ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींच्या लष्कर पोलीसानी आवळल्या मुसक्या..

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

पुणे :- दि.२७/१२/२०२३ रोजी २१.०० वा. आम्ही पोलीस ठाण्यात कार्यालयीन कामकाज करीत असताना आम्हास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, काही संशयीत इसम बिशन स्कुल कॅम्प पुणे या परिसरात संशयीतरित्या दरोडा टाकण्याचे उददेशाने फिरत आहे.

सदर बातमीची खात्री करणेकामी आम्ही स्वतः महेंद्र कांबळे, पोलीस उपनिरीक्षक, पो. हवा. शिंदे ३७११, पो. हवा. कदम ५६७९, पो.हवा. वनवे, २७२०, पो.ना. मांजरे ७८७७, पो.शि. कदम ३१०, पो. शि. राउत ८५४६, पो.शि. हराळ ९८८१, पो.शि.कांबळे ८६८८ यांचेसह सरकारी व खाजगी वाहनांनी रवाना झालो.

आम्ही वरील सर्वजण बिशप स्कुल कॅम्प पुणे समोरील मोकळ्या जागेत गेलो असता तेथे काही संशयीत इसम लपुन बसल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी दोन टीम करुन त्यांना ताब्यात घेणेकरीता त्यांचेकडे जात असताना त्यांना आमची चाहुल लागताच ते पळुन जावु लागले. त्यावेळी वरील स्टाफच्या मदतीने ३ इसमांना जागीच २२.०० वा. ताब्यात घेतले. सदरवेळी दोन इसम अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले. त्यांचा स्टाफने पाठलाग केला. परंतु ते मिळुन आले नाहीत.

मिळुन आलेल्या इसमांना त्यांचे नांव व पत्ता विचारता त्यांनी त्यांची नांवे १) अरमान कमल खान वय २५ वर्षे व्यवसाय – बिगारी, रा. फाटापुलकोट ता. राजगंज जि. जलपायगुडी राज्य (पश्चिम बंगाल राज्य) २) सुमीतकुमार ऊर्फ राहुलकुमार रामसिंग यादव वय-३० वर्षे व्यवसाय – बिगारी, रा-जोराबगंज ठाणा-कोडा जि. कठीयार (बिहार राज्य), ३) सोनुकूमार रामनाथ यादव वय-२५ वर्षे व्यवसाय बिगारी, रा.नया टोला ठाणा-कोड जि-कठियार (बिहार राज्य) असे सांगीतले. त्यावेळी पळुन गेलेल्यांची नांवे विचारता एकाचे नांव बादल असुन दुसरा त्याचा मित्र असल्याचे व त्यांचे नांव पत्ता माहीत नसल्याचे तसेच बादल हा त्यांचा मुख्य सुत्रधार असल्याचे सांगीतले.

वरील मिळुन आलेल्या ३ इसमांना सदर ठिकाणी थांबण्याचे कारण विचारता त्यांनी असमाधानकारक उत्तरे दिल्याने त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेतली. त्यांचेजवळ एकुण तीन बैंग मिळुन आल्या. त्यांची पाहणी केली असता त्यांचेकडे रु.१,००,२१०/- रोख रक्कम, एक लोखंडी कटवणी, तीन स्क्रू ड्रायवर, एक धारधार टोक असलेला टोच्या, गुजरात राज्य पासींग असलेल्या त्यावर नंबर लिहीलेल्या पत्र्याच्या ६ प्लेट, चेहरा झाकणेकरीता ओळखपटु नये म्हणुन वेगवेगळ्या रंगाच्या मंकी टोप्या, मास्क व दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहीत्य मिळुन आले आहे.

वरील ३ आरोपींना काल दि.२७/१२/२०२३ रोजी २२.०० वा. अटक करणेत आली आहे. तसेच त्यांना मे. न्यायालयात हजर केले असता त्यांची आज दि.२८/१२/२०२३ ते दि.०३/०१/२०२४ पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
दि.०३/०१/२०२४ पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

आरोपींनी नेपाळ, नेपाळ व बिहार या सीमेलगत अनेक गुन्हे केले. असुन महाराष्ट्र *राज्यामध्ये रेल्वेमध्ये अनेक गुन्हे केले असल्याचे सांगत आहेत.

त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता सदर आरोपी हे अशा प्रकारचे गुन्हे करणेकरीता पुणे शहरातील लॉजवर थांबुन रेखी करून नंतर दरोडा तसेच जबरी चोरीचे गुन्हे करत असल्याचे कबुल केले आहे.

गुन्हा करण्याची पद्धत

मुख्य आरोपी हा लॉजवर थांबुन रात्रीचवेळी गर्दीचे ठिकाणी रेखी करून ज्या ठिकाणी गुन्हा कराध्याचे निश्चित करायचे त्या ठिकाणी इतर राज्यातील नंबर प्लेट असलेली मोटारसायकल वापरून सर्व ठिकाणी फिरून माहीती घेत असायचे तसेच ज्या ठिकाणी सीसीटीव्ही नाहीत याची खात्री करून गुन्हा करायचे तसेच सदर आरोपी हे दुव्हिलर गाडया पंक्चर कराण्याचे साधन बरोबर ठेवुन गुन्हा केल्यानंतर घटनास्थळावर किंवा जवळपास असलेल्या चारचाकी व दोन चाकी गाड्या पंक्चर करायचे.

आरोपीकडून लष्कर व इतर पोलीस स्टेशन कडील उघड गुन्हे

लष्कर पो.स्टे

३०३/२०२३ भादविक
३९४.३४

६८/२०२३ भादविक
३९२,३४

बंडगार्डन पो.स्टे.

३१३/२०२३ भादविक ३९२.३४

एकुण चोरुन नेलेला मुद्देमाल

३,००,०००/-

इको गाडी ८०,०००/-

२०,०००/-

(५ ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र)

गुन्हयाचा बाकी तपास

दाखल गुन्हयातील आरोपी हे बिहार व पश्चिम बंगाल राज्यातील असुन रेल्वे मध्ये प्रवास करुन बॅग चोरीचे गुन्हे केलेचे कबुल केले असुन त्या अनुषंगाने तपास करणे सुरु आहे. तसेच यांचा मुख्य साथीदार बादलकुमार हा फरार असुन त्याचा शोध घेऊन पुढील कारवाई करायची आहे.

मार्गदर्शनाखाली गुन्हाचा तपास केला

सदरची कामगीरी ही मा. पोलीस आयुक्त सो रितेशकुमार, अप्पर पोलीस आयुक्तसो पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे श्री. प्रविणकुमार पाटील. मा. पोलीस उप आयुक्त श्री. स्मार्तना पाटील, परि. २. मा. सहा. पोलीस आयक्त श्री. सुर्वे, लष्कर विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दशरथ पाटील, पोलीस निरिक्षक (गुन्हे) प्रियंका शेळके, सहा. पोलीस निरिक्षक शितलकुमार गायकवाड, यांचे नेतृत्वाखाली, तपास पथकातील अधिकारी पोलीस उप निरीक्षक महेंद्र कांबळे, सपोफौ पुणेकर, अंमलदार पो.हवा. महेश कदम, पो. हवा. विलास शिंदे, पो. हवा. मंगेश बो-हाडे, पोहवा वनवे, पोहवा चौधर, पो.ना सचिन मांजरे, पो.ना गणेश कोळी, पो. शि. सागर हराळ, पो.शि. लक्ष्मीकांत कांबळे, पो.शि. लोकेश कदम, पोशि राऊत लष्कर पोलीस स्टेशन, यांनी केलेला आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट