स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी घरफोडी चोरी करणारा आरोपी जेरबंद करून १७,६५,०००/- रु चा मुद्देमाल केला हस्तगत.

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सांगली :– मिरज शहर पोलीस ठाणे

गु.र.नं. १४६/२०२४ भादविसं कलम ४५४,४५७, ३८० प्रमाणे

शैलेश सतिश चौगुले, रा. टाकळी रोड, सिद्धीविनायक कॉलनी, मिरज,

गु.घ.ता वेळ

दि.०७.०४.२०२४ रोजी रात्री २१.०० वा ते दि.०८/०४/२०२४ रोजीचे सकाळी ०९.०० चे दरम्यान

गु.दा.ता येळ

माहिती कशी प्राप्त झाली

ता. १०.०४.२०२४ रोजी १९.२१ वा.

पोना ९८७ / सोमनाथ गुंडे

कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार

सहा. पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, स्था.गु. अ. शाखा, पोहेकों / अमोल लोहार, अमोल ऐदाळे, संकेत मगदूम, पोना/ सोमनाथ गुंडे, प्रकाश पाटील, पोशि / सुनिल जाधव, अजय बेंदरे, सोमनाथ पतंगे, पोशि / कॅप्टन गुंडवाडे सायबर पोलीस ठाणे.

अटक येळ दिनांक दि.२१/०५/२०२४ रोजी

आरोपीचे नांव पत्ता

अमित राकेश पंचम, वय ३० वर्षे, सध्या रा. वानलेसवाडी, सांगली मुळ रा. राबोडी, शिवाजीनगर, ठाणे. उघडकीस आलेले गुन्हे

१. मिरज शहर पोलीस ठाणे गु. र. नं. १४५/२०२४ भादविर्स कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे.

२. मिरज शहर पोलीस ठाणे गु. र. नं. १४६/२०२४ भादविर्स कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे. ३. नौपाडा पोलीस ठाणे, जि. ठाणे, गु. र. नं. ४५५/२०२४ भादविसं कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे.

जप्त मुद्देमाल . १७,६१,०००/- रु. किंमतीचे २१० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्यात ब्रासलेट, अंगठ्या, कर्णफुले,

१ २. चैन, नेकलेस, मोहनमाळ, वेढण असे जु. वा. किं. अं. ४,०००/- रू. किंमतीचे ८० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने त्यात पैंजण, पणत्या असे जु. वा. किं, अं.
१७,६५,०००/- (सतरा लाख पासष्ठ हजार रुपये)

गुन्हयाची थोडक्यात हकीकत

मा. पोलीस अधीक्षक, सांगली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.

सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन घरफोडी चोरीचे गुन्हे करणारे संशयित इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते.

त्या अनुशंगाने दि. २१/०५/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे पथकांतील पोना / सोमनाथ गुंडे यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराकडुन
बातमी मिळाली की, अमित पंचम रा. ठाणे सध्या रा. वानलेसवाडी हा मिरज ते अर्जुनवाड जाणारे रोडवर असले नॅशनल हायवेच्या पुलाखाली चोरीतील सोन्याचे दागिने विक्री करणेकरीला येणार आहे.

नमुद पथक मिळाले बातमीप्रमाणे, मिरज ते अर्जुनवाड जाणारे रोडवर असले नॅशनल हायवेच्या पुलाचे परीसरात सापळा लावून निगराणी करीत असताना, एक इसम पुलाखाली येवून थांबलेला दिसला. त्याचा बातमीप्रमाणे संशय आलेने सहा. पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व पथकाने सदर इसमास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेवून त्यास त्याचे नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव अमित राकेश पंचम, वय ३० वर्षे, सध्या रा. वानलेसवाडी, सांगली मुळ रा. राबोडी, शिवाजीनगर, ठाणे. असे असलेचे सांगितले. सहा. पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी त्याचे अंगझडतीचा उददेश कळवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता, त्याचे हातातील पिशवीत वरील वर्णनाचे सोन्याचे व चांदीचे दागिने मिळून आले. त्यास सदर दागिन्याबाचत विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. सहा. पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी त्यास विश्वासात घेवून त्याचेकडे चौकशी केली असता त्याने सागितले की, त्याचेजवळ मिळुन आलेले सोन्या चांदीचे दागिने हे मिरज व नौपाडा जि. ठाणे येथे घरफोडी चोरी केली होती त्यातीलच हे दागिने असल्याची कबूली दिली.

सदर बाचत मिरज शहर व नौपाडा, जि. ठाणे या पोलीस ठाणेचा क्राईम अभिलेख तपासला असता, वरीलप्रमाणे घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली. लागलीच त्याचे कच्जातील सोन्याचांदीचे दागिने पुढील तपास कामी सहा. पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी पंचासमक्ष जप्त केले. अमित पंचम हा रेकार्डवरील आरोपी असून यापुर्वी त्याचेवर घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी मिरज शहर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असुन पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट