स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी घरफोडी चोरी करणारे रेकॉर्डवरील सराईत आरोपीस केले जेरबंद…

उपसंपादक-रणजित मस्के
सांगली :- दि. ०५.०२.२०२४ रोजीचे दुपारी १६:०० वा ते दि. ०६.०२.२०२४ रोजीचे रात्री ०९:३० वा चे दरम्यान
गु.र.नं. ४७/२०२४ भादविस कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे
गु.दा. ता. वेळ
ता. ०७.०२.२०२४ रोजी १६.०५ वा.
फिर्यादी नाव
विनोद श्रीचंद खत्री, रा. समर्थ कॉलनी, कोल्हापुर रोड, सांगली.
माहिती कशी प्राप्त झाली
सपोफी / अनिल ऐनापुरे, पोकों/ विनायक सुतार, पोकों/ सुनिल जाधव.
कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार
मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांचे मार्गदर्शानाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार, सपोफी/ अनिल ऐनापुरे, पोहेकों/ सचिन धोत्रे, कुबेर खोत, अरुण पाटील, पोना/ प्रकाश पाटील पोशि / विनायक सुतार, अभिजीत ठाणेकर, सुनिल जाधव, रोहन घस्ते, सुरज थोरात, सायबर पोलीस ठाणेकडील पोना/ श्रीधर बागडी, पोशि/ कॅप्टन गुंडवाडे, स्वप्निल नायकोडे, अजित पाटील.

अटक वेळ दिनांक दि.१३/०२/२०२४ रोजी
आरोपीचे नांव पत्ता
१. राजु प्रकाश नागरगोजे, बय ३६ वर्षे, मुळ रा. सांवतगल्ली, उचगाव, ता. कोल्हापुर, जि. कोल्हापुर. सध्या रा. बारशी रोड, बाळे, ता. उत्तर सोलापुर, जि. सोलापुर.
२. नितेश आडवय्या चिकमठ, वय २९ वर्षे, रा. सावरकर कॉलनी, गल्ली नं. २, विश्रामबाग, सांगली.
जप्त मुद्देमाल
१. ८,५२,०००/- रु. किंमतीचे १८० ग्रॅम वजनाचे सोन्याचे वेगवेगळे दागिने त्यात बांगडया, मंगळसुत्र,
कंकण ब्रासलेट, चैनी, कर्णफुले, शिक्के आणि अंगठया असे जु. वा. किं. अं.
२. २०,००,०००/- रु. किंमतीच्या ५००, २०० आणि १०० रुपयांच्या भारतीय चलनी नोटा.
३. ८०,०००/- रु. किंमतीची सुझुकी कंपनीची निळ्या रंगाची मोपेड मोटार सायकल जु.वा.किं.अं.
२९,३२,०००/- ( एकोणतीस लाख बत्तीस हजार हजार रुपये)
गुन्हयाची थोडक्यात हकीकत-
दि. ०७.२.२०२४ रोजी फिर्यादी नामे विनोद श्रीचंद खत्री, रा. सांगली हे त्यांचे कुटूंबियांसोबत त्यांचे
मुलीचे लग्नाकरीता कोल्हापुर येथे गेले असता, अज्ञात चोरटयाने फिर्यादीचा बंगला फोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती.
गुन्हयाचे गांभीर्य पाहता मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे तसेच मा.
अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांनी स्वतः घटनास्थळी भेट देवून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मार्गदर्शन केले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com