गांजाची तस्करी व विक्री करणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यानी ठोकल्या बेड्या…

0
Spread the love

उपसंपादक- रणजित मस्के

सांगली : सांगली जिल्हयात विक्रीसाठी आणलेला रु २०,४०,०००/- वीस लाख चाळीस हजार किमंतीचा १०२ किलो गांजा व दोन कार असा एकुण २८,९०,०००/- रु चा मुद्देमाल जप्त केला आहे.

गु.घ.ता वेळ २२.०२.२३ रोजी

गुंगीकारक औषधीद्रव्य आणि
मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ प्रमाणे गुन्हा दाखल.

फिर्यादी नाव

संदीप आनंदा पाटील पोहेकॉ / २०६३ नेम स्थानिक गुन्हे शाखा सांगली

सांगली माहिती कशी प्राप्त झाली पोकों आर्यन देशिंगकर नेमणुक :- स्था.गु.अ. शाखा, सांगली.

कारवाई करणारे अधिकारी आणि अमलदार मा. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली.

अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांचे मार्गदर्शनाखाली

पोलीस निरीक्षक सतिश शिंदे स्था.गु.अ. शाखा सांगली,
सहा. पोलीस निरीक्षक संदीप शिंदे स्था.गु.अ. शाखा सांगली,
पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर स्था.गु.अ. शाखा सांगली,
पोहेकॉ / ११८ जितेंद्र जाधव, पोहेकॉ / २६८ राजु शिरोळकर, पोहेकॉ / १७६३ संदीप पाटील, पोहेकॉ / ५३९
मच्छींद्र बर्डे, पोहेकॉ / ६१९ अमोल ऐदाळे, पोहेकॉ / १६७८ राहुल जाधव, पोहेकॉ / १६७० संकेत मगदुम, फोटोग्राफर पोहेकॉ १८६९ प्रविण शिंदे पोकों / २६१६ सचिन कनप, पोकों / ११७ आर्यन देशिंगकर, पोकों / ७९३ गौतम कांबळे, पोकों / १३४ अजय बेंदरे, पोकों / कॅप्टन गुंडवाडे.

आरोपीचे नाव पत्ता

१. अदिल नासीर शहापुरे वय ३३ रा. बाबर गल्ली, कोल्हापूर रोड, सांगली २. सचिन बाबासो चव्हाण वय ३१ रा. जि.प.शाळेजवळ, कवठेपिरान, ता. मिरज, जि. सांगली.
३. मयुर सुभाष कोळी वय ३३ रा. १०० फुटी रोड, डी मार्टच्या पाठीमागे, सांगली
४. मतीन रफिक पठाण वय ३१ रा. काटकर गिरणी समोर, राधाकृष्ण वसाहत, सांगली.

ताब्यात दिनांक २२.२.२०१३ रोजी घेण्यात आले.

गुन्हयातील जप्त मुद्देमाल
१) २०,४०,०००/- रु. किंमतीचा १०२ किलो वाळलेला गांजा

२) ५,००,०००/- रु. किंमतीची पांढऱ्या रंगाची मारुती इर्टिगा चार चाकी गाडी

(३) ३,५०,०००/- रु. किंमतीची रिओ प्रिमीअर चार चाकी गाडी असा एकुण २८,९०,०००/- रु (अठठावीस लाख नव्वद हजार रु.) किंमतीचा मुद्देमाल जप्त

हकीकत
मा. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल मॅडम यांनी आढावा बैठकीमध्ये सांगली जिल्हयातील गांजा विक्री व तस्करी करणारे इसमाचा शोध घेऊन त्यांचेवर गुन्हे दाखल करुन त्यांचेवर कठोर कारवाई करण्याबाबत पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सुचना दिल्या होत्या. सांगली यांना

सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे स्था.गु.अ. शाखा यांनी गुन्हे अन्वेषण शाखेकडील

सपोनि संदीप शिंदे यांचे वरीलप्रमाणे पथक तयार करुन गांजा विक्री करणारे इसमाचा शोध घेऊन त्यांचेवर कारवाई

करण्याबाबत आदेशित केले होते.

नमुद पथकाने सांगली जिल्ह्यातील गांजा विक्री करणारे इसमांवरती लक्ष केंद्रीत करुन गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली असता, पोकों आर्यन देशिंगकर यांना माहिती मिळाली की, कवठेपिरान से सर्वोदय | कारखाना जाणारे रोडवर असले बाबासो चव्हाण यांचे शेता मध्ये इसम नामे १) अदिल शहापुरे, रा. सांगली २) सचिन चव्हाण, रा. कवठेपिरान, ता. मिरज हे त्यांचेकडील गांजा अंमली पदार्थ विक्री करीता घेवून येणार असल्याचे | विश्वसनीय व खात्रीशीर बातमी मिळाली, सदर बातमीबाबत तात्काळ वरिष्ठांना माहिती देवून मा. वरिष्ठांनी दिलेल्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे वरीलप्रमाणे नमुद पथक तयार केले व कार्यवाही साठी रवाना केले.

वरील सपोनि संदीप शिंदे व त्यांचे पथकाने शासकीय पंच व इतर आवश्यक साहित्यासह सदर बातमीतील नमुद ठिकाणी छुप्या पद्धतीने चालाखीने सापळा लावून पाहणी केली असता सदर ठिकाणी जावुन ठिकाणी दोन वाहने संशयास्पदरित्या उभे असलेले व सदर ठिकाणी ०४ इसम संशयीत हालचाली करीत असल्याचे दिसुन आल्याने नमुद पथक व पंचांना सदर इसमांचा संशय आल्याने व सदरचे इसम बातमीप्रमाणे असल्याचे खात्री झाल्याने सपोनि संदीप शिंदे व त्यांचे पथकाने सर्व बाजुने पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने छापा मारला असता, सदर इसम पळून जाण्याचे तयारीत असताना पोलीसांनी त्यांना जागीच पकडून मिळुन आले इसमांना पंचासमक्ष त्यांचे नाव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे १. अदिल नासीर शहापुरे वय ३३ रा.बाबर गल्ली, कोल्हापूर रोड सांगली २. सचिन बाबासो चव्हाण वय ३१ रा. जि.प. शाळेजवळ, कवठेपिराण ता. मिरज जि.सांगली. ३. मयुर | सुभाष कोळी वय ३३ रा. १०० फुटी रोड, डी मार्टच्या पाठीमागे सांगली ४. मतीन रफिक पठाण वय ३१ रा. काटकर गिरणी समोर राधाकृष्ण वसाहत सांगली अशी असल्याचे सांगीतले. सदर इसमांना सदर ठिकाणी हजर असण्याचे कारण विचारले असता ते काही एक समाधानकारक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे देवु लागले त्यांना मिळाले बातमीची हकीकत कळवून त्यांची अंगझडती घेवून त्यांच्या कब्जातील पांढरे रंगांची इंरटिगा कार वाहन क्र एमएच १० बी एम ७८३३ व पांढरे रंगांची रिओ प्रिमीअर कार वाहन क्र एमएच १० बीएम ४५३४ या वाहनांची झडती घेतली असता त्यामध्ये सांगली व इतर जिल्हयात विक्रीसाठी आणलेला रु २०,४०,०००/- ( बीस लाख चाळीस हजार ) किमतीचा १०२ किलो वजनाचा हिरवट काळपट रंगांचा उग्र वासाचा तयार गांजा व गुन्हयात वापरलेले दोन चार | चाकी वाहन असा एकुण २८,९०,०००/- रु चा मुद्देमाल मिळून आल्याने तो सविस्तर पंचनाम्याने जप्त करुन घेवुन आरोपींना पुढील तपासकामी तावेत घेतले आहे. आरोपीविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट