स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची रेकॉर्ड ब्रेक कारवाई केली असून २३ गुन्हे करणाऱ्या आरोपीस ठोकल्या बेड्या…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सातारा :– पोलीस अभिलेखावरील आरोपीकडून दरोडा, ५ जबरी चोरी, १२ घरफोडी चोरी, ५ इतर चोरी असे एकुण २३ गुन्हे उघड करुन चोरीस गेलेल्या सोन्याचे दागिण्यापैकी (चालू बाजारभावा प्रमाणे) ३२,१०,०००/- रुपये किमतीचे ५३ तोळे सोन्याचे दागिणे व ४६,०००/- रुपये किमतीचे चांदीचे दागिणे असा एकूण ३२,५६,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत.

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सातारा जिल्हयातील घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिलेल्या आहेत. त्याअनुशंगाने पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पतंग पाटील यांचे अधिपत्याखाली एक तपास पथक तयार केले आहे.

लोणंद पोलीस ठाणे गु.र.नं.४७३/२०२३ भादविक ४५४, ३८० या गुन्हयामध्ये पोलीस अभिलेखावरील आरोपी रोहित उर्फ टक्या चिवळ्या पवार रा. सुरवडी ता. फलटण जि.सातारा याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास नमुद गुन्हयाचे तपासकामी पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांनी ताब्यात घेतले. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पतंग पाटील यांनी त्याचेकडे मालमत्तेच्या गुन्हयाचे अनुशंगाने कौशल्यपूर्ण विचारपूस केली असता त्याने व त्याचे साथिदार यांनी खंडाळा, शिरवळ, लोणंद, फलटण, सासवड जि.पुणे येथे घरफोडी चोऱ्या केल्याचे सांगीतले असून आरोपी रोहित उर्फ टक्या चिवळया पवार याने व त्याच्या साथिदारांनी चोरी केलेले सोन्याच्या दागिण्यापैकी (चालू बाजारभावा प्रमाणे) ३२,१०,०००/- रुपये किमतीचे ५३.२०० तोळे सोन्याचे दागिणे व ४६,०००/- रुपये किमतीचे चांदीचे दागिणे असा एकूण ३२,५६,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन १ दरोडा, ५ जबरी चोरी, १२ घरफोडी चोरी, ५ इतर चोरी असे एकुण २३ गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.

माहे नोव्हेंबर २०१२ पासून दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, मोटार सायकलचोरी, इतर चोरी असे एकूण १३८ मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणले असून नमुद गुन्हयातील चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिण्यापैकी ३९१ तोळे सोने (३ किलो ११० ग्रॅम) असा एकूण २,३८,७४,०००/-रुपये (दोन कोटी, अडतीस लाख, चौन्याहत्तर हजार रुपये) किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रविंद्र भोरे पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, पोलीस अंमलदार विश्वनाथ सपकाळ, अतिश घाडगे, संतोष सपकाळ, विजय कांबळे, संजय शिर्के, शरद बेबले, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, सचिन साळुंखे, प्रविण फडतरे, सनी आवटे, मनोज जाधव, अमित माने, अविनाश चव्हाण, गणेश कापरे, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, राजु कांबळे, स्वप्नील कुंभार, अमित झेंडे, अजय जाधव, ओंकार यादव, विक्रम पिसाळ, मोहन पवार, अरुण पाटील, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, पृथ्वीराज जाधव, मयुर देशमुख, संकेत निकम, प्रविण पवार, आधिका वीर, शिवाजी गुरव, पंकज बेसके, अमृत करें, संभाजी साळुंखे, विजय निकम यांनी सदरची कारवाई केलेली असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केलेले आहे.
उघडकीस आलेले गुन्हे –

पोलीस ठाणे लोणंद

२१४/२०२२ भादविक ४५७, ३८०

२७०/२०२३ भादविक ४५४, ३८०, ३४

३६१/२०२३ भादविक ३८०, ४५७

३४०/२०२३ भादविक ४५७, ३८०

४७३/२०२३ भादविक ४५४, ३८०

१४/२०२३ भादविक ३९२, ३४

३७५/२०२३ भादविक ३८०

फलटण ग्रामिण

३४२/२०२२ भादविक ३८०

फलटण शहर
७३२/२०२३ भादविक ४५४, ४५७, ३८०

४४७/२०२३ भादविक ३९२, ३४

शिरवळ

१८. खंडाळा

१८५/२०१८ भादविक ३

सासवड जि.पुणे

५५७/२०२१ भादविक ३९२, ३४

५९७/२०२३ भादविक ३७९

१६१/२०२३ भादविक ३९४, ४२७, ३४

५८४/२०२३ भादयिक ४५४, ४५७, ३८०

२५४/२०२२ भादविक ३८०, ३४

२९४/२०२२ भादविक ३९२, ४५७, ४५८, ३८०, ३४

९८/२०२२ भादविक ४५४,४५७, ३८०

१२२/२०२२ भादविक ४५४,४५७, ३८०

६४/२०१८ भादविक ४५७, ३८०

५६/२०२२ भादविक ४५७, ३८०, ३४

१३३/२०२३ भादविक ४५४, ४५७, ३८०

३१२/२०२३ भादविक ३९५.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट