स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली व उमदी पोलीस ठाणे यांनी जबरी चोरीचा गुन्हा केला उघड

सह संपादक – रणजित मस्के
सांगली


अडीच कोटी रूपयांची रोकड जप्त
अपराध क्र आणि कलम
८३/२०२५ बी.एन.एस. कलम ३१० (२)
फिर्यादी नाव
अनिल अशोक कोडग, रा उमदी, ता जत, जि सांगली.
माहिती कशी प्राप्त झाली
दि. १४/०४/२०२५ रोजी ०३.३० वा. ते ०३.४५ वा. चे सुमारास
१४/०४/२०२५ रोजी १५.३३ वा
पोह/नागेश खरात
पोह/अनिल कोळेकर
पोना/संदीप नलावडे
पोह/सागर टिंगरे
पोह/संतोष माने
कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार
मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र कोल्हापुर सुनिल फुलारी सर,मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे,मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, जत विभाग सुनिल साळुंखे
यांचे मार्गदर्शानाखाली
पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सांगली
सहा पोलीस निरीक्षक, नितीन सावंत, स्था. गु. अ. शाखा, सांगली
सहा. पोलीस निरीक्षक, पंकज पवार, स्था. गु. अ. शाखा, सांगली
सहा पोलीस निरीक्षक, संदीप कांबळे, उमदी पोलीस ठाणे
महिला सहा. पोलीस निरीक्षक, रूपाली बोबडे, सायबर पोलीस ठाणे
पोलीस उपनिरीक्षक, बंडू साळवे, उमदी पोलीस ठाणे
पोहेकों / नागेश खरात, अनिल कोळेकर, महादेव नागणे, सागर टिंगरे, अमर नरळे,
सतिश माने, सागर लवटे, संदीप गुरव, दरिबा बंडगर, मच्छिद्र बर्डे, आमसिध्द खोत, पोना संदिप नलावडे, उदय माळी, सोमनाथ गुंडे, सपोफौ मुलाणी, पोहेकों/ शिवाजी शिद, पोकों/ गणेश शिंदे उमदी पोलीस ठाणेकडील पोहेकों/ संतोष माने, कपील काळेल, आगतराव मासाळ,पोना / सोमनाथ पोटभरे, पोकों/ इद्रजित घोदे, मपोहेकॉ कावेरी मोटे, मपोना/ म्हेत्रे. पोशि/ कॅप्टन गुंडवाडे, अजय पाटील, विजय पाटणकर सायबर पोलीस ठाणे
अटक दिनांक दि.१५/०४/२०२५ रोजी
१) रवी तुकाराम सनदी, वय ४३ वर्षे, रा माळी वस्ती, उमदी, ता जत, जि सांगली.
२) अजय तुकाराम सनदी, वय ३५ वर्षे, रा माळी वस्ती, उमदी. सध्या रा गोकळ पार्क, विजयपुर
३ )चेतन लक्ष्मण पवार, यय २० वर्षे, रा इंडी रोड, विजयपूर, राज्य कनार्टक
४) लालसाब हजरत होनयाड, वय २४ वर्षे, रा. उमुद्री, ता, जत, जि सांगली,
५) आदिलशाह राजअहमद अत्तार, वय २७ वर्षे, रा उमदी, ता जत, जि सांगली.
६) सुमित सिद्धराम माने, वय २५ वर्षे, रा पोखणी, ता उत्तर सोलापूर, जि सोलापूर.
७) साई सिद्धू जाधव, वय १९ वर्षे, रा उमदी, ता जत, जि सांगली.
जप्त मुद्देमाल
१) २,४९,८८,०००/-रू. रोख रक्कम
२) ६,५०,०००/- रू. किंमतीची मारूती सुझुकी कंपनीची ब्रिझा मॉडेल असलेली गाडी जु. वा. किं. अं.
२.५६,३८,०००/-रू. (दोन कोटी छपन्न लाख अडतीस हजार)
गुन्हयाची थोडक्यात हकीकत
दि. १५/०४/२०२५ रोजी ०३.३० वा. चे सुमारास फिर्यादी व फिर्यादीचा ड्रायव्हर असे त्यांचेकडील ब्रिझा गाडीतून उमदी येथून विजयपूर येथे कामानिमित्त जात असताना मोरबगी गावचे अलिकडे ब्रिजवरे एका पांढ-या रंगाची स्विफ्ट कार फिर्यादीचे गाडीस आड्वी मारून त्या गाडीतून ४ अनोळखी इसम उतरून फिर्यादीस काठी व रॉडने मारहाण करून जखमी करून त्यांचे कब्जातील रोख रक्कम, सोन्याची अंगठी, मोबाईल व फिर्यादीची गाडी जबरदस्तीने चोरून नेली तसेच फिर्यादीचे ड्रायव्हर यास पायावर दगडाने मारून जखमी केले आहे. सदर बाबत उमदी पोलीस ठाणेस वरीलप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे सर व मा. अपर पोलीस अधीक्षक, रितु खोखर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, जत, विभाग सुनिल साळुंखे यांनी सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखून सदर गुन्हयाबाबत मार्गदर्शन करून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. सदर आदेशाप्रमाणे स्था. गु. अ. शाखा व उमदी पोलीस ठाणेच्या टीम तयार केल्या होत्या.
सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी घटनास्थळी भेट देवून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक नितीन सावंत व स्टाफ यांचे एक पथक तयार करून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले होते,
सदर गुन्हयाचे अनुशंगाने सहा पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांचे पथकामधील पोह/नागेश खरात, पोह/ अनिल कोळेकर, पोह/ सागर टिंगरे व पोना / संदीप नलावडे यांना तांत्रिक माहितीचे विश्लेषण व बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर गुन्हयांतील तीन आरोपी हे कोत्यांव बोबलाद. येथील कोत्यांव बोबलाद ते विजयपूर जाणारे रोडवर झेंडे वस्ती येथे थांबलेले आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाली.
नमुद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे कोत्यांव बोबलाद येथे जावून कोत्यांव बोबलाद ते विजयपूर जाणारे रोडवर झेंडे वस्तीवर सापळा लावून थांबले असता तीन इसम संशयितरित्या झेंडे वस्तीवर थांबलेले दिसले. तसा त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांना संहा पोलीस निरीक्षक नितीन सावंत व पथकाने पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेवून त्यांना नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे १) रवी तुकाराम सनदी, वय ४३ वर्षे, रा माळी वस्ती, उमदी, ता जत, जि सांगली २) अजय तुकाराम सनदी, वय ३५ वर्षे, रा माळी पस्ती, उमदी, सध्या रा गोकुळ पार्क, विजयपूर, राज्य कर्नाटक ३) चेतन लक्ष्मण पवार, वय २० वर्षे, रा इंडी रोड, विजयपूर, राज्य कर्नाटक अशी सांगितली. त्यांचेकडे अधिक चौकशी करता त्यांनी मोरबगी गावाजवळील पुलावर अनिल कोडग यांची ब्रिझा गाडी थांबवून त्यांचेकडील रोख रक्कम, सोने व ब्रिझा गाडी जबरीने चोरी केलेची कबुली दिली.
दरम्यानच्या काळात उमदी पोलीस ठाणेकडील पोह/संतोष माने यांना बातमीदाराकडून, बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील आणखी काही आरोपी हे उमदी येथील चडचण रोड माळावरती थांबलेले आहेत. मिळाले बातमीप्रमाणे सहा पोलीस निरीक्षक संदीप कांबळे व त्यांचा स्टाफ सदर ठिकाणी जावून सापळा लावून थांबले असता त्यांना सदर ठिकाणी ४ इसमें थांबलेले दिसले. तसा त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांना ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे ४) लालसाब हजरत होनवाड, वय २४ वर्षे, रा उमदी, ता जत, जि सांगली ५) आदिलशाह राजअहमद अत्तार, वय २७वर्षे, रा उमदी, ता जत, जि सांगली ६) सुमित सिद्राम माने, वय २५ वर्षे, रा पोखणी, ता उत्तर सोलापूर, जि सोलापूर ७) साई सिद्धू जाधव, वय १९ वर्षे, रा उमदी, ताजत, जि सांगली अशी सांगितली. त्यांचेकडे तपास केला असता त्यांनी वरीले नमूद गुन्हा केल्याची कबुली दिली.
यातील अटकेत असलेला आरोपी नं. १ ते ७ यांचेकडे गुन्हयाचे व गुन्हयातील मुद्देमालाचे अनुशंगाने तपास केला असता त्यांनी सांगितले की, साई जाधव हा फिर्यादी यांचेकडे काही दिवसापूर्वी कामाला असल्याने फिर्यादी हे त्यांचे कारमधून पैसे घेवून जात असलेबाबत त्यास माहिती होतेः सदर फिर्यादीचा ड्रायव्हर यांचा मुलगा साई जाधव यास, फिर्यादी हे दि. १४/०४/२०२५ रोजी त्यांचे कारमधून पैसे घेवून जात असलेबाबत माहिती मिळाल्याने अजय सनदी याचेसोबत अन्य आरोपी यांनी मिळून पैसे चोरी करणेबाबतची योजना आखली होती.
तसेच आरोपी नं. २) अजय तुकाराम सनदी यास विश्वासात घेवून त्याचेकडे तपास केला असता त्याने सदर गुन्हयातील चोरी केलेला मुद्देमाल हा त्याचे घरी गोकुळ पार्क, विजयपूर, राज्य कर्नाटक येथे ठेवला असल्याचे सांगितल्याने सहा. पोलीस निरीक्षक नितीन सावंत स्था. गु. अ. शाखा, सांगली, सहा. पोलीस निरीक्षक, संदीप कांबळे उमदी पोलीस ठाणे व स्टाफ असे आरोपी नं. २ याने दिलेल्या निवेदन पंचनाम्याप्रमाणे त्याचे घरी जावून बेडच्या आतमध्ये सदरची लपवलेली रक्कम पंचनाम्याने जप्त कुण्यात आलेली आहे.
आरोपी नं. ६) सुमित सिद्धराम माने, हा रेकॉर्डब्ररील गुन्हेगार असून त्याचेवर पुणे शहर येथे गुन्हे दाखल आहेत.
सदर गुन्हयाचा पुढील तपास उमदी पोलीस ठाणे करीत आहेत.