स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी शेतक-यांच्या पाण्याच्या मोटार व ट्रॅक्टर ट्रॉली चोरी करणारा इसमास जेरबंद, करुन ०४ गुन्हे उघडकीस आणुन एकुण १,७७,०००/- रु. (एक लाख सत्त्याहत्तर हजार रु.) किंमतीचा मुद्देमाल केला जप्त…
उपसंपादक-रणजित मस्के
सांगली: तासगांव पोलीस ठाण्यात
गुरनं २५/२०२२ भादविस शहाजी दत्ताजी जाधव वय ६६ रा, येळावी ता. तासगाव जि. सांगली यानी
दि.१४.१.२०२२ रोजी
गु.दा.ता वेळ २०.१.२०२२ रोजी १४.५९ वा केला.
माहिती कशी प्राप्त झाली
गोपनिय बातमीदार सचिन कनप, गौतम कांबळे, सुनिल जाधव
कारवाई करणारे अधिकारी आणि अमलदार
मा. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेलीयांचे मार्गदर्शनाखाली
१) पोलीस निरीक्षक सतिश शिंदे २) सपोनि संदीप शिंदे सचिन कनप, गौतम कांबळे, सुनिल जाधव, संदीप पाटील, आमसिध्दा खोत, सुधीर गोरे, राजु शिरोळकर, आर्यन देशिंगकर, अजय बेद्रे, ऋषीकेश सदामते, महेश संकपाळ, संकेत कानडे, कॅप्टन गुंडवाडे

आरोपीचे नाव पत्ता
अभिजीत दिलीप मंडले, वय १८ वर्षे, रा. लोढे खंडोबा मंदीराजवळ, ता. तासगाव जि. सांगली
अटक दिनांक व वेळ दिनांक ११.०४.२०२३ रोजी अभिजीत दिलीप मंडले याचे चोरीच्या गुन्हयातील जप्त मुद्देमाल
१) १२,००० /- कि एक इलेक्ट्रीक पाण्याची बोअर मोटर
२) ७,००० /- कि ची एक इलेक्ट्रीक पाण्याची पाणबुडी मोटर
३) ८,००० /- कि ची एक इलेक्ट्रीक पाण्याची पाणबुडी मोटर
४) १,५०,००० /- कि ची एक लाल रंगाची ४ चाकी ट्रॅक्टरची ट्रॉली
१,७७,०००/- यामध्ये तीन इलेक्ट्रीक पाण्याची मोटार, ४ चाकी ट्रॅक्टरची ट्रॉली असा एकुण १,७७,०००/- मुद्देमाल जप्त
उघडकीस आलेले गुन्हे ०४
१) तासगाव पोलीस ठाणे गुरनं २५ / २०२२ भादविस कलम ३७९
२) तासगाव पोलीस ठाणे गुरनं १५० / २०२१ भादवि कलम ३७९
३) तासगाव पोलीस ठाणे गुरनं १७३/२०२२ भादवि कलम ३७९
४) कागवाड पोलीस ठाणे (कर्नाटक राज्य) गुरनं १४२ / २०२२ भादवि कलम ३७९
हकीकत
सांगली जिल्हयात रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांच्या शेतीवरील पाण्याची मोटार चोरीच्या गुन्हयांबाबत मा. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, यांनी आढावा बैठक घेऊन सदरचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांना सुचना दिल्या होत्या.
सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु.अ. शाखा यांनी गुन्हे अन्वेषण शाखेकडील सपोनि संदीप शिंदे व अमलदार यांचे एक पथक तयार करुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले होते.
गोपनिय बातमीदारांच्या भेटी घेवून त्यांना सदर बाबत माहिती संकलित केली असता, पथकाती सचिन कनप, गौतम कांबळे, सुनिल जाधव यांना खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, अभिजीत मंडले रा. लोढे ता तासगाव यांने तासगाव परीसरातील नमुद पथकाने सांगली जिल्हयातील तासगाव विभागातील शेतकऱ्यांच्या शेतीवरील पाण्याची मोटार चोरीच्या अनुषंगाने शेतातील इलेक्ट्रीक मोटरी चोरी केल्या असुन त्या मोटरी त्याने त्याचे राहते घरी ठेवल्या असुन तो विक्री करणार आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने पथकाचे प्रमुख सपोनि संदीप शिंदे व त्यांचे वरील नमुद पथकाने पंचासोबत नमुद ठिकाणी जावून छापा मारुन तेथे हजर असलेल्या इसमास ताब्यात घेवून पंचासमक्ष त्याचे नाव गाव विचारले असता, त्याने त्याचे नाव अभिजीतदिलीप मंडले, वय १८ वर्षे, रा. लोढे खंडोबा मंदीराजवळ, ता. तासगाव जि. सांगली असे सांगीतले. त्यावेळी सपोनि संदीप शिंदे व पथकाने अभिजीत दिलीप मंडले याचे घराची झडती घेतली असता मिळाले माहितीप्रमाणे त्याचे घरामध्ये चोरी केलेल्या ०३ वेगवेगळ्या पाण्याच्या मोटारी लपवुन ठेवलेल्या मिळुन आल्या. आरोपीस सदर मोटार बाबत त्याचेकडे चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. त्यावेळी सपोनि संदीप शिंदे यांनी पंचासमक्ष त्यास विश्वासात घेवून कौशल्यपूर्ण तपास केला असता, अभिजीत मंडले याने सांगीतले की, त्याने काहीदिवसांपासून येळावीच्या ओढयातुन, कॅनॉलजवळून व सावर्डे येथून ०३ पाण्याच्या मोटारी चोरल्या असल्याचे सांगीतले.
तसेच सपोनि संदीप शिंदे यांनी आरोपीस विश्वासात घेवून कोशल्यापुर्ण तपास केला असता, अभिजीत मंडले याने त्याचे साथीदारासह मिळून लोकुर (कर्नाटक) या गावातुन एका शेतकऱ्याची ट्रॅक्टरची ट्रॉली चोरी करून आणली असलेचे देखील सांगीतले. आरोपीने कर्नाटक येथून चोरी केलेली ट्रॅक्टरची ट्रॉली व ०३ पाण्याच्या मोटारी असा एकूण १,७७,०००/- रु. (एक लाख सत्त्याहत्तर हजार रु.) किंमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष पंचनामाकरून जप्त करण्यात आला आहे. आरोपी व मुद्देमाल तासगाव पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आला आहे. पुढील तपास तासगाव पोलीस ठाणे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com