स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया यांनी घरफोडी करणा-या नागपुर येथील सराईत गुन्हेगारास जेरबंद करून ठोकल्या बेडया..

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

गोंदिया :

गोंदिया जिल्हयातील पो. ठाणे तिरोडा येथील – ३, आंमगांव -१, सालेकसा-१ असे एकुण ५ घरफोडी गुन्हयांची उकल–

⏩ याबाबत थोडक्यात माहिती अशी की, मा. श्री. निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक, गोंदिया, श्री. नित्यानंद झा, अप्पर पोलीस अधिक्षक, गोंदिया, कॅम्प देवरी यांनी पो.नि.स्थानिक गुन्हे, शाखा, गोंदिया आणि पोलीस पथकास जिल्हयातील विविध पोलीस ठाणे अंतर्गत दाखल चोरी, घरफोडी, मोटार सायकल चोरीचे गुन्हयातील गुन्हेगारांचा शोध घेवून गुन्हेगारांना जेरबंद करून गुन्हे उघडकीस आणण्याचे निर्देश सुचना दिले आहेत.

मा. वरीष्ठाचे निर्देश सुचना मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, श्री दिनेश लबडे, स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाद्वारे जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यास दाखल चोरी, घरफोडी गुन्हयातील सराईत गुन्हेगारांचा शोध घेवून गुन्हेगारांची गुन्हे करण्याचे पध्दतीचे माहीतीचे विष्लेशन करून सविस्तर माहीती घेण्यात येत होती.. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाद्वारे गुन्हेगारांची इत्यंभूत… माहीती घेण्यात येत असतांना दिनांक- ०६/०५/२०२४ रोजी पथकास गोपनिय बातमीदार, आणि गुन्हेगारांच्या तांत्रीक माहीतीच्या विश्लेषणा वरून खात्रीशिर माहीती प्राप्त झाली की, पो. ठाणे तिरोडा अंतर्गत हददीत घडलेल्या चोरी, घरफोडी गुन्हयांतीन गुन्हेगार हे नागपुर येथील रहिवासी असुन त्यांनी गोंदिया जिल्हयात बरेच घरफोडी चे गुन्हे केलेले आहेत.अशा मिळालेल्या खात्रिशिर माहीतीच्या आधारे पथकाने नागपुर येथे जावून नागपुर येथील स्थानिक हुडकेश्वर पोलीसांचे मदतीने सराईत गुन्हेगार ईसम नामे- करण ऊर्फ रोहन दिलीप गाडगीलवार वय २३ वर्षे रा. पार्वती नगर, गल्ली न.५ रामेश्वरी ता. जि. नागपुर तसेच त्याचा साथीदार विधी संघर्ष बालक- नामे आदित्य अशा दोघांना ताब्यात घेण्यात आले….. नमूद दोघांनाही तिरोडा येथील घरफोडी गुन्हयांचे अनुषंगाने विश्वासात घेवून विचारपुस चौकशी केली असता पो. ठाणे तिरोडा येथील अप.क्र. १) २५६/ २०२४, २) २६९/२०२४ ३) २७०/२०२४ कलम ४५४, ३८० भांदवि तसेच पो.स्टे.आंमगांव गुरन.क्र. १५४/२०२४, पो.स्टे.सालेकसा गुरन. क्र. १११/२०२४ कलम ४५७, ३८० भांदवि चे एकुण ५ गुन्हे त्यांचा तिसरा फरार साथीदार नामे- आदर्श रमेश समर्थ वय अंदाजे २० वर्षे रा. पार्वती नगर, गल्ली न.५ रामेश्वरी ता. जि. नागपुर याचेसह मिळुन केल्याची कबुली दिली. जिल्हयात केलेल्या नमूद घरफोडी गुन्हयातील चोरी केलेल्या मुद्येमाल संबंधात विचारपुस केली असता उडवाउडवीचे उत्तरे दिली. जेरबंद करण्यात आलेला विधीसंघर्ष बालक- आदित्य यांस सुचनापत्र देवून त्याचे नातवाईकांचे सुपुर्द करून सोडण्यात आले आहे. तर सराईत आरोपी नामे- करण ऊर्फ रोहन दिलीप गाडगीलवार वय २३ वर्षे यांस पोलीस ठाणे तिरोडा पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले आहे… गुन्हयाचे अनुषंगाने पुढील कायदेशिर कारवाई, आरोपीस अटक, गुन्हयातील मुद्येमाल.. जप्तीची प्रक्रिया तिरोडा पोलीसांद्वारे करण्यात येत आहे.

सदरची कामगीरी मा. वरीष्ठांचे निर्देश मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, श्री. दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात स्था.गु.शा. येथील पोलीस पथक स.पो.नि.विजय शिंदे, पोहवा. तुलसिदास लुटे, भुवन देशमुख, चित्तरंजन कोडापे, इंद्रजित बिसेन, सोमेंद्र तुरकर पोशि. संतोष केदार, अजय रहांगडाले, हंसराज भांडारकर, चापोहवा- लक्ष्मण बंजार, चापोशि- घनश्याम कुंभलवार तसेच तांत्रिक शाखेचे पो.हवा. धंनजय शेंडे, योगेश रहिले, यांनी केलेली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट