चमडा बाजार येथे गोवंश कत्तल करुन मांस विक्री करणाऱ्यावर कारवाई एक आरोपी ताब्यात स्थानिक गुन्हे शाखा व सदर बाजार पोलीस ठाणेची कारवाई..

सह संपादक -रणजित मस्के
जालना

जालना जिल्हयामध्ये गोवंश कत्तल करणाऱ्या इसमांचा शोध घेवुन कारवाई करणेबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री अजयकुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव व पथकास सुचना दिल्या होत्या. त्यावरुन श्री. पंकज जाधव, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी स्थागुशाचे एक पथक तयार करुन कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले होते.
दिनांक 13/07/2025 रोजी चमडाबाजार, जालना येथे एक इसम गोवंशाची कत्तल करुन मांस विक्री करीत असलेबाबत गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखाचे पथक व सदर बाजार पोलीस ठाणे पथक असे चमडाबाजार मस्जीदच्या मागे, जालना येथे जावुन गोवंश मांस विक्री करणाऱ्या इसमाचा शोध घेतला असता इसम नामे अब्दुल वहाब अब्दुल अजीज, वय-52 वर्ष, रा.चमडा बाजार मस्जिदच्या पाठीमागे, जालना हा त्याच्या राहत्या घरामध्ये गोवंशीय मांस कत्तल करुन विक्री करीत असल्याचे दिसुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याच्या ताब्यातुन रु.26,000/- किंमतीचे 130 किलो गोवंशीय मासांचे तुकडे, रु.1800/- किंमतीचे 03 लोखंडी सुऱ्या, वजन काटा, वजनमापे असा रु.27,800/- किंमतीचा मुददेमाल मिळून आल्याने आरोपीविरुध्द सदर बाजार पोलीस ठाणे, जालना येथे गु.र.क्र.572/2025 कलम 5 (क), 9(अ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अजयकुमार बंसल व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखालो स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव, सदर बाजार पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. संदीप भारती, सपोनि योगेश उबाळे, सपोनि, आनंदसिंग साबळे, पोउपनि राजेंद्र वाघ व सोबत स्थागुशाचे अमंलदार रामप्रसाद पव्हरे, प्रभाकर वाघ, इरशाद पटेल, अशोक जाधवर तसेच सदर बाजार पोलीस ठाणेचे अंमलदार संतोष खरात, गिरीश शिंगणे, संदीप पवार, यश देशमुख यांनी केली.