स्थानिक गुन्हे शाखा सातारा व कोरेगाव पोलीस ठाणे यांनी अज्ञात महिलेचा केलेल्या क्लिष्ट खुनाचा गुन्हा २४ तासाचे आत केला उघड..

उपसंपादक- रणजित मस्के
सातारा :– दि.०४/०६/२०२४ रोजी सायंकाळी ५.३० वा.चे. पूर्वी मौजे रेवडी ता. कोरेगाव गावचे हद्दीत मळवी नावाचे शिवारालगत जरंडेश्वर मायनर शेजारी कृष्णा मोरे यांचे शेतालगत धोम डावा कॅनॉलमध्ये एक अनोळखी महिलेचा हात बांधलेला, सडलेला मृतदेह असल्याची माहिती सौ. रुपाली धनसिम शिंदे पोलीस पाटील रेवडी यांनी कळविली, सदरची माहिती प्राप्त होताच श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती सोनाली कदम उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा ग्रामिण, पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस निरीक्षक घनशाम बल्लाळ यांनी गुन्हयाचे घटनास्थळी भेट दिली. मृतदेहाची पाहणी केल्यानंतर घातपाताचा प्रकार असल्याचे आढळून आल्याने पोलीस पाटील रेवडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कोरेगाव पोलीस ठाणे गु.र.नं.२४५/२०२४ भादविक ३०२, २०१ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अज्ञात मृत महिलेची ओळख पटवून सदरचा खुनाचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याच्या सुचना श्रीमती सोनाली कदम उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा ग्रामिण, पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस निरीक्षक घनशाम बल्लाळ यांना दिल्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा सातारा व कोरेगाव पोलीस ठाणेकडील तपास पथके तयार करण्यात आली.
सर्व प्रथम मृतदेहाची ओळख पटविण्याकरीता तपास पथकांनी मृतदेहाच्या अंगावरील कपडे, दागिणे याच्या वर्णनावरुन ICJS प्रणाली वरुन माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये सदरच्या वर्णनाच्या महिलेबाबत श्रीगोंदा
जिल्हा अहमदनगर येथे मिसींग दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली.
प्राप्त झालेल्या माहितीवरून श्रीगोंदा पोलीस ठाणे येथील मिसींग व्यक्तींच्या अभिलेखाची तपासणी केली असता त्यामध्ये मयताच्या वर्णनाशी मिळती जुळती सुभद्रा राजेंद्र मुंढेकर वय ४० वर्षे रा. मुंढेकरवाडी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर या नावच्या महिलेची मिसींग आढळून आली. त्यानंतर तपास पथकांनी मिसींग महिलेच्या नातेवाईकांशी संपर्क साधला सदरची महिला दि.२८/०५/२०२४ रोजी रात्री ११.०० वा. च्या सुमारास घरातून राजेंद्र जगन्नाथ देशमुख रा. मुंडेकरवाडी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर नावच्या इसमासोबत निघून गेल्याचा संशय व्यक्त केला.
त्यावरुन तपास पथकांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे नमुद इसमाचा शोध घेतला असता सदरचा इसम हा मुंढेकरवाडी ता.श्रीगोंदा येथे असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलीस निरीक्षक धनशाम बल्लाळ तपास पथकासह श्रीगोंदा जि. अहमदनगर येथे रवाना झाले, व तपास पथकाने नमुद इसमास ताब्यात घेतले.
गुन्हयाचे तपासकामी ताब्यात घेतलेल्या राजेंद्र देशमुख याचेकडे गुन्हयाचे अनुशंगाने विचारपुस केली असता त्याने सांगीतले की, मृत महिला सुभद्रा मुंढे व त्याचे प्रेम संबंध होते, सदरची महिला त्याच्या सोबत एकत्र राहण्याची जबरदस्ती करीत होती, म्हणून मी दि.३०/०५/२०२४ रोजी सुभद्रा मुंढेकर हिला माझा मित्र बिभीषन सुरेश चव्हाण रा. बाभुळगाव ता. इंदापूर जि. पुणे याचेसोबत त्याच्या टाटा सुमो गाडीतून गोवा येथे फिरण्याकरीता घेवून गेलो होतो, दि.०२/०६/२०२४ रोजी परत गावी जाण्याचे ठरविल्यानंतर मृत महिला सुभद्रा मुंढेकर हिने राजेंद्र देशमुख यास घरी जायचे नाही मला तुझ्या सोबत रहायचे आहे असा तगदा लावल्यामुळे राजेंद्र देशमुख याला सुभद्रा मुंडेकर हिचा राग आला व त्याने त्याचा मित्र विभीषन चव्हाण याचे सोबत काटा काढायचे ठरविले.
दि.०३/०६/२०२४ रोजी राजेंद्र देशमुख, बिभीषन चव्हाण व मृत महिला सुभद्रा मुंडेकर परत श्रीगोंदा येथे जाण्याकरीता निघाले. सायंकाळी ७.०० वा. च्या सुमारास रेवडी ता. कोरेगाव गावचे हद्दीत आल्यानंतर मळची नावाचे शिवारालगत जरंडेश्वर मायनर धोम डावा कैनॉल येथे आल्यानंतर राजेंद्र देशमुख याने विभीषन चव्हाण याचे मदतीने सुभद्रा मुंढेकर हिचे हात बांधून, गळा आवळून, तिचा खुन करुन मृतदेह धोम डावा कॅनॉलचे पाण्यामध्ये टाकून दिला होता असे सांगीतल्याने सदरचा क्लिष्ट खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यास तपास पथकांना यश प्राप्त झाले आहे.
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती सोनाली कदम उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा ग्रामिण यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पोलीस निरीक्षक घनशाम बल्लाळ कोरेगाव पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पृथ्वीराज ताटे, रोहित फाणे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, कोरेगाव पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, महिला पोलीस उपनिरीक्षक दिपीका मुसळे, कोरेगाव पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर साबळे, राहुल कुंभार, सचिन साळुंखे, विक्रांत लायंड, अमोल धनावडे, जोतिराम शिंदे, समाधान शेडगे, प्रमोद जाधव, अक्षय शिंदे, गणेश शेळके, हेमंत सोनमळे, राहुल ढोणे, शिवाजी माने, आण्णा चव्हाण तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार विश्वनाथ संकपाळ, शरद बेबले, प्रविण फडतरे, अजित कर्णे, गणेश कापरे, स्वप्नील कुंभार, अमित माने, अविनाश चव्हाण, मोहन पवार, ओंकार यादव, विशाल पवार, रोहित निकम, वैभव सावंत, शिवाजी गुरव, संभाजी साळुंखे, विजय निकम यांनी सदरची कामगिरी केलेली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com