स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांचेकडून अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक करणाऱ्या आरोपीवर कारवाई

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

पालघर

गणेशोत्सव व ईद-ए-मिलादच्या पार्श्वभुमीवर श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांना अवैध धंदयावर कारवाई करणे बाबत मार्गदर्शन करुन सुचना दिल्या होत्या.

त्याअनुषंगाने दिनांक २२/०९/२०२३ रोजी ००.३० वाजता पासून स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि / स्वप्नील सावंतदेसाई, पोहवा / ९३७ संदीप सरदार, पोहवा / २२६ राकेश पाटील, पोहवा / ३२६ संजय घांगडा, पोशि/ २९६ बजरंग अमनवाड, पोशि/ १९१८ संदीप राजगुरे यांचे पथक हे अवैध धंद्यावर कारवाई करणेकामी पेट्रोलींग करत असताना गुजरात राज्यातून मुंबई-अहमदाबाद महामार्गाने एका महिंद्रा कंपनीच्या टेम्पोमधून महाराष्ट्र शासनाने अधिसुचनाव्दारे वाहतुकीस व विक्रीस प्रतिबंध केलेला सुगंधी सुपारी पान मसाला या तंबाखूजन्य पदार्थाची वाहतुक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. सदर माहिती मिळताच वरील पथकाकडून दापचरी चेकपोस्ट येथे मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर नाकाबंदी लावून वाहने चेक करत असताना महिंद्रा टेम्पो क्र. एम.एच.-१२-एस एक्स ७६४० यास थांबवून त्याचेवरील चालकास मालाबाबत विचारपुस केली असता त्याने मालाचे कागदपत्रे दाखविले. परंतु टेम्पोमध्ये चेक केले असता बिलाशिवाय इतर मालाच्या गोण्या मिळून आल्याने टेम्पो तलासरी पोलीस ठाणे आवारात आणून पंचासमक्ष गोण्या उतरवून चेक केल्या असता २० गोण्यामध्ये एकूण ४८,००,०००/- रुपये किमतीचे लहान मोठ्या बॉक्स मध्ये पान मसाला, सेंटेड टोबेको गोल्ड, असे तंबाकुजन्य पदार्थ गुजरात राज्यातून पुणे येथे अवैधरीत्या वाहतुक करून घेवून जात असताना मिळून आला.

वरील मुद्देमाल व टेम्पो असा एकूण ६६,००,००० /- रु एकूण किंमतीचा मुद्देमाल जप्त करून नमूद टेम्पोवरील चालक आरोपी नामे राजु अप्पा उकारडे वय ३४ वर्षे रा. क्रांतीविर नगर, संचेती शाळा जवळ, थेरगाव, पुणे शहर यास अटक करून तलासरी पोलीस ठाणे येथे २३७ / २०२३ भादंवि कलम ३२८, १८८ २७२ २०३ सह अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ नियम व नियमने २०११ चे कलम २६(२) २७(२) ई. २६ (२) (अ), ३० (२) (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढिल तपास हा पोउपनि / रविंद्र वानखेडे, नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा पालघर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. पंकज शिरसाट, अपर पोलीस अधीक्षक पालघर, पोलीस निरीक्षक श्री. अनिल विभुते, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि / स्वप्नील सावंतदेसाई, पोहवा / ९३७ संदीप सरदार, पोहवा / २२६ राकेश पाटील, पोहवा / ३२६ संजय धांगडा, पोशि/२९६ बजरंग अमनवाड, पोशि/ १९१८ संदीप राजगुरे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट