स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी डोर्ली फाटा, बलगवडे ता. तासगाव येथील खुनाचा गुन्हा उघड करुन आरोपीस केले अटक..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सांगली :-तासगाव, पोलीस ठाणे

गु.र.नं. ४२६/२०२४, बी.एन.एस २०२३ कलम १०३ (१), ३३२ (अ) प्रमाणे

अमित गणपती शिंदे, वय ३९ वर्षे, पत्ता बलगवडे, ता. खानापुर

गु.घ.ता वेळ

गु.दा.ता वेळ दिनांक २६.०९.२०२४ रोजी १७.३५

माहिती कशी प्राप्त झाली

पोहवा/७१२ सागर टिंगरे, पोहवा/२५६ द-याप्पा बंडगर, पोना/१५३८ प्रकाश पाटील पोहवा/१३३३ अमरसिंह सुर्यवंशी पोकों/२२१६ विठ्ठल सानप

दिनांक २६.०९.२०२४ रोजी सकाळी ०९.०० वा.चे पुर्वी फिर्यादीचे राहते घरात डोर्ली फाटा, बलगवडे

कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली.मा. रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली.

यांचे मागदर्शनाखाली

सचिन थोरबोले, उपविभागीय पोलीस अधिकारी, तासगाव विभाग, तासगाव पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा,

पोलीस निरीक्षक, सोमनाथ वाघ, तासगाव पो. ठाणे,
सहा, पोलीस निरीक्षक पंकज पवार, स्था. गु. अ. शाखा,
सहा. पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे, सायबर पोलीस ठाणे,
पोहवा/सागर टिंगरे, द-याप्पा बंडगर अरुण पाटील, सतिश माने,
पोना/ प्रकाश पाटील, सोमनाथ गुंडे, संदीप नलावडे, पोशि / सुरज थोरात, अभिजीत ठाणेकर, विनायक सुतार, रोहन गस्ते स्था. गु. अ. शाखा, पोशि/ कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर सायबर पोलीस ठाणे. पोहवा / अमरसिंह सुर्यवंशी, सयाजी पाटील, पोना/ प्रशांत चव्हाण, सुहास खुबीकर, पोकों/ विवेक यादय विठ्ठल सानप तासगाव पो. ठाणे

अटक वेळ दिनांक दि. २७/०९/२०२४ रोजी

आरोपीचे नांव पत्ता

१) वैष्णव विठ्ठल पाटील, वय १९ वर्षे, पत्ता बलगवडे, ता. तासगाव जि. सांगली.

गुन्हयाची थोडक्यात हकीकत :-

वरील तारखेस वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी यांचे राहते घरात फिर्यादी यांचे मयत वडील गणपती धोंडीराम शिंदे, वय ६५ वर्षे, पत्ता बलगवडे, ता. तासगाव यांचा कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्यातरी अज्ञात कारणास्तव फिर्यादीचे घरात घुसून फिर्यादीचे वडील यांचे डोक्यात व कपाळावर लोखंडी रॉडने मारहाण करुन गंभीर जखमी करुन खुन केला असलेबाबत वरीलप्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्हयाच्या अनुशंगाने मा. पोलीस अधीक्षक, संदीप घुगे यांनी घटनास्थळी भेट देवून सदर गुन्हयाची तात्काळ उकल करणेबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व तासगाव पोलीस ठाणेस सुचना देवुन मार्गदर्शन केले होते.

वरीष्ठांचे सुचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व तासगाव पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांची पथके तयार करुन अज्ञात आरोपीचा शोध घेणेसाठी रवाना केली.

समांतर तपासा दरम्यान
घटनास्थळाचे निरीक्षण व इतर गोपनीय माहितीच्या आधारे वैष्णव विठ्ठल पाटील याचे हालचालीबाबत संशय निर्माण झाल्याने त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके सोलापुर व उस्मानाबाद या जिल्हयात रवाना होऊन तपास करीत असताना स्था. गु. अ. शाखा, सांगलीचे वरील पोलीस पथकास संशयित वैष्णव विठ्ठल पाटील हा मौजे देवगाव, ता. परांडा, जि. उस्मानाबाद येथे असलेबाबत माहिती प्राप्त झाल्याने तेथे जावुन त्यास ताब्यात घेण्यात आले.

ताब्यात घेतले संशयिताकडे गुन्हयाचे भुनषंगाने समांतर तपास केला असता त्यांने मयत यांची त्याचे चार चाकी स्वीफ्ट डिझायर गाडी विकून पैसे मिळयायचे व मयत गाडी मालकाने ती परत मागु नये या कारणास्तव गणपती शिंदे यांचा खुन केल्याची कबुली दिलेली आहे.

सदर आरोपीस पुढील तपास कामी तासगाव पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असुन पुढील तपास तासगाव पोलीस ठाणे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट