सत्तुराने वार करून खुन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईत आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने 02 तासाचे आत केले जेरबंद.

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा :- दि. 05/08/2023 रोजी सकाळी 11.15 वा.चे सुमारास मौजे कुमठे ता. जि. सातारा येथे गुन्ह्यातील फिर्यादी यांचे पतीस शिव्या का देतो असे विचारलेचे कारणावरुन तिघांनी सत्तुराने डोक्यात व हातावर वार करून गंभीर जखमी करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याबाबत बोरगांव पोलीस ठाणे येथे गुरनं.360/2023 भादविसंक, 307,324,323,504,506,34 प्रमाणे खुनाचे प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता.

नमुद गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना गुन्हयातील आरोपीना अटक करणे बाबत सुचना दिल्या. त्याअनुशंगाने पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे व पोलीस उप-निरीक्षक अमीत पाटील यांचे अधिपत्याखाली पथके तयार करुन त्यां आरोपींचा शोध घेवून ताब्यात घेण्याचे आदेश दिले.

नमुद गुन्हा अभिलेखावरील सराईत इसमाने केला असल्याची व तो सातारा येथे त्याचे मित्रास भेटुन लातूर येथे पळुन जाणार असल्याचा गोपनिय माहिती पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना प्राप्त झालो. त्यानंतर त्यांनी प्राप्त माहिती तपास पथकास देवून गुन्हयातील मुख्य आरोपीस ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्या. त्यानंतर सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे व पोलीस उप-निरीक्षक अमीत पाटील यांचे तपास पथकांनी मुख्य आरोपीस ढोरगल्ली परिसरात सापळा लावुन तो लातुर येथे पळून जाण्याचे बेतात असतानाच त्यास ताब्यात घेतले. नमुद गुन्हयाबाबत आरोपीकडे विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची व तो त्याचे मित्रास भेट्न लातून येथे पळून जाणार असल्याची माहिती दिली. अशा प्रकारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खुनाचे प्रयत्नाचे गुन्हयातील आरोपीस गुन्हा दाखल झाले नंतर 02 तासचे आत जेरबंद करून त्यास पुढील तपासकामी बोरगांव पोलीस ठाण्याचे ताब्यात दिले आहे.

सदरची कारवाई मा. समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा, मा. बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, श्री. अरुण देवकर, सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक, अमीत पाटील, पो.हवा. संजय शिर्के, शरद बेबले, सचिन साळुंखे, लेलेश फडतरे, सनी आवटे, प्रविण फडतरे, हसन तडवी, पो.ना. अमित सपकाळ, अमित माने, स्वप्नील कुंभार, मोहन पवार, ओंकार यादव, विक्रम पिसाळ, गणेश कापरे, अविनाश चव्हाण, पो. कॉ. रोहित निकम, विशाल पवार, पृथ्वी जाधव, संकेत निकम चालक पो. हवा. शिवाजी गुरव यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट