स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यानी जबरी चोरी करणारे २ आरोपी केले जेरबंद…

उपसंपादक-रणजित मस्के
सांगली :-पोलीस स्टेशन विश्रामबाग पोलीस ठाणे
अपराध क्र आणि कलम
गु.र.नं.३०२/२०२४, बी. एन. एस. २०२३ कलम ३०१ (४), ३(५) प्रमाणे,
फिर्यादी नाव
सुरेश बाबुराव चव्हाण, रा. आवळे प्लॉट गणेश नगर, सांगली.
गु.प.ता वेळ दि. २५/०८/२०२४ रोजी दुपारी १५.०० या ते १५.३० वा चे दरम्यान
गु.दा.ता वेळ ता. २५/०८/२०२४ रोजी २१.०० वा.
माहिती कशी प्राप्त झाली पोशि १४७९/ रुपेश होळकर, पाशि २३६६/ संकेत फानडे, पोशि १३४/ अजय बेदरे.
कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली. मा. रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली. यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, रथा. गु. अ. शाखा, सहा पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सपोफी/ अनिल ऐनापुरे, पोहेकों/ अमोल ऐदाळे, इम्रान मुल्ला, अमोल लोहार, पोना / सोमनाथ गुंडे, पोशि/ रुपेश होळकर, अजय बंदरे, विनायक सुतार, संकेत कानडे, सुमित सुर्यवंशी, स्था. गु. अ. शाखा पोहेकों/ करण परदेशी, पोशि कॅप्टन गुंडवाडे सायबर पोलीस ठाणे. अटक वेळ दिनांक दि. २६/०८/२०१७ रोजी
आरोपीचे नांव पत्ता
१. सागर सुरेश चौगुले, वय ३३ वर्षे, रा. जयभिम कड्याच्या पाठीमागे, इंदीरानगर, विश्रामचाग सांगली.
२. सुखदेव संगाप्पा कांबळे, वय ४२ वर्षे, रा. हनुमानगर, ५ वी गल्ली, विश्रामबाग, सांगली. गुन्हयाची थोडक्यात हकीकत
मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस जबरी चोरीचे गुन्हे करणारे इसमांची माहिती कावुन त्यांचेवर कारवाई करून, जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.
सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक संदीप शिंदे व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन जबरी चोरी करणारे संशयीत इसमांची माहिती कावुन त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते.
त्या अनुशंगाने दि. २६/०८/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांचे पथकातील पोशि रुपेश होळकर, संकेत कानडे व अजय बेंद्रे यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, विश्रामचाग पोलीस ठाणे हद्दीत त्रिमुती चौकातील दुकानात जबरी चोरीची घटना घडली होती. सदर गुन्हयातील जबरी चोरी करणारे २ इमस तक्षशिला शाळेकडे जाणारे
रोडपर रामकृष्ण मंदीराजवळ फिरत आहेत अशी खात्रीलायक बातमी मिळाली.
नमुद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे तक्षशिला शाळेकडे जाणारे रोडवरील रामकृष्ण मंदीर परिसरात सापळा रचुन निगराणी करीत असताना, बातमीतील नमुद हकिकती प्रमाणे २ इसम पोलीस पथकाला पाहून पळून जावू लागले असता सहा. पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांचे पथकाने सदर इसमांना पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेवून त्यांची नाव व गाव विचारता त्यांनी त्यांची नावे
१) सागर सुरेश चौगुले, वय ३३ वर्षे, रा. जयभिम कड्याच्चा पार्टीमागे, इंदीरानगर, विश्रामबाग सांगली.
२) सुखदेव संगाप्पा कांबळे, वय ४२ वर्षे, रा. हनुमानगर, ५ वी गल्ली, विश्रामबाग, सांगली अशी असल्याचे सांगितले. सहा पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी विश्वामबाग पोलीस ठाणेस दाखल जबरी चोरीच्या अनुषंगाने चौकशी केली असता, त्यांनी सदर गुन्हा केला असल्याची कबुली दिली. सुखदेव कांबळे हा
रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचेवर विश्रामबाग पोलीस ठाणेत खुनाचा गुन्हा दाखल आहे. सदर आरोपीना पुढील तपास कामी विश्रामबाग पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आले असून गुन्हयाचा पुढील तपास विश्रामधाग पोलीस ठाणे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com