स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी ए.टी.एम. कार्डची आदला-बदल करुन पुणे येथील वयोवृध्द लोकांची फसवणूक करणाऱ्या चोरटयास केले जेरबंद..

0
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

सातारा

मा. तुधार दोशी पोलीस अधीक्षक सातारा व मा. श्रीमती डॉ. वैशाली कड़कर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी महाराष्ट्रामध्ये एटीएम सेंटरमध्ये वयोवृध्द लोकांच्या अज्ञानपनाचा फायदा घेवून त्यांच्या एटीएम कार्डची आदला-बदल करुन वयोवृध्द लोकांची फवणुक करणारी टोळी पकडण्याबाबत श्री अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे श्री अरुण देवकर पोलीस निरीक्षक यांनी श्री विश्वास शिंगाडे पोलीस उपनिरीक्षक स्था.गु.शा सातारा यांच्या अधिपत्याखाली एक तपास पथक तयार करुन त्यांना सदर बाबत कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

दिनांक २६/७/२०२५ रोजी एक इसम एटीएम कार्ड स्वॅप करुन त्याद्वारे सातारा शहरामध्ये खरेदी करीत असल्याची गोपनिय माहिती श्री अरुण देवकर पोलीस निरीक्षक यांना मिळाल्याने त्यांनो त्यावायत कारवाई करण्याच्या सूचना पोउनि श्री विश्वास शिंगाडे व त्यांच्या पथकास दिल्या. त्याप्रमाणे पथकाने सातारा शहरात पेट्रोलींग करुन गोपनियरित्या माहिती काढली असता एक इसम शाहू स्टेडीयम सातारा येथील लॅपटॉप स्पेस या दुकानामध्ये एटीएम कार्ड स्वॅप करून लॅपटॉप खरेदी करीत असल्याची माहिती मिळाली, पथकाने त्याठिकाणी जावून त्याच्याबाबत माहिती घेवून त्यास छ. शिवाजी महाराज संग्रहालय साताराचे समोर पकडून, त्याच्याकडे विचारपूस केली असता त्वाने उत्तमनगर पुणे याठिकाणी एका महिलेने त्यास पैसे काठुन देण्याकरीता तिचे एटीएम व त्याचा पिन नंबर त्यास सांगितला असता त्याने त्या महिलेस पैसे काढून देवून तिला त्याच्याकडील बनावट एटीएम कार्ड दिले व तिचे एटीएम कार्ड स्वतःकडे घेवून त्या एटीएम द्वारे खात्यावरील पैसे काढून व वस्तु खरेदी करत असल्याचे सांगितले. सदर बाबत अधिक माहिती घेतली असता उत्तमनगर पोलीस ठाणे पुणे शहर गुरनं ९९/२०२५ भा.न्या.सं.२०२३ चे कलम ३१८(४), ३९६ (२), ३ (५) प्रमाणे गुन्हा नोंद असल्याने सदर इसमास पुढील कारवाई करीता उत्तमनगर पोलीस ठाणे पुणे शहर यांच्या ताब्यात दिले आहे.

सदर कारवाई श्री. मुषार दोशी पोलीस अधीक्षक, सातारा व श्रीमती डॉ. वैशाली कड़कर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. अरूण देवकर, पोलीस निरीक्षक, विश्वास शिंगाडे, पोलीस उप निरीक्षक, पोलीस अंमलदार संजय शिर्के, अमोल माने. अजित कर्ण, जयवंत खांडके, स्वप्निल दौंड, दलजीत जगदाळे यांनी केलो असल्याने श्री. तुषार दोशी पोलीस अधीक्षक, सातारा व श्रीमती डॉ. वैशाली कड़कर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी कारवाई करणाऱ्या अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट