स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांचेकडून अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक करणाऱ्या आरोपीवर कारवाई..

0
Spread the love

उपसंपादक-मंगेश उईके

पालघर :- गणेशोत्सव व ईद-ए-मिलादच्या पार्श्वभुमीवर बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांना अवैध धंदयावर कारवाई करणे बाबत मार्गदर्शन करुन सुचना दिल्या होत्या.

त्याअनुषंगाने दि. १४/०९/२०२४ रोजी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखा, पालघर चे पोलीस अधिकारी व अंमलदार हे महामार्गावर पेट्रोलिंग करीत असताना पोलीस उप निरीक्षक सुनिल नलावडे यांना गोपनीय बातमी मिळाली की, मुंबई अहमदाबाद महामार्गावरील अंबोली गावचे हददीतील आकाश हॉटेल समोरील पार्कीग मध्ये उभ्या असलेल्या आयशर मोटार टॅम्पो क्रमांक जी.जे.११/व्ही.व्ही./४८१८ हिचेतून अवैध्यरित्या महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला सुगंधी सुपारी व पान मसाला (गुटखा हा मुंबई परीसरात विक्री करीता वाहतुक करून घेवून जात आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जावून छापा कारवाई केली असता मोटार टॅम्पो क्रमांक जी.जे.११/व्ही.व्ही./४८१८ यामध्ये एकुण २१,७३,०१५/- रुपये किंमतीचा कैश गोल्ड व वाराणसी आशिक नावाची सुगंधी सुपारी व पान मसाला (गुटखा) व १८,००,०००/- रुपये किंमतीचा मोटार टॅम्पो असा एकूण ३९,७३,०१५/- रुपये किंमतीचा मुददेमाल मिळून आला.

सदरचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून टॅम्पोवरील दोन चालक आरोपी १) अर्शद गॅसुददीन खान, वय-३० वर्षे, रा. ग्राम बहादूरगंज पोस्ट. कास्माबाद तहसिल मोहम्मदाबाद जि. गाझीपूर राज्य उत्तरप्रदेश २) रामबहादूर बिरजालाल यादव वय ५२ वर्ष राहणार ग्राम खमरीया पोस्ट बबनजोत तहसिल मनकापूरजि. गौडा राज्य उत्तरप्रदेश यांना अटक करून त्यांचे विरुध्द कासा पोलीस ठाणे गुन्हा रजि.क्र .१६७/२०२४ भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) सह अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ नियम व नियमने २०११ चे कलम २६(२), ३० वगैरे प्रमाणे पोहवा. ४८६/ संदीप विठोबा सुर्यवंशी यांचे फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक गणपत सुळे हे करीत आहे.

सदरची कारवाई बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर, विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर यांचे मार्गदर्शनाखाली प्रदीप पाटील, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर, सपोनि/अनिल व्हटकर, पोउनि/सुनिल नलावडे, पोहवा/दिपक राऊत, पोहवा/संदीप सुर्यवंशी, पोहवा/नरेंद्र पाटील, पोलीस अंमलदार संदीप राजगुरे व बजरंग अमनवाड सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर या पथकाने केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट