स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर यानी ३ आरोपींना पकडून ६ मोटर सायकल चोरीचे व १ सेंन्ट्रींग प्लेट चोरीचा गुन्हा केला उघड

उपसंपादक-रणजित मस्के
कोल्हापूर :-
एकूण 5,50,000 रु किं. चा मुद्देमाल जप्त !!
मा. पोलीस अधीक्षक, श्री. महेंद्र पंडित साो यांनी कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेल्या मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करणे बाबत तसेच घडलेले गुन्हे उघडकीस आणणेच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर तसेच दुय्यम अधिकारी यांना वाहन चोरीचे गुन्हे घडलेल्या ठिकाणी भेटी देवून वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या.
मा. पोलीस अधीक्षक साो यांनी दिले सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक, श्री. रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर कडील तपास पथके तयार करून तपास सुरू केला. सदर तपास पथकामार्फत मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेचा प्रयत्न चालू असताना तपास पथकातील पोलीस अमंलदार वैभव पाटील व शुभम संकपाळ यांना खात्रीशिर गोपनीय माहिती मिळाली की, इसम नामे स्वप्निल सोनाळे, रा. गोकुळ शिरगांव कोल्हापूर याने व त्याचे साथीदारानी मिळुन मोटर सायकल तसेच सेंन्ट्रीग प्लेटा चोरीचे गुन्हे केले असून ते चोरीची मोटर सायकल व सेंन्ट्रींग प्लेटा घेवून विक्री करणेकरीता मोरेवाडी जकात नाका या मार्गे राजेंद्रनगर येथे येणार आहेत. मिळाले माहितीचे अनुषंगाने तपास पथकाने दि.21.12.2024 रोजी सापळा लावून आरोपी नामे 01) स्वप्निल आनंदा सोनाळे, व.व.23, रा. मसोबा माळवाडी, गोकुळ शिरगांव, ता. करवीर, जि. कोल्हापूर, 02) ओंकार संजय चव्हाण, व.व.20, रा. गणेश मंदीर जवळ गोकुळ शिरगांव, ता. करवीर, जि. कोल्हापूर यांना नंबर प्लेट नसलेल्या काळे रंगाचे आप्पाची मोटर सायकलसह तसेच 03) अंकुश लक्ष्मण पांडागळे, व.व.54, रा. दत्त मंदीर शेजारी राजेंद्रनगर कोल्हापूर यास त्याचे ताब्यातील रिक्षामध्ये असलेल्या चोरीच्या सेंन्ट्रींग प्लेटासह ताब्यात घेवून त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याचे कब्जात असलेली आप्पाची मोटर सायकल ही चोरीची असून सदर बाबत वडगांव पोलीस ठाणे, गु.र.नं. 650/2024, भा.ना.सं. कलम-303(2) प्रमाणे गुन्हा दाखल असलेची व सेंन्ट्रींग प्लेटा चोरीस गेलेबाबत गोकुळ शिरगांव पोलीस गु.र.नं. 413/2024, भा. न्या. स. क. 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल असलेची माहिती मिळालेने त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांचेकडे कौशल्यपुर्ण अधिक तपास केला असता स्वप्निल आनंदा सोनाळे याने व त्याचे साथीदारानी मिळुन तळसंदे, वाठार व उजळाईवाडी परीसरातून एकूण 05 मोटर सायकल चोरीचे गुन्हे केलेची माहिती सांगितली. सदर आरोपीकडून चोरीच्या 05 मोटर सायकली, 60 सेंन्ट्रींग प्लेटा तसेच गुन्हा करणेकरीता वापरलेली एक मोटर सायकल व एक रिक्षा असा एकूण 5,50,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून त्यांचेकडून उघडकीस आले.
गुन्ह्यांची माहिती खालीलप्रमाणे-
पोलीस ठाणे
गुन्हा रजि नंबर
जप्त मोटर सायकलचे वर्णन
वडगांव
650/2024
आप्पाची मोटर सायकल क्र.एम.एच. 10/बी. सी. 6335
वडगांव
630/2024
अॅक्टीव्हा मोपेड गाडी क्र.एम.एच. 09/ई.पी. 2091
वडगाव
654/2024
हिरो स्प्लेंडर प्लस मोटर सायकल क्र. एम. एच. 09/बी. एन. 5897
वडगांव
656/2024
हिरो पेंशन प्लस मोटर सायकल क्र.एम.एच. 10/ए. एस. 3049
उजळाईवाडी येथून चोरलेली
सुझुकी मोटर सायकल एक
गोकुळ शिरगांव
413/2024
सेन्ट्रींग प्लेटा 60 नग
नमुद आरोपी
01) स्वप्निल आनंदा सोनाळे व
02) ओंकार संजय चव्हाण यांना त्यांचे कब्जात
मिळालेले मोटर सायकलसह वडगांव पोलीस ठाणे येथे व आरोपी नामे 03) अंकुश लक्ष्मण पांडागळे याचे कब्जात मिळालेल्या चोरीचे सेंन्ट्रींग प्लेटासह गोकुळ शिरगांव पोलीस ठाणे येथे हजर केले आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, श्री. महेंद्र पंडित साो यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक श्री. चेतन मसुटगे, पोलीस उपनिरीक्षक श्री. जालींदर जाधव तसेच पोलीस अंमलदार वैभव पाटील, शुभम संकपाळ, विशाल खराडे, प्रविण पाटील, महेंद्र कोरवी, योगेश गोसावी, गजानन गुरव, संतोष बरगे, परशुराम गुजरे, प्रदीप पाटील, शिवानंद मठपती, सागर माने, संदीप बेंद्रे, लखन पाटील, विजय इंगळे, युवराज पाटील, संजय पडवळ, संजय हुंबे, संजय कुंभार व महेश पाटील यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com