स्थानिक गुन्हे शाखा रायगडने रोहा इथून केला शस्त्र साठा जप्त ..

उपसंपादक – रणजित मस्के
रायगड:– दिनांक ०८/०१/२०२४ रोजी रात्री स्थनिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना गोपनीय खबर प्राप्त झाली की, रोहा धनगर आळी रोहा याठिकाणी एक इसमाकडे अग्नी शस्त्रे असल्याची माहितीप्राप्त झाली त्यावरून त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक धनाजी साठे व कर्मचारी यांचे पथक तयार केले सदर पथका सह मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार धनगर आळी रोहा याठिकाणी जावून पथकाने पाहणी केली असता त्यावेळी सदर ठिकाणी एक इसम नामे तन्मय सतीश भोपटे वय-२४ वर्ष रा. धनगर आळी ता. रोहा हा मिळून आला त्याचे घरामधे खालीलप्रमाणे शस्त्रे साठा मिळून आला.
हस्तगत केलेला माल-
(१) ४ बारा बोर बंदूक
(४) २ धारदार तलवारी
(७) ५ रिकामे काडतूस
(२) १ देशी बनावटीचे रिव्हॉल्वर
(५) ६ कोयते
(८) बंदूक व काडतुसे बनवण्याचे साहित्य
(३) ५ धारदार चाकू
(६) ९० जिवंत काडतुसे
(९) हरीण व इतर प्राण्यांचे २२ शिंगाचे जोडी
सदर ठिकाणी २ पंचांना पाचारण करुन वर नमूद शस्त्रे पंचनामान्वये ताब्यात घेण्यात आले. सदर आरोपी याने देशी बनावटीचे रिव्हॉल्वर विकत घेतले असल्याचे सांगितले आहे तसेच बाकी इतर सर्व बंदुका तलवारी कोयते चाकू स्वतः बनवलील्याचे सांगितले आहे तसेच घटनास्थळवरून शस्त्रे बनविण्यासाठी लागणारे साहित्य मिळून आले असून ते ही ताब्यात घेण्यात आलेले आहे.
सदर बाबत रोहा पोलीस ठाणे येथे कॉ.गु.र.नं.०८/२०२४ शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३,४,५ (क), (ख), ७ (क), (ख), २५ वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम २ (३१), ४८,५१ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यात आरोपी नामे तन्मय सतीश भोपटे वय २४ रा. धनगरआळी ता. रोहा यास अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक साठे व पथक करीत आहे.

सदरची कामगिरी रायगड जिल्हयाचे मा. पोलीस अधीक्षक, सोमनाथ घार्गे साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक, अतुल झेंडे साहेब, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांचे अधिपत्याखाली पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे, पोह/जितेंद्र चव्हाण, पोह/रुपेश निगडे, पोना/विशाल आवळे, पोशी/अक्षय सावंत, पोशी / मोरेश्वर ओमले यांनी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com