स्थानिक गुन्हे शाखा सांगली यांनीयामाहा मोटार सायकल चोरी करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगारास केले जेरबंद ..

0
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

सांगली

१२ मोटार सायकली जप्त करून ७,२०,०००/-रु. मुद्देमाल हस्तगत

पोलीस स्टेशन

सांगली शहर

गु.घ.ता वेळ

दि. ०९/०२/२०२५ रोजीचे २१.०० वा. ते दि. १०/०२/२०२५ रोजीचे ०५.०० वा. चे सुमारास

अपराध क्र आणि कलम

१३७/२०२५ बी.एन.एस. कलम ३०३ (२)

गु.दा.ता वेळ

२७/०३/२०२५ रोजी २१.१० वा.

फिर्यादी नाव आनंद सुखदेव माने, रा शिवशंभो चौक, कर्नाळ रोड, सांगली

माहिती कशी प्राप्त झाली

पोना/उदय माळी पोह/महादेव नागणे पोह/सतिश माने पोशि/ विक्रम खोत

कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार

मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांचे मार्गदर्शानाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सांगली सहा पोलीस निरीक्षक, पंकज पवार, स्था. गु. अ. शाखा, सांगली पोहेकों / सागर लवटे, महादेव नागणे, संदिप गुरव, सतिश माने, मछिंद्र बर्डे, अनिल कोळेकर, सागर टिंगरे, अमर नरळे, द-याप्पा बंडगर, नागेश खरात पोना/ उदय माळी, संदिप नलावडे पोशि विक्रम खोत, केरबा चव्हाण पोशि / कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर सायबर पोलीस ठाणे अटक दिनांक दि.२९/०३/२०२५ रोजी

आरोपीचे नाव व पत्ता

रेकॉर्डवरील आरोपी संकेत तानाजी ढगे, वय २१ वर्षे, रा निबोणी, ता मंगळवेढा, जि सोलापूर

उघडकीस आलेले गुन्हे

१) सांगली शहर पोलीस ठाणे गु.र.नं. १३७/२०२५ बी.एन.एस. कलम ३०३ (२)

२) सांगली शहर पोलीस ठाणे गु.र.नं. ०३/२०२५ बी.एन.एस. कलम ३०३ (२)

३) आष्टा पोलीस ठाणे गु.र.नं. ८२६/२०२४ बी.एन.एस. कलम ३०३ (२)

४) आष्टा पोलीस ठाणे गु.र.नं. १५३/२०२४ बी.एन.एस. कलम ३०३ (२)

५) आष्टा पोलीस ठाणे गु.र.नं. २१९/२०२५ बी.एन.एस. कलम ३०३ (२) (१)

६) आष्टा पोलीस ठाणे गु.र.नं. १०३/२०२५ बी.एन.एस. कलम ३०३ (२)

७) आष्टा पोलीस ठाणे गु.र.नं. १०१/२०२५ बी.एन.एस. कलम ३०३ (२)

८) आष्टा पोलीस ठाणे गु.र.नं. ९६/२०२५ बी.एन.एस. कलम ३०३ (२)

९) विश्रामबाग पोलीस ठाणे गु.र.नं. २७/२०२५ बी.एन.एस. कलम ३०३ (२)

१०) संजयनगर पोलीस ठाणे गु.र.नं. १५/२०२५ बी.एन.एस. कलम ३०३ (२)

११) सांगली ग्रामीण पोलीस ठाणे गु.र.नं. ३९२/२०२४ बी.एन.एस. कलम ३०३ (२)
) ७,२०,०००/- रू. १२ यामाहा कंपनीच्या आरएक्स १०० मॉडेलच्या मोटार सायकली जु. वा. कि. अं.

७,२०,०००/-रू. एकूण

गुन्हयाची थोडक्यात हकीकत

मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे इसमाची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.

सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन मोटार सायकल चोरी करणारे संशयित इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते.

त्या अनुशंगाने सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथकामधील पोना/उदय माळी, पोह/महादेव नागणे, पोह/सतिश माने व पोशि/ विक्रम खोत यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी संकेत ढगे, रा निबोणी, ता मंगळवेढा, जि सोलापूर हा विना नंबर प्लेटची मोटार सायकल घेवून आष्टा येथील बावची फाटा परिसरात संशयीतरित्या फिरत आहे.

नमुद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे आष्टा येथे जावून बावची फाटा परिसरात सापळा लावून थांबले असता एक इसम विना नंबर प्लेट मोटार सायकलजवळ थांबलेला दिसला. तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेवून त्यास नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव संकेत तानाजी ढगे, वय २१ वर्षे, रा निंबोणी, ता मंगळवेढा, जि सोलापूर असे सांगितले. सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्याचे अंगझडतीचा उददेश कळवून पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याचे कब्जात एक विना नंबर प्लेटची यामाहा मोटार सायकल मिळून आली. त्यास सदर मोटार सायकलीबाबत विचारणा केली असता त्याने सदरची मोटार सायकल ही सांगली शिवशंभो चौकातून चोरी केली असल्याचे सांगितले. त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने आणखी चोरी केलेल्या मोटार सायकली या त्याचा बावची येथील मित्राचे घराजवळ लावल्या असल्याचे सांगितले. सदर ठिकाणी जावून पाहिले असता नमूद ठिकाणी ०३ यामाहा मोटार सायकली मिळून आल्या. त्यानंतर त्याने सोलापूर जिल्हयातील मंगळवेढा व डोंगरगाव या ठिकाणी त्याचे ओळखीच्या व्यक्तींच्या घराजवळ ०८ मोटार सायकली ठेवलेल्या होत्या त्या मोटार सायकली साक्षीदाराकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली येथे जप्त करण्यात आलेल्या आहेत.

सदर मोटार सायकलीबाबत सांगली शहर, सांगली ग्रामीण, आष्टा, विश्रामबाग, संजयनगर पोलीस ठाणेचा क्राईम अभिलेख तपासला असता वरील प्रमाणे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली. लागलीच सदरच्या १२ मोटार सायकली पुढील तपास कामी सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचासमक्ष जप्त केला आहे.

सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचेवर आष्टा व मंगळवेढा (सोलापूर) पोलीस ठाणेस चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी सांगली शहर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असुन पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट