सातपाटी पोलीस ठाणे येथील दाखल घरफोडीच्या गुन्ह्याची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेस यश
उपसंपादक – रणजित मस्के
पालघर : दिनांक ०६.०२.२०२३ रोजी फिर्यादी नामे भुवनेश गणेश राऊत वय ४१ वर्षे, रा. ओहळवाडी, माहीम ता. जि. पालघर यांनी फिर्याद दिली की, कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी फिर्यादींच्या घराचा दरवाजाचा कडी कोयंडा तोडुन त्यावाटे घरात प्रवेश करून घरफोडी करुन देवघरात ठेवलेल्या घरातील चाव्या घेऊन, घराच्या बेडरुममधील लोखंडी कपाट चावीने उघडुन त्यात ठेवलेले एकुण ४,२०,०००/- रु. किमतीचे सोन्याचे दागीने, चांदीचे पैजण व रोख रक्कम घरफोडी करुन चोरी केली म्हणून फिर्यादी यांनी दिले फिर्यादी वरुन सातपाटी पोलीस ठाणे येथे गु.र.न. ०९/२०२३ भा. द. वि. स. कलम ४५४, ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे गार्भीय लक्षात घेता श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, व श्री. पंकज शिरसाठ, अपर पोलीस अधीक्षक, पालघर यांचे आदेशान्वये श्रीमती निता पाडवी, उप विभागीय पोलीस अधिकारी पालघर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सातपाटी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांची वेगवेगळी पथके तयार करुन तपासाबाबत सुचना दिल्या. त्यानुसार पोउपनि / स्वप्नील सावंतदेसाई, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांच्या पथकाने कोणतेही धागेदोरे नसतांना तांत्रीक पुराव्यांच्या आधारे सखोल व कौशल्यपूर्ण तपास करून एक संशयीत इसम वय २० वर्षे, रा. गांधीनगर, पालघर पूर्व सध्या रा. रानपुर, जि. सुरेंद्रनगर, राज्य गुजरात यास ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता संशयीत इसम हा पालघर, ठाणे, मुंबई व नाशिक या जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ अन्वये पालघर पोलीस ठाणे येथे गु.र.नं.ळा ७२/ २०२३ हा दाखल करून अटक करण्यात आले. अटकेदरम्यान नमूद आरोपीकडे कसून चौकशी केली असता सातपाटी पोलीस ठाणे येथे वर नमूद दाखल असलेला गु.र.न. ०९ / २०२३ या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. नमूद गुन्ह्यात आरोपीकडून चोरी गेलेला एकुण ४,२०,०००/- रु. किमतीचे सोन्याचे दागीने चांदीचे पैंजण व रोख रक्कम असा १०० % मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास हा पोउपनि / स्वप्नील सावंतदेसाई, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. पंकज शिरसाठ, अपर पोलीस अधीक्षक पालघर यांचे आदेशान्वये श्रीमती निता पाडवी, उप विभागीय पोलीस अधिकारी पालघर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. अनिल विभुते, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर, सपोनि / प्रेमनाथ ढोले, सातपाटी पोलीस ठाणे, पोउपनि / स्वप्नील सावंतदेसाई, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर, पोउपनि / मयुरेश अंबाजी, सातपाटी पोलीस ठाणे, पोहचा/दिलीप जनाठे, पोहवा / संजय धांगडा, पोहवा / विजय ठाकूर, पोना / कल्याण केंगार सर्व नेमणूक स्थागुशा, पालघर तसेच पोहवा / सानप, सातपाटी पोलीस ठाणे यांनी संयुक्तरीत्या यशस्वी पार पाडली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com