स्थानिक गुन्हे शाखा सांगली यांनी विना परवाना अग्निशस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारास केली अटक

0
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

सांगली

१ अग्निशस्त्र व १ जिवंत काडतुस हस्तगत.

पोलीस स्टेशन

जत

अपराध क्र. आणि कलम

फिर्यादी नाव

गु.र.नं. ३५४/२०२५, आर्म अॅक्ट

पोशि/केरूबा पांडुरंग चव्हाण, नेम

स्था.गु.अ.शाखा, सांगली

दिनांक २८/०५/२०२५ रोजी १७.३५ वा.

दिनांक २८/०५/२०२५ रोजी

माहिती कशी प्राप्त झाली

पोशि / केरूबा चव्हाण

कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार

मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांचे मार्गदर्शनाखाली

पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली सहा पोलीस निरीक्षक, पंकज पवार, स्था. गु. अ. शाखा, सांगली पोहेकों / अमर नरळे, महादेव नागणे, मछिंद्र बर्डे, द-याप्पा बंडगर, संदिप गुरव, सागर लवटे, सतिश माने, अनिल कोळेकर, सागर टिंगरे, नागेश खरात

पोना/ उदय माळी, संदिप नलावडे पोशि / केरबा चव्हाण, विक्रम खोत

अटक वेळ दिनांक दि. २८.०४.२०२५ रोजी

आरोपीचे नाव व पत्ता

निलेश मल्लिकार्जुन मांगलेकर, वय २३ वर्षे, रा विठ्ठलनगर, जत

जप्त मुद्देमाल

१) ५०,०००/- रु किंमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल जु. वा. किं. अं.

२) ४००/- रु. किंमतीचे ०२ जिवंत राऊड

५०,४००/- (पन्नास हजार चारशे रुपये मात्र )

गुन्हयाची थोडक्यात हकीकत-

मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण, शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील स्टाफ यांचे एक पथक तयार करुन अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते.

त्या अनुशंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथकातील पोशि/केरूबा चव्हाण यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, निलेश मांगलेकर, रा विठ्ठलनगर, जत हा जत येथील साखर कारखान्याचे वजन काटयाकडे जाणारे कच्च्या रोडजवळ त्याचे कब्जात बिगरपरवाना अग्निशस्त्र बाळगून आहे.

मिळाले बातमीप्रमाणे वरील पथक हे जत येथील साखर कारखान्याचे मेन गेट कडून वजन काट्याचे जाणारे कच्च्या रोडवर वाँच केला असता बातमीप्रमाणे एक संशयित इसम रोडवर थांबलेला दिसला. तसा त्याचा बातमीप्राणे संशय आल्याने त्यास पळून जाण्याची संधी न देता शिताफीने ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव गाय विचारता त्याने त्याचे नाव निलेश मल्लिकार्जुन मांगलेकर, वय २३ वर्षे, रा विठ्ठलनगर, जत असे सांगितले. त्यावेळी त्यास त्याचे अंगझडतीचा उद्देश कळवून पंचासमक्ष अंगझडती घेतली असता, त्याचे कब्जात एक देशी बनावटीचे पिस्टल, दोन जिवंत काडतुसे मिळून आली. सदर देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगण्याच्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्याचेकडे याबाबतचा कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे सांगितले.

लागलीच सदरचे अग्निशस्त्र व जिवंत काडतुसे पुढील तपास कामी पोह/अमर नरळे यांनी पंचासमक्ष जप्त करुन आरोपी विरुध्द पोशि/केरूबा चव्हाण यांनी जत पोलीस ठाणे येथे फिर्याद देवून भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी जत पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असुन पुढील तपास जत पोलीस ठाणे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट