स्थानिक गुन्हे शाखा मटका किंग समीर कच्छी व त्यांच्या टोळी विरुध्द मोक्का कायद्यांतर्गत कारवाई…

उपसंपादक – रणजित मस्के
सातारा:- श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा व श्री बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांवर लक्ष केंद्रीत करुन मटका व्यवसाय करणारे, व्याजाने पैसे देवुन सावकारी करणारे, तसेच टोळीची दहशत निर्माण करुन आर्थिक व इतर फायद्याकरीता संघटीतपणे गुन्हे करणा-या गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अन्वये प्रभावी कारवाई करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना सूचना दिलेल्या आहेत.

सातारा जिल्हयामध्ये समीर ऊर्फ शमीम सलीम शेख ऊर्फ कच्छी हा त्याच्या कच्छी गैंग च्या साथीदारांच्या मार्फतीने लपून छपून पोलीसांचे नजरेआड राहून मटका जुगार सारखे अवैध्द धंदे चालवून मोठया प्रमाणावर काळा पैसा गोळा करून तो सामान्य कुटुंबातील गरजू लोकांना व्याजाने देवुन सावकारी करुन लोकांची पिळवणुक करीत असल्याबाबत अनेक तक्रारी येत होत्या. श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांच्या अधिपत्याखाली खास पथक तयार करून कारवाई करणेबाबत सुचना दिल्या, त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचुन दि. १९/०२/२०२३ रोजी समीर कच्छी यांचे मोळाचा ओढा सातारा येथील राहते घरी मिळाले बातमीच्या अनुषंगाने अचानक छापा टाकला असता सदर ठिकाणी समीर कच्छी व त्याचे साथीदार मटका जुगार चालवित असताना मिळुन आले त्यांचे कब्जात एकुण १६ लाख २६ हजार ७० रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करून सातारा तालुका पोलीस ठाणेस गुरनं ७४ / २०२३ महा.जु.का.क. ४.५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचे तपासामध्ये समीर ऊर्फ शमीम सलीम शेख ऊर्फ कच्छी व त्याचे साथीदारांनी कच्छी गैंग नावची टोळी तयार करुन सातारा जिल्हयामध्ये मटका जुगार व्यवसायातून मोठ्या प्रमाणात मिळणारा काळा पैसा गरजु लोकांना देवून त्यांचेकडुन व्याजापोटी जास्त रक्कम वसुल करुन सामान्य लोकांची आर्थिक पळवणुक करुन, व्याजाचे पैसे न दिलेस टोळीच्या माध्यमातून पैशाकरीता अपहरण करून, मारहाण करून जबरदस्तीने पैसे काढुन घेवुन टोळीची दहशत निर्माण करीत असल्याबाबत तक्रारदाराने समक्ष पोलीस ठाणेस येवून सांगितलेने सातारा तालुका पोलीस ठाणे, गु.र.नं. ७५/२०२३ भा.दं.वि.सं. कलम ३९५ ३९७, ३६३, ३६४३६५ ४५२, ३२३, ५०४, ५०६, – ४२०, ३५४, १०९, सह सावकारी अधिनियम कलम ३९,४५ चिड फंड अॅक्ट कलम ७६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा तालुका गुरनं ७५/२०२३ च्या तपासामध्ये समीर कच्छी यांच्या कच्छी गँगचे सातारा जिल्हयाबरोबर गोवा राज्यातील लोकांशी मटका जुगार कनेक्शन असल्याचे समोर आल्याने वरिष्ठांच्या आदेशान्वये तपासाची सूत्रे जलद गतीने फिरवून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोवा राज्यात जावुन मडगांव येथे छापा टाकला असता समीर कच्छी व त्याचे गँगचे कनेक्शन असल्याचे निष्पन्न झाले. तेथे मिळुन आलेल्या लोकांना ताब्यात घेवून त्यांचेकडुन १ लाख ३९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. त्यांना गुन्हयाचे कामी सातारा तालुका पोलीस ठाणेस जमा करण्यात आले आहे.सातारा तालुका पोलीस ठाणे, गु.र.नं. ७५/२०२३ भा.दं.वि.सं. कलम ३९५, ३९७, ३६३, ३६४, ३६५, ४५२, – ३२३, ५०४, ५०६, ४२०, ३५४ १०९, सह सावकारी अधिनियम कलम ३९,४५ चिड फंड अॅक्ट कलम ७६ अन्वये कच्छी गँगने सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सातारा तालुका पोलीस ठाणे यांनी नमुद टोळीविरुद्ध दाखल गुन्ह्यांची माहिती संकलित केली असता समीर कच्छी व त्याच्या गँगवर विविध पोलीस ठाणेस जुगार / मटका चालविणे, जबरी चोरी करणे, दरोडा, खुनाचा प्रयत्न, खुनासाठी अपहरण, गंभीर दुखापत, सरकारी नोकरावर हल्ला, गर्दी मारामारी, फसवणुक, अशा प्रकारचे गुन्हे दाखल असल्याने सदर आरोपींचेविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये (मोक्का) कारवाई करीता पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्फतीने मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापुर यांच्याकडे मोक्का अंतर्गत प्रस्ताव सादर केला.
मा. श्री सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापुर परिक्षेत्र कोल्हापुर हे सातारा जिल्हयाच्या वार्षिक तपासणीकामी सातारा जिल्हयामध्ये असताना त्यांनी सदर गुन्हयाची माहीती घेवुन कागदपत्रांचे अवलोकन करुन मोक्का प्रस्तावाची पडताळणी केली. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापुर यांनी सदर गुन्हयास मोक्का कायदयान्ययेची कलम वाढ करणेची परवानगी देवून प्रस्तावास मंजुरी दिली असून गुन्ह्याचा तपास श्री गणेश किंद्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा ग्रामीण कॅम्प कोरेगांव यांच्याकडे देण्यात आला आहे.
माहे नोव्हेंबर २०२२ पासुन ५ मोक्का प्रस्तावामध्ये ९० इसमांविरुद्ध मोक्का कायदयाअंतर्गत कारवाई केली आहे. तसेच ११ इसमांविरुध्द हद्दपारीसारखी व ०१ इसमास MPDA कायदयान्वये स्थानबध्द करणेत आले आहे. तसेच भविष्यातही सातारा जिल्ह्यामधील सराईत गुन्हेगारांचे विरुद्ध मोक्का, हद्दपारी MPDA अशा प्रकारच्या कठोर कारवाया करणेत येणार आहेत.
मोक्का प्रस्ताव मंजुरी करीता श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा व श्री बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांचे मार्गदर्शनाखाली श्री गणेश किंद्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा ग्रामीण कॅम्प कोरेगांव, श्री अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा श्री विश्वजीत घोडके, पोलीस निरीक्षक, सातारा तालुका पोलीस ठाणे, स्वप्नील घोंगडे, सहा. पोलीस निरीक्षक वाचक पोलीस अधीक्षक सातारा, सपोनि श्री प्रताप भोसले, व त्यांचे तपास पथक, सपोनि श्री रमेश गर्जे, व त्यांचे तपास पथक तसेच अमित सपकाळ, प्रमोद सावंत, दिपक इंगवले, राजु कांबळे, महेश शिंदे, केतन शिंदे, या पोलीस अंमलदारांनी मोक्का कारवाईकरीता सहभाग घेतला आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com