जबरी चोरी करणाऱ्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे शाखा, आणि रामनगर पोलीस पथकाची संयुक्त कामगिरी…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :-
याबाबत थोडक्यात हकीगत अशी की, घटना दिनांक – 16/07/2023 रोजीचे सायंकाळी 19.00 वाजताचे सुमारास तक्रारदार – रुचीर भूपेंद्र रहांगडाले रा. शास्त्री वॉर्ड, स्टेशन रोड, तिरोडा हे त्यांचे नातेवाईकांना बालाघाट येथे सोडण्या करीता पोलीस ठाणे- रामनगर हद्दीतील शक्ती चौक कालेखा कंपनी समोर गोंदिया येथे आले असताना व पाहुण्यांना खाजगी बसमध्ये बसवीत असताना 3 अनोळखी युवकांनी संगनमताने फिर्यादीस धक्का देवून खाली पाडून त्यांचे खिशातील पोको कंपनीचा मोबाइल की. अंदाजे 27000/- आणि खिशातील पॉकेट ज्यात अंदाजे- 7000/- रु, पॅन कार्ड, आधार कार्ड, लायसन्स असलेले असा एकून 34,000/- रुपयांचा मुद्देमाल जबरीने हिसकावून पळून गेल्याने तक्रारीवरून पोलीस ठाणें रामनगर येथे अप क्रमांक- 177/2023 कलम 392 ,34 भादवि अन्वये दाखल करण्यात आले होते.

पोलीस अधिक्षक गोंदिया, श्री. निखील पिंगळे, यांनी सदर जबरी चोरी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून गुन्ह्याचे तपासाचे अनुषंगाने सर्व ठाणेदार गोंदिया जिल्हा ठाणेदार रामनगर व स्थानिक गुन्हे शाखेस गुन्ह्यांतील अनोळखी गुन्हेगारांचा तात्काळ शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत निर्देशित केले होते.
या अनुषंगाने पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक, श्री. अशोक बनकर, यांचे निर्देश सूचनाप्रमाणे, व आदेशान्वये उपविभागीय पोलिस अधिकारी, उपविभाग गोंदिया, श्री. सुनिल ताजने, यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. श्री. दिनेश लबडे, पो.नि. श्री. संदेश केंजळे, यांचे नेतृत्वात व मार्गदर्शनात स्थनिक गुन्हे शाखा, व पो. ठाणे रामनगरची तपास पथके तयार करून अनोळखी आरोपीचे शोधाकरीता रवाना करण्यात आलेली होती.
मा. वरिष्ठांचे निर्देशा प्रमाणे स्था. गु. शा. चे आणि रामनगर चे पोलीस पथक सदर गुन्ह्याचा तपास आणि गुन्हेगारांचा शोध करीत असतांना तसेच घटनास्थळ ठिकाणीं भेट देवून आजूबाजूच्या लोकांना विचारपूस करून पथकाने घटनास्थळ ठिकाण वरून गोपनीय बातमीदार मार्फत मिळालेल्या माहीतीच्या आधारे संशयीत नामे--
1) घनश्याम उर्फ गोलु अशोक चौधरी वय-19 वर्ष रा. मालवीय वार्ड, श्रीनगर गोंदिया
2) अभिषेक उर्फ जादु प्रेमलाल वर्मा वय- 19 वर्ष रा.माताटोली वार्ड, श्रिनगर, गोंदिया
3) विधिसंघर्ष बालक- मित्तल तुपटे रा. बजाज वार्ड, सावराटोली, गोंदिया यांना सावरटोली गोंदिया येथून ताब्यात घेतले.
ताब्यात घेण्यात आलेल्या संशयीत क्र.1 ते 3 यांनी जबरी चोरीच्या गून्ह्यासंबंधाने विश्वासात घेऊन विचारपुस केली असता सुरवातीस उडवा उडवीची उत्तरे देऊन सदरचा गुन्हा तिघांनी मिळून केल्याची कबुली दिली.
वरील नमूद संशयीतां चे ताब्यातून जबरीने हिसकावून नेलेला पोको कंपनीचा मोबाईल हँडसेट किंमती अंदाजे 27 हजार रुपये आणि नगदी 1000/- रूपये असा एकूण 28 हजार रुपयाचा मुद्देमाल गुन्ह्याचे अनुषंगाने हस्तगत करून जप्त करण्यात आला आहे.
आरोपी क्रं. 1 व 2 यांना पो. ठाणे रामनगर चे गुन्ह्यात अटक करण्यात आली असून विधी संघर्ष बालक यास त्याचे पालकांचे स्वाधीन करण्यात आले आहे. पुढील कायदेशीर कारवाई व तपास पो.ठाणे रामनगर पोलीस करीत आहेत.
माननीय वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे, पो. ठाणे रामनगर चे पो.नि. श्री. संदेश केंजळे, यांचे नेतृत्वात व मार्गदर्शनात पो.उप.नी. वनिता सायकर पो. हवा. सोमेंद्र तुरकर, इंद्रजित बिसेंन, रियाज शेख, सुजित हलमारे, जावेद पठाण, प्रशांत माने यांनी संयुक्तरित्या केलेली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com