स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यानी देशी बनावटीची १ पिस्टल, ३ जिवंत काडतुसे व स्कार्पिओ असा एकुण ७,५०,६००/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करुन २ आरोपीस केले जेरबंद…
उपसंपादक – रणजित मस्के
सांगली : भारतीय हत्यार अधिनियम कलम
१९५९ चे आर्म अॅक्ट ३२५ प्रमाणे
२५.०३.२०२३ रोजी १४.०५ वा

फिर्यादी नाव
गौतम भिमराव कांबळे, नेम- स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली याना गोपनीय बातमीदारामार्फत पोकों सचिन कनप, गौतम कांबळे, सुनिल जाधव
कारवाई करणारे अधिकारी आणि अमलदार मा. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली,मा. अपर पोलीस अधीक्षक बापु बांगर, सातारा (अतिरिक्त कार्यभार),यांचे मार्गदर्शनाखाली
१) पोलीस निरीक्षक सतिश शिंदे २) पोलीस निरीक्षक शरद मेंमाणे ३) सहा पोलीस निरीक्षक संदीप शिंदे
४) पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर अमोल ऐदाळे, सचिन कनप, सुनिल जाधव, मच्छिद्र बर्डे, गौतम कांबळे, अजय बेंद्रे, आर्यन देशिंगकर, संदीप पाटील
प्रकाश पाटील, कॅप्टन गुंडवाडे, आटपाडी पो ठाणे कडील पोहेकॉ उमर फकीर, पोकों प्रमोद रोडे यानी आरोपीस अटक दिनांक
२५.०३.२०२३ रोजी केली .
आरोपीचे नाव पत्ता
१. परशुराम रमेश करवले, वय २३, रा. कृष्णामाई घाट समोर, कराड सध्या रा. साठे नगर चौक, आटपाडी.
२. रविराज दत्तात्रय गोरवे, वय १९, रा. मनिषा नगर, महुद, ता. सांगोला, जि. सोलापूर.
जप्त मुद्देमाल
१) ५०,०००/- रू अंदाजे किंमतीचे एक देशी बनावटीचे अग्निशस्त्र ( पिस्टल )
२) ६०० /- रु अंदाजे किंमतीचे ०३ जिवंत काडतुसे
३) ७,००,०००/- रु. अंदाजे किंमतीची महिंद्रा स्कार्पिओ चारचाकी वाहन.
एकुण ७,५०,६००/- रुपये किंमतीची देशी बनावटीचे एक अग्निशस्त्र ( पिस्टल) व ०३ जिवंत काडतुसे, वाहन.
गुन्हयाची थोडक्यात हकीकत
मा. पोलीस अधिक्षक डॉ बसवराज तेली, मा. अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर (अतिरिक्त कार्यभार) यांनी पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांना सांगली जिल्हयातील अवैध शस्त्रे बाळगणारे इसमाची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करण्यातबाबत आदेशीत केले होते.
त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे स्था. गु.अ. शाखा व पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, आटपाडी पोलीस ठाणे यांनी सपोनि संदीप शिंदे, स्थागुअ, शाखा सांगली यांचे सोबत वरील नमुद अंमलदार यांचे एक पथक तयार करुन सांगली जिल्हयातील विटा विभागातील आटपाडी पोलीस ठाणे हद्दीतील अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे वरील सपोनि संदीप शिंदे यांचे पथक आटपाडी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत अवैध शस्त्रे बाळगणा-या इसमांची माहिती घेत असताना पोकों सचिन कनप, गौतम कांबळे, सुनिल जाधव नेम. स्थागुअ, शाखा सांगली यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एका काळे रंगाच्या महिंद्रा स्कार्पिओ चारचाकी वाहनातुन एक इसम अवैध विनापरवाना पिस्टल (अग्निशस्त्र) विक्रीसाठी आटपाडी ते आवळाई जाणारे रोडवर असले गुरुकुल शाळेच्या लगत मोकळया मैदानात येणार आहे. मिळालेल्या बातमीची खात्री करुन लागलीच नमुद पथक तयार करुन | आटपाडी ते आवळाई जाणारे रोडवर असले गुरुकुल शाळेच्या लगत मोकळया मैदानात सापळा लावून थांबले असता काहीवेळाने तेथे बातमीतील वर्णनाप्रमाणे एक काळया रंगाची महिंद्रा स्कार्पिओ चारचाकी येवून थाबली. काहीवेळातच एक इसम नमुद गाडीजवळ येवून गाडीत जावून बसला, सदर इसमांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने पथकाने तात्काळ पंचासोबत जावून शिताफीने स्कॉर्पिओ वाहनावर छापा मारुन त्यातील दोन इसमांना ताब्यात घेतले, पंचासमक्ष त्यांना | त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे परशुराम रमेश करवले, वय २३, रा. कुष्णामाई घाट समोर, कराड सध्या रा. साठे नगर चौक, आटपाडी २. रविराज दत्तात्रय गोरवे, वय १९, रा. मनिषा नगर, महुद, ता. सांगोला, जि. सोलापूर असे सांगीतले.
आरोपी यांना तात्काळ ताब्यात घेवून त्यांची सपोनि संदीप शिंदे व पोलीस पथकाने पंचासमक्ष अंगझडती घेतली असता, आरोपी परशुराम करवले यांचे पॅटचे कंबरेला खोचलेले एक देशी बनावटीचे पिस्टल (अग्निशत्र) व पँटचे खिशात जिवंत ०३ काडतुसे मिळून आले. आरोपींकडे सदर देशी बनावटीचे पिस्टल (अग्निशत्र) व जिवंत ०३ काडतुसे बाबत विचारपुस केली असता त्यांनी त्यांचेकडे कसल्याही प्रकारचे परवाना नसुन ते अवैधरित्या रविराज गोरवे, रा. महुद, जि. सोलापूर यास विक्री करण्यासाठी आणले असल्याचे सांगीतले आहे.
वरील प्रमाणे छापा टाकून सपोनि संदीप शिंदे व पथकाने गुन्हयात वापरलेले वाहन महिंद्रा स्कार्पिओ, एक देशी बनावटीचे पिस्टल (अग्निशत्र) व जिवंत ०३ काडतुसे असा एकुण ७,५०,६००/- रु सात लाख पन्नास हजार सहाशे रु.) किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींचे विरुध्द आटपाडी पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार अधिनियम कलम १९५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
आरोपी व मुद्देमाल आटपाडी पोलीस ठाणे कडे जमा करण्यात आला आहे. पुढील तपास आटपाडी पोलीस ठाणे करीत आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com