स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया पोलीस पथकाने घरफोडी करणाऱ्या धर्मेद्र मनिराम मडामी यास केले जेरबंद…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :-रा. मक्कीटोला,पो.ठाणा ता.आमगाव असे जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत थोडक्यात माहिती अशी की, घटना दिनांक- 25/07/2024 रोजी चे सकाळी 10.00 ते 12.30 दरम्यान मक्कीटोला (सुरकुडा) येथील रहिवासी तक्रारदार श्री. मुन्नालाल भैय्यालाल ठाकरे वय 64 वर्षे हे शेतावर गवत आणण्यास गेले होते…तसेच त्यांची पत्नी व मुलगा हे सुद्धा बाहेर गेले होते घरी कोणीही हजर नसतांना त्यांचे राहते घराचे समोरील दरवाज्याचा कुलुप व घरातील लोखंडी आलमारीचा दार तोडून आलमारीतील सोन्या- चांदीचे दागिने, व रोख रक्कम असा किंमती 42,500/- रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यानी चोरुन नेल्याने तक्रारीवरुन पोलीस ठाणे आमगाव येथे अपराध. क्र. 319/2024 कलम 305(अ), 331(3) भा. न्या. सं.- 2023 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले होते…

स्थानिक गुन्हे शाखेचे, पथक आमगाव परिसरात सदर गुन्ह्यातील अज्ञात चोरटे -गुन्हेगारांचा शोध व सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना…. दिनांक- 01/08/2024 रोजी पथकाने गुप्त बातमीदार याचे कडून मिळालेल्या खात्रीशिर माहितीच्या आधारे.. संशयित गुन्हेगार नामे – धर्मेद्र मनिराम मडामी वय-29 वर्षे रा. मक्कीटोला, ता. आमगाव, जिल्हा- गोंदिया* यास ताब्यात घेतले…. नमूद घरफोडी गुन्ह्याचे अनुषंगाने कसून चौकशी केली असता संशयिताने प्रथमतः उडवा उडवीची उत्तरे दिले..त्यास पोलीसी खाक्या दाखवत पुन्हा विश्वासात घेवून कसून सखोल विचारपुस चौकशी केली असता नमूद घरफोडी गुन्हा केल्याची कबुली दिली……गुन्हातील चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे….. आरोपीने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने….आरोपीस पुढील कायदेशीर कारवाई तपासाकरीता आमगाव पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले आहे… घरफोडी गुन्ह्याची उकल करण्यात आली आहे…

➖➖ सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे निर्देशान्वये व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे, स्था.गु. शा यांचे मार्गदर्शनात पो.उप.नि. महेश विघ्णे, मपोउपनि वनिता सायकर, पोलीस अंमलदार पो.हवा विठ्ठल ठाकरे, इंद्रजित बीसेन, पो.शि. हंसराज भांडारकर, चा.पो.हवा लक्ष्मण बंजार यांनी कामगिरी केली आहे .

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट