स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांची कारवाई रेकॉर्डवरील आरोपीकडून ट्रक चोरीचा गुन्हा केला उघड

सह संपादक- रणजित मस्के
सांगली :
पोलीस स्टेशन
अपराध क्र आणि कलम
फिर्यादी नाव
इस्लामपूर
१५९/२०२४ भा.दं.सं. कलम ३७९
सिकंदर उमर पठाण, रा महादेववाडी, ता वाळवा
गु.घ.ता वेळ
गु.दा.ता वेळ
माहिती कशी प्राप्त झाली
दि. २३/०४/२०२४ रोजी रात्री
२६/०४/२०२४ रोजी २०.३८ वा.
पोशि/संकेत कानडे
१०.०० वाजता ते दि. २४/०४/२०२४ रोजीचे सकाळी ०८.०० वा. दरम्यान
पोशि/ऋषीकेश सदामते पोशि/अजय बेंदरे
कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार
मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे,
मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांचे मार्गदर्शानाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सांगली सहा. पोलीस निरीक्षक, जयदिप कळेकर, स्था. गु. अ. शाखा, सांगली सपोफौ / अनिल ऐनापुरे, पोहेकॉ संदिप पाटील, गुंडोपंत दोरकर, अमोल ऐदाळे, आमसिद्ध खोत, पोना / अनंत कुडाळकर, पोशि / संकेत कानडे, ऋषिकेश सदामते, अजय बेंदरे
पोशि / विजय पाटणकर, कॅप्टन गुंडवाडे सायबर पोलीस ठाणे
अटक दिनांक दि.२४/०१/२०२४ रोजी
आरोपींची नावे व पत्ते
१. असिफ राजू शेख, वय ३९ वर्षे, रा कोल्हापूर रोड, सुतार प्लॉट ९. सांगली, सध्या रा वाडीवसाहत कोल्हापूर.
२. महाबुबसहाब बाबुसाब हकीम, वय ४९ वर्षे, रा कारवार रोड विशालनगर, जागीरदार प्लॉट, हुबळी, राज्य कर्नाटक, सध्या रा सांगली
३. महंमद आयुब पंतोजी, रा कारवार रोड विशालनगर, हुबळी, राज्य कर्नाटक (परागंदा)
जप्त मुद्देमाल
१) ९८,०००/-रू. रोख रक्कम ट्रक स्क्रैप करून त्यातून मिळविलेली
९८,०००/-रू. एकूण
गुन्हयाची थोडक्यात हकीकत –
मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करून, मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.
सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक, जयदिप कळेकर व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन चोरीचे गुन्हे करणारे संशयित इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते.
त्या अनुशंगाने सहा पोलीस निरीक्षक जयदिप कळेकर यांचे पथकामधील पोशि / संकेत कानडे, पोशि / ऋषिकेश सदामते व पोशि / अजय बेंदरे यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की, सांगली रेल्वे स्टेशन येथे रेकॉर्डवरील आरोपी असिफ राजु शेख हा येणार आहे.
नमुद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे सांगली येथील रेल्वे स्टेशन येथे जावून सापळा लावून थांबले असता रेकॉर्डवरील आरोपी आसिफ शेख व एक अनोळखी इसम यांचा पैशाचा व्यवहार चालू असताना दिसला. तसा त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांना सहा पोलीस निरीक्षक जयदिप कळेकर व पथकाने पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेवून त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे १) असिफ राजू शेख, वय ३९ वर्षे, रा कोल्हापूर रोड, सुतार प्लॉट ९, सांगली, सध्या रा वाडीवसाहत कोल्हापूर. २) महाबुबसहाब बाबुसाब हकीम, वय ४९ वर्षे, रा कारवार रोड विशालनगर, जागीरदार प्लॉट, हुबळी, राज्य कर्नाटक, सध्या रा सांगली अशी सांगितली. सहा पोलीस निरीक्षक जयदिप कळेकर यांनी त्यांचे अंगझडतीचा उद्देश कळवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता, महावुबसहाब हकीम याचे पॅटचे खिशामध्ये रोख रक्कम मिळून आली. त्यांना सदर रोख रकमेबाबत विचारणा केली असता आसिफ शेख याने सांगितले की, पेतनाका मनीकंडण हॉटेल येथून ट्रकचे कुलूप दगडाने तोडून ड्रायव्हर केबीनमध्ये प्रवेश करून लोखंडी खिळयाचे सहाय्याने ट्रक चालू करून हुबळी येथील महंमद आयुब पंतोजी, रा कारवार रोड, विशालनगर, हुबळी, राज्य कर्नाटक यास ट्रक स्क्रैप करण्यासाठी दिला होता. महंमद पंतोजी याने सदरचा ट्रक स्क्रैप करीता महाबुबसहाब हकीम यास दिला होता. तरी महाबुबसहाब हकीम हा या ठिकाणी स्क्रैप केलेल्या ट्रकचे पेसै देण्यासाठी आला आहे असे सांगितले.
सदर बाबत इस्लामपूर पोलीस ठाणेचा क्राईम अभिलेख तपासला असता वरीलप्रमाणे गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली. लागलीच त्यांचे कब्जातील रोख रक्कम पुढील तपास कामी सहा पोलीस निरीक्षक जयदिप कळेकर यांनी पंचासमक्ष जप्त केली आहे.
आरोपी असिफ राजू शेख हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचे वर यापूर्वी सांगली शहर, सांगली ग्रामीण, इस्लामपूर व सातारा जिल्हयामध्ये गुन्हे दाखल आहेत.
सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी इस्लामपूर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असुन पुढील तपास इस्लामपूर पोलीस ठाणे करीत आहेत.