समोरील पत्र्याचे गेट मधून एक सशंगीत पांढरे रंगांची झुंडाई आय २० तिचा आरटीओ क्रमांक एमएच ४३ ए एन १८११ चार चाकी वाहन बाहेर येत असताना दिसल्याने पोलीस स्टाफने त्या वाहनास १९.४५ वा सुमारास थांबवून त्या वाहनातील चालकास वाहन बंद करणेस सांगितले. त्यानंतर सपोनि पंकज पवार यांनी उपस्थित सर्वांचे समक्ष वाहनातील इसमास नाव गांव विचारले असता, त्यातील चालकाने त्याचे नाव १) ABC व शेजारी बसलेले इसमाने त्याचे नाव २) बलराज अगर कातारी वय २४ वर्ष रा. साळशिंगे रोड आयटीआय कॉलेज जवळ विटा असे असल्याचे सांगितले. त्यावेळी क्र. ०१ यांने सदरचे वाहन त्याचे वडीलांचे नावावरती असुन तो क्र. ०२ याचे भाडे घेवुन आल्याचे त्यांने सांगितले. परंतु क्र. ०२ यांचेकडे विचारणा केली असता त्यांनी काही एक समाधानकारक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिली. नमुद इसमांना वाहनातून उतरुन प्राप्त बातमीची माहिती देवून क्र. ०२ यास विश्वासात घेवुन विचारणा केली असता अ. नं. २) बलराज कातारी याने सांगितले की, रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीज येथे तयार केलेला मेफॅड्रॉन (एग डी) नावचा अमंली पदार्थ प्लॅस्टिक पिशवीमध्ये भरुन तो ट्रॅव्हलिंग बॅगे मध्ये ठेवून मुंबई येथे विक्री करीता घेवून चालला होता. सदरचे वाहन भाडयाने घेतलेले असून याबाबत त्याचे सोबत असलेला वाहन चालक ABC वास काही माहिती दिलेली नाही. तसेच सदरचे एम.डी ड्रग हे गाडीचे डिक्कीमध्ये बेंगामध्ये ठेवले असुन त्याचा मित्र रहुदिप धानजी बोरिचा व सुलेमान जोहर शेख यांनी रामकृष्ण हरी गाऊली इंडस्ट्रीज येथे तयार केला आहे. त्याचवेळी रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीज या शेडमध्ये संशयीत हालचाल दिसुन आल्याने सपोनि / पंकज पवार यांनी तात्काळ सोबत असलेल्या पोलीस अंमलदारांना सदर ठिकाणी पाठवुन तेथील संशयित रहुदिप धानजी बोरिचा व सुलेमान जोहर शेख यांना ताब्यात घेतले.त्यानंतर रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीज या कारखान्याची झडती घेतली असता सदर ठिकाणी व पांढरे रंगांची गुंडाई आय २०. क्रमांक एमएच ४३ ए एन १८११ या वाहनामध्ये खालीलप्रमाणे मेफॅड्रॉन (एम.डी) हा अंगली पदार्थ व ते बनविण्याकरीता वापरलेले साहित्य मिळुन आले आहे.


