स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांनी Pickpocketing करणारी टोळी ताब्यात घेवून केली रेकॉर्ड ब्रेक कारवाई…

उपसंपादक-रणजित मस्के
सातारा :– सातारा जिल्हयातील बस स्थानक परिसरामध्ये गर्दीचा फायदा घेवून प्रवाश्यांचे सोन्याचे दागिणे, साहित्य याची चोरी करणाऱ्या टोळींना ताब्यात घेवून त्यांचेकडून चालू बाजारभावाप्रमाणे ३२,०६,७००/- रुपये किमतीचे ५०.१ तोळे सोन्याचे दागिणे हस्तगत करण्यात आले.
दि.१४/११/२०२३ रोजी सायंकाळी ५.३० वा.चे. सुमारास बस स्थानक सातारा येथे फिर्यादी बसमध्ये चढ़त असताना अज्ञात चोरटयांनी त्यांच्या बॅगची चेन तोडून बॅगेतील ३,१०,०००/- रुपये किमतीचे ७.२५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे असणारा डबा चोरुन नेला म्हणून वगैरे दिले मजकुरचे फिर्यादीवरुन सातारा शहर पोलीस ठाणे मु.र.नं.९६६/२०२३ भादविक ३७९ अन्वये नोंद करण्यात आला आहे.

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सातारा जिल्हयातील बस स्थानक परिसरात चोऱ्या करणाऱ्या आरोपींची माहिती काढून त्यांचचर प्रभावशाली कारवाई करण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिल्या.
पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांचे अधिपत्याखाली एक पथक तयार करुन त्यांना नमुद इसमांची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांनी नमुद गुन्हा स्वतःकडे तपासास घेवून विश्वसनीय बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषनाद्वारे अज्ञात आरोपींची माहिती प्राप्त करण्याचा प्रयत्न केला.

दि.०६/०१/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, Pickpocketing करणारी टोळी सातारा जिल्हयात कार्यरत असून सदरची टोळी जिल्हयातील बस स्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेवून प्रवाश्यांचे सोन्याचे दागिणे व साहित्य चोरी करीत आहे.
सदरच्या टोळीतील दोन महिला हया सातारा बस स्थानकाचे आवारामध्ये फिरत आहेत, अशी खात्रीशिर माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यांनी पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे व त्यांचे पथकास नमुद महिलांना ताब्यात घेवून पुढील कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या. नमुद तपास पथकाने सातारा बस स्थानक परिसरामध्ये सापळा लावून दोन्ही महिलांना महिला पोलीस अंमलदार यांचे मदतीने ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील महिला पोलीस अंमलदार यांचे मदतीने दोन्ही महिलांचेकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी सातारा जिल्हयातील सातारा शहर, बहुज, फलटण शहर, कराड शहर, दहिवडी, कोरेगाव या बसस्थानकावर प्रवाश्यांच्या सोन्याच्या दागिण्यांची चोरी केली असल्याचे सांगीतले आहे.
नमुद महिलांनी चोरी केलेले सोन्याचे दागिणे हे सांगली येथील सोनारांना विक्री केले असल्याचे सांगीतले. त्याप्रमाणे तपास पथकाने तात्काळ सांगली येथील एका सोनारास ताब्यात घेवून नमुद गुन्हयात अटक करुन त्यांचेकडून महिला आरोपींनी चोरी केलेले चालू बाजार भावाप्रमाणे ३२,०६,७००/- रुपये किमतीचे एकूण ५०.०१ तोळे सोन्याचे दागिणे हस्तगत करुन बस स्थानक परिसरात Pickpocketing करणारी टोळी ताब्यात घेवून रेकॉर्ड ब्रेक कारवाई केलेली आहे.
माहे नोव्हेंबर २०२२ पासून दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, मोटार सायकलचोरी, इतर चोरी असे एकुण १६३ मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणले असून नमूद गुन्हयातील चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिण्यांपैकी ४४२ तोळे सोने (४ किलो ४२० ग्रॅम) असा एकूण २,५०,८०,७००/- रुपये (दोन कोटी, सत्तर लाख, ऐशी हजार, सातशे रुपये) किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रविंद्र भोरे, रोहित फाणें, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, तानाजी माने, पोलीस अंमलदार सुधीर बनकर, विश्वनाथ संकपाळ, अतिश पाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, मंगेश महाडीक, साबीर मुल्ला, सचिन साळुंखे, अमोल माने, मोहन नाचण, अजित कर्णे, हसन तडवी, मुनीर मुल्ला, सनी आवटे, राकेश खांडके, शिवाजी भिसे, मनोज जाधव, राजू कांबळे, प्रविण कांबळे, स्वप्नील दाँड, केतन शिंदे, धीरज महाडीक, मोहसनि मोमीन, महिला पोलीस अंमलदार दिपाली यादव, सौजन्या मोरे, शकुंतला सणस, आधिका वीर, तृप्ती मोहिते, अनुराधा सणस, काजल साचळे, मोनाली पवार, सुवर्णा पवार, आरती भागडे, दिपाली गुरव, पंकजा जाधव, पंकज बेसके, अमृत कर्पे, संभाजी साळुंखे, दलजित जगदाळे, विजय निकम, सायबर विभागचे अमित झेंडे यांनी सदरची कारवाई केलेली असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केलेले आहे.
नमुद आरोपींचेकडून उघडकीस आलेले गुन्हे :-
अ.क्र. पोलीस ठाणे
गु.र.नं.व कलम
१९६/२०२३ भादविक ३७९
बहुज
६१०/२०२३ भादविक ३७९
५३१/२०२३ भादविक ३७१
यहुज
३२८/२०२३ भादविक ३७१
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रविंद्र भोरे, रोहित फाणें, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, तानाजी माने, पोलीस अंमलदार सुधीर बनकर, विश्वनाथ संकपाळ, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, मंगेश महाडीक, साबीर मुल्ला, सचिन साळुंखे, अमोल माने, मोहन नाचण, अजित कर्णे, हसन तडवी, मुनीर मुल्ला, सनी आवटे, राकेश खांडके, शिवाजी भिसे, मनोज जाधव, राजू कांबळे, प्रविण कांबळे, खप्नील दॉड, केतन शिंदे, पीरज महाडीक, मोहसनि मोमीन, महिला पोलीस अंमलदार दिपाली यादव, सौजन्या मोरे, शकुंतला सणस, आधिका वीर, तृप्ती मोहिते, अनुराधा सणस, काजल साबळे, मोनाली पवार, सुवर्णा पवार, आरती भागडे, दिपाली गुरव, पंकजा जाधव, पंकज बेसके, अमृत कर्पे, संभाजी साळुंखे, दलजित जगदाळे, विजय निकम, सायबर विभागचे अमित झेंडे यांनी सदरची कारवाई केलेली असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केलेले आहे.
नमुद आरोपींचेकडून उघडकीस आलेले गुन्हे :-
अ.क्र. पोलीस ठाणे
गु.र.नं.व कलम
बहुज
१९६/२०२३ भादविक ३७१
बहुज
६१०/२०२३ भादविक ३७९
बहुज
५३९/२०२३ भादयिक ३७१
बहुज
३२८/२०२३ भादयिक ३७१
बहुज
६०८/२०२३ भादविक ३७१ २८७/२०२३ भाविक ३७१
कराड शहर
४२३/२०२२ भादविक ३७९
कराड शहर
८७२/२०२३ भादविक ३७१
फलटण शहर
२३४/२०२२ भादविक ३७९
फलटण शहर
५८५/२०२२ भादविक ३७९
फलटण शहर
२४/२०२३ भादविक ३७९
फलटण शहर फलटण शहर
८६/२०२३ भादविक ३७९ ५९८/२०२३ भादविक ३७१
फलटण शहर
३१०/२०२३ भादविक ३७१
सातारा शहर
२६५/२०२२ भादविक ३७१
सातारा शहर
११०२/२०२२ भाविक ३७१
सातारा शहर
१२१/२०२३ भादविक ३७१
सातारा शहर
३७६/२०२३ भादविक ३७९
सातारा शहर
१६६/२०२३ भादविक ३७१
१०५९/२०२३ भादविक ३७९
१११८/२०२३ भादयिक ३७१
सातारा शहर
३१२/२०२३ भादविक ३७१
दहिवडी
२१६/२०२२ भादविक ३७९
दहिवडी
३७४/२०२३ भादविक ३७९
२५. कोरेगाव
२९४/२०२२ भादविक ३७१
आरोपींची नावे
१) रुपाली अर्जुन सकट रा जयसिंगपूर
२) गीता संदीप भोसले रा जयसिंगपूर
३) सोनार रफिक अजिज शेख रा सांगली
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com