स्थानिक गुन्हे शाखा सांगली यांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा करणाऱ्या तुषार सुंटनुर यास ठोकल्या बेड्या..

0
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

सांगली

पोलीस स्टेशन

म. गांधी चौक

गु.घ.ता वेळ

दि. १४/०४/२०२५ रोजी १८.०७ वा.

अपराध क्र आणि कलम

९०/२०२५ बी.एन.एस. कलम १०५

गु.दा.ता वेळ

दिनांक २७/०४/२०२५ रोजी

फिर्यादी नाव

पोलीस उपनिरीक्षक, राजेंद्र कलगुटकर, म. गांधी चौक पोलीस ठाणे

माहिती कशी प्राप्त झाली

पोह/ अतुल माने पोना/ रणजित जाधव

कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार

मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे

मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर

यांचे मार्गदर्शानाखाली

पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली सहा पोलीस निरीक्षक, जयदीप कळेकर, स्था. गु. अ. शाखा, सांगली सहा पोलीस निरीक्षक, नितीन सावंत, स्था. गु. अ. शाखा, सांगली सपोफौ/ अनिल ऐनापुरे, पोहेकों अतुल माने, अमोल ऐदाळे, सुर्यकांत साळुंखे, आमसिद्धा खोत, बसवराज शिरगुप्पी, इम्रान मुल्ला, संजय पाटील, संकेत मगदुम, पोना/ रणजित जाधव, अनंत कुडाळकर, पोशि / सोमनाथ पतंगे, रोहन घस्ते

मयताचे नाव

सचिन सदाशिव कोळी, वय २३ वर्षे, रा कर्मवीरनगर, म्हैशाळ, ता मिरज.

आरोपी अटक दिनांक दि.२७/०४/२०२५ रोजी

आरोपीचे नाव व पत्ता

तुषार सिद्धार्थ सुंटनूर, वय २४ वर्षे, रा पंढरपूर चाळ, मिरज.

गुन्हयाची थोडक्यात हकीकत

दि. १४/०४/२०२५ रोजी सचिन कोळी हे मिरज येथील उत्तमनगर रेल्वे पटरीजवळ खडयात पडल्याने त्यांना उपचारा करीता सिव्हील हॉस्पीटल, मिरज येथे दाखल केले असता ते उपचारा दरम्यान मयत झाल्याने सिव्हील हॉस्पीटल, मिरज यांनी सदरबाबत म. गांधी चौक पोलीस ठाणेस कळविल्याने त्या अनुषंगाने अ.म.र.नं. २५/२०२५ बी.एन.एस. १९४ प्रमाणे मयत दाखल करण्यात आले होते.

प्रस्तुत मयताचे मरणाबाबत साशंकता असल्याने वरिष्ठांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सदर मयताचे मरणाचे कारणाचे अनुषंगाने तपास करणेबाबत आदेश दिले होते.

सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन मयत व्यक्तीचे पी. एम. रिपोर्टमध्ये मयताच्या मरणाचे कारण हे डोक्यास दुखापत होऊन मयत झाले आहे असे आल्याने मयताचे मरणाचे अनुषंगाने तपास करणेबाबत सुचना दिल्या.

त्या अनुशंगाने सहा. पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांचे पथकामधील पोह/अतुल माने व पोना/रणजित जाधव यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की, मिरज येथील मयत सचिन कोळी यांना तुषार सिद्धार्थ सुंटनूर, रा पंढरपूर चाळ, मिरज त्यांच्यात एकमेकाना शिवीगाळ देण्याचे कारणावरून वाद होवून तुषार सुंटनूर याने त्यांना मारहाण केली होती.

नमुद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे संशयित इसम तुषार सिद्धार्थ सुंटनूर, वय २४ वर्षे, रा पंढरपूर चाळ, मिरज याची गोपनीय माहिती काढून त्यास मिरज येथून ताब्यात घेऊन त्याचेकडे मयताच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने सांगितले की, दि. १४/०४/२५ रोजी सकाळी मिरज उत्तमनगर येथील रेल्वे टपरीजवळील मोकळ्या मैदानात एक इसम लहान मुलांना शिवीगाळ करीत होता. त्यास मुलांना शिवीगाळ का करत आहेस याबाबत विचारले असता त्याने तुषार सुंटनूर यास शिवीगाळ देण्यात सुरूवात केली. यातून त्यांच्यात वाद विवाद झाल्याने रागाने तुषार सुंटनूर याने त्याचे तोंडावर, नाकावर हाताने मारहाण करून हाताने ढकलले असता मयत हा घसरून उतारावरून खाली जाऊन पडला. त्यानंतर तुषार सुंटनूर हा तेथून निघून गेला.

मयत सचिन कोळी हा खड्डयात पडताना त्याचे डोक्यास तेथील दगड लागून त्याचे डोकीस दुखापत होवून तो मयत झाला आहे. यामध्ये संशयित आरोपी व मयत यांचा पुर्वीचा परिचय नसून सदर भांडणे तात्कालिक कारणावरून झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

याबाबत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आला असून पुढील तपासत. गांधी चौक पोलीस ठाणे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट