स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया पथकाकडून मोटर सायकल चोरी करणाऱ्या २ चोरट्यां कडून 5 मोटर सायकली हस्तगत…

प्रतिनिधी-रणजित मस्के
गोंदिया : थोडक्यात हकीगत अशी की, दिनांक ०३/११/२०२२ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया, चे पथक पो.स्टे गोंदिया ग्रामीण, रावनवाडी, परिसरात गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलींग व चोरी / घरफोडी मोटार सायकल चोरी करणारे गुन्हेगार शोध घेत असतांना गुप्त बातमीदाराकडुन खबर मिळाली की नामे- विनायक नेवारे रा. गिरोला यांचेकडे चोरीची मोटार सायकल आहे व तो दासगांव / किन्ही परिसरात फिरत आहे. अशा माहीतीवरून स्थागुशा चे पथकाने विनायक नेवारे रा. गिरोला याचा शोध घेवून त्यास दासगांव / किन्ही परिसरातुन ताब्यात घेवुन मोटार सायकल चोरीबाबत विचारपुस केली असता त्याने वेगवेगळ्या ठिकाणावरुन ग्राम नवेगाव, किरणापुर, लांजी सर्व जि.बालाघाट येथुन तसेच त्याचा मित्र विधीसंघर्षित बालक याचे सोबत मिळुन ग्राम लांजी ता.जि. बालाघाट (मध्यप्रदेश) येथुन तसेच पो.स्टे.रावणवाडी परिसरातून मो.सा. चोरी केल्याचे सांगितल्याने आरोपितांकडुन खालील वर्णनाचा मोटर साईकल जप्त करण्यात आले –
1) MP 50 MV 8810 HF DELUXE DRUM HERO COMPANY ENGINE NUMBER HA11 ERM9C10527 CHASSIS NUMBER MBLHACO43 M9C13534 किमती 40,000/-
2) UK 05 B4392 HONDA DREAM YUGA ENGINE NUMBER JC58ET4161663
Chassis number MB4JC58AHFT161515 किमती 70000/-
3) MP 50 MP 7212 BAJAJ PULSAR ENGINE NUMBER DHXRLD79402 CHASSIS NUMBER MD2A11CX9LRD51230
4) हिरो कंपनीची एचएफ डीलक्स क्र. MP- 50 MR 5879 जिचा इंजिन क्र DCXRLD79402 चेसिस क्र MD2A11CX9LRD51230 किमती 70,000/- रू.
5) विना क्रमांक ची होंडा कंपनीची शाईन मोटार सायकल जिचा इंजिन नंबर JC65E -7 -0319984 चेसिस नंबर OME4JC651JF7216765 किमती 70 हजार रुपये या मिळून आलेल्या गाड्याबाबत मालक यांनी पोलिस स्टेशन ला संपर्क करावा.
आरोपी व जप्त मो.सा. मुद्देमाल सह पो.स्टे. रावणवाडी यांच्या ताब्यात पुढील कायदेशिर कारवाई करीता देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे सा गोंदिया, तसेच मा. अपर पोलिस अधिक्षक श्री. अशोक बनकर सा.यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक स्थागुशा श्री बबन आव्हाड, पो. हवा. राजेंद्र मिश्रा, भूवनलाल देशमुख, चित्तरंजन कोडापे, पोना महेश मेहर, पोशी. संतोष केदार, विजय मानकर , चापोशी पांडे यांनी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com