स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांचेकडून अमंलीपदार्थ विरोधी कारवाई.

उपसंपादक : मंगेश उईके
पालघर पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख यांनी अमंलीपदार्थ सबंधातील कारवाई करुन त्यांचे जिल्हयातुन समूळ उच्चाटन करणेबाबत पालघर जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे यांना सुचना देवुन, पोलीस निरीक्षक श्री. प्रदिप पाटील यांचे अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखा पालघर कडील विशेष पथक नेमलेले आहे.

स्थानिक गुन्हे शाखा, पालघर कडील पोलोरा अधिकारी व अमंलदार यांचे विशेष पथकाने दि. २४/०५/२०२५ ते दि.०६/०६/२०२५ रोजी पावेतो पालघर-बोईसर परिसरात विवीध ठिकाणी पेट्रोलींग करुन बातमीदारांचे मदतीने माहिती मिळवुन अमंलीपदार्थ सबंधात एकुण ०३ केसेस करुन, त्यात एकुण ६ आरोपी ताब्यात घेवुन, त्यांचे कब्जातील एकुण ९५,०००/- रु. किमंतीचा ४ किलो ८३५ ग्रॅम वजनाचा गांजा, ३,००,०००/- रु. किमंतीचे १२३ ग्रॅम कोकेन, ५,७००/- रु. रोख रक्कम आणि ५,००,०००/- रु. किमंतीची स्वीप्ट डिझायर कार क्रमांक एमएच ४८/डीसी २६८० जप्त करुन, खालील प्रमाणे गुन्हे दाखल केलेले आहेत.
१) बोईसर पोलीस ठाणे गु.र.नं. २३४/२०२५ एनडीपीएस अधि. कलम ८ (क), २० (ब), (Ⅱ) प्रमाणे.
२) पालघर पोलीस ठाणे गु.र.नं. १५६/२०२५ एनडीपीएस अधि. कलम ८ (क), २० (ब), (ए) प्रमाणे.
३) पालघर पोलीस ठाणे गु.र.नं. १६३/२०२५ एनडीपीएस अधि. कलम ८ (क), २१ (क), २९ प्रमाणे.
सदरची कारवाई श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. प्रदिप पाटील, सहा.पो.निरीक्षक श्री. अनिल व्हटकर, पांउनि/स्वप्नील सावंतदेसाई, पोउनि/गोरखनाथ राठोड, पोहवा/दिपक राऊत, पोहवा/४८६, संदिप सुर्यवंशी, पोहवा/संदिप सरदार, पोहवा/राकेश पाटील, पोहवा/भगवान आव्हाड, पोहवा/दिनेश गायकवाड, पोहवा/कैलास पाटील, पोहवा/कपिल नेमाडे, मपोहवा/भारती पाटील, पोना/कल्याण केंगार, पोहवा/प्रशांत निकम, पोअमं/वैभव जामदार सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांनी केलेली आहे.
पोलीस अधीक्षक, पालघर श्री. यतिश देशमुख यांनी अंमली पदार्थांच्या विरोधी कारताई तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.