लष्कर, कोंढवा परिसरात घरफोडी करणा-या सराईत गुन्हेगारांना लष्कर पोलीसानी केले जेरबंद

0
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

पुणे

दि.१५/०७/२०२५ रोजी अदिती बिझनेस ग्राउंड फ्लोवर कॅम्प पुणे येथील यूनियन बैंक ऑफ इंडिया यामध्ये तसेच ईस्ट्रीट यूनियन बँकेशेजारी कॅम्प पुणे येथील ऑफिस मध्ये एक अनोळखी इसन वरील ठिकाणी बैंक व ऑफिसमधील खिडकी उघडून आत मध्ये जावून आतमध्ये असणारे टेबलवे ड्रॉवर व कपाट उघडून आतमधील कागदपत्रे अस्ताव्यस्त करुन, ऑफिसमधील तिजोरी खिडकी मध्ये उचलून ठेवली तसेच आतमध्ये शोधाशोध करुन अनोळखी इसमाने घरफोडी चोरी करण्याचा प्रयत्न केला सदरबाबत लष्कर पो. स्टे. गु.र.नं.क. १३१/२०२५ भा.न्या.सं.क. ३०५.३३१ (२),६२ गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे अनुषंगाने वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली लष्कर पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळावरील तसेच लष्कर ते फुरसुंगी दस्यानचे सी सी टि व्ही फुटेजची पाहणी केली. तसेच तपास पथकातील पोलीस अंमलदार लोकेश कदम व सागर हराळ यांनी तांत्रिक विश्लेषण करुन नमुद गुन्हयातील आरोपींनी गुन्हा करताना वापरलेले वाहन निष्पन्न केले. त्यानंतर तपास पथकातील पोलीस अधिकारी आणि पोलीस अर्मलदार यांनी रामटेकडी, हडपसर आणि फुरसुंगी परिसरात वाहनाचा व आरोपींचा शोध घेतला असता गोपनिय बातमीव्दारे माहिती मिळाली की, आरोपी हे त्याचेकडील वाहन घेवुन रामटेकडी परिसरात येणार आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचुन सदर आरोपीना पकडुन त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे, सदर आरोपींची नावे १) आर्यन अजय माने ऊर्फ मॉन्टी, वय २१ वर्षे, रा. खुटवड चौक, गल्ली नंबर ४. हरपळे वस्ती, फुरसुंगी, पुणे. २) विशाल मारुती आचार्य, वय २५ वर्षे, रा. आनंद नगर, गल्ली नंबर ४, ताकवणे दवाखाना जवळ, रामटेकडी, पुणे-१३. ३) ओमकार सुरेश गोसावी, वय २२ वर्षे, रा. मुक्ताई रेसीडन्सी, पावर हाऊस जवळ, फुरसुंगी, पुणे. सदर आरोपीपैकी आर्यन अजय गाने ऊर्फ मॉन्टी आणि ओमकार सुरेश गोसावी हे पुणे शहरातील पोलीस अभिलेखावरील चोरी आणि घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार आहेत. सदर आरोपींवर हडपसर, वानवडी, लोणीकंद या पोलीस स्टेशनमध्ये अनेक चोरी आणि घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

उपरोक्त आरोपींनी लष्कर, कोंढवा परिसरात घरफोडी चोरी केल्या असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच तपासादरम्यान सदर आरोपींवर लष्कर पोलीस ठाणे येथे गु.र.नं.५६/२०२५, भा.न्या.सं.क.३०५. ३३१ (३), ३३१(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडुन लष्कर पो. स्टे कील सदर गुन्हयातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच वरील आरोपींनी कोंढवा पोलीस स्टेशनचे हद्दित गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले असुन कोंढवा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.२८३/२०२५, मा.न्या.सं.क.३०५, ३३१ (३), ३३१ (४) प्रमाणे दिनांक २१.०७.२०२५ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर ची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०२, पुणे शहर, श्री. मिलिंद मोहिते, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, विशेष शाखा अति, कार्यभार लष्कर विभाग, पुणे, श्री. अतुलकुमार नवधीरे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, श्री. गिरीषकुमार दिघावकर, लष्कर पोलीस स्टेशन, पुणे शहर, पोलीस निरिक्षक (गुन्हे) श्री प्रदिप पवार, लष्कर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक विशाल दांडगे, तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरिक्षक राहुल घाडगे व पोलीस अंमलदार महेश कदम, अतुल मेंगे, सोमनाथ बनसोडे, रमेश चौधर, प्रविण गायकवाड, प्रमोद गायकवाड, अमोल चव्हाण, लोकेश कदम, सागर हराळ व अमोल कोडीलकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट