स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांचेकडून पालघर पोलीस ठाणे येथीलदाखल घरफोडी चोरीचा गुन्हा उघड..!

0
Spread the love

उपसंपादक : मंगेश उईके

पालघर :- दि.२८/०९/२०२४ रोजी पहाटे ०३.१५ वा. ते ०३.२५ वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी संजय राजाराम यादव, वय ४९ वर्ष, रा. नालासोपारा यांचे पालघर (पश्चिम) येथील नाना नानी पार्क माधवम इमारतीचे तळमजल्यावरील इन्स्टाकार्ट सर्व्हसेस प्रायव्हेट लिमीटेड या ऑफिसची स्लायडींगची खिडकी कोणीतरी अनोळखी चोरट्याने उचकटून, त्यावाटे कार्यालयात प्रवेश करुन, कार्यालयात ठेवलेले एकूण ५,१३,९३७/- रुपयाचे वेगवेगळ्या कंपनीचे २० मोबाईल हॅण्डसेट, १८०२/- रुपये किंमतीचे पॉवर बैंक, २९६/- रुपयाचे वाईल्ड स्टोन परफ्युम असा एकुण ५,१६,०३५/- रुपये किंमतीचा मुद्देमाल फिर्यादी यांचे संमती शिवाय चोरी करुन चोरून नेला म्हणून फिर्यादीचे दिले फिर्यादीवरून पालघर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १९७/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३३१ (४), ३०५ (ओ) प्रमाणे दि.२९/०९/२०२४ रोजी गुन्हा दाखल केलेला आहे.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर यांनी मार्गदर्शन करून पोनि/ प्रदिप पाटील, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांना तपास पथक तयार करून तपासाबाबत सुचना दिल्या. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस तपास पथक तयार करून सदर पोलीस पथकाने गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवून, गुन्हयाची माहिती घेवुन, तांत्रीक स्वरुपाचे मदतीने सदरचा गुन्हा करणारा आरोपी आकाश जितेंद्र ठाकुर, वय २६ वर्षे, रा. हनुमान मंदिराजवळ, बिरवाडी ता.जि. पालघर यास दि.०२/१०/२०२४ रोजी ताब्यात घेवुन त्याचेकडे कसुन चौकशी केली असता, त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. नमूद आरोपीकडून सदर गुन्हयात चोरलेले ५,१६,०३५/- रु. किमंतीचे २० मोबाईल हॅण्डसेट, पॉवर बैंक, परप्युम असा सर्व मुद्देमाल जमीनीत गाडुन ठेवल्याचे सांगितले. नमूद ठिकाणाहून गुन्हयात गेलेला मुद्देमाल जप्त करुन आरोपीस सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे,

सदरची कारवाई बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर, विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक पालघर यांचे मार्गदर्शनाखाली पोनि/प्रदिप पाटील, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांचे सुचनांप्रमाणे पोउनि/स्वप्नील सावंतदेसाई, पोहवा/नरेंद्र पाटील, पोना/कल्याण केंगार, पोअमं/वैभव जामदार सर्व नेम. स्थानिक गुन्हे शाखा, पालघर तसेच पोहवा/भगवान आव्हाड, पोअमं/सागर राऊत दोन्ही नेम. पालघर पो. ठाणे यांनी केलेली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोउनि/विनायक केसरकर नेम. पालघर पो. ठाणे हे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट