रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा बीटस्तरीय स्पर्धेत लांजा नं. 5 शाळेचे सांघिक व वैयक्तिक क्रीडाप्रकारामध्ये सुयश…….

प्रतिनिधी – विलास चव्हाण
रत्नागिरी
आज दि. 2 जानेवारी 2025 रोजी सिनियर कॉलेज येथे आयोजित केलेल्या लांजा बीटस्तरीय स्पर्धेत जि. प. पूर्ण प्रा. शाळा लांजा नं. 5 शाळेतील सांघिक संघाने लहान गट मुलगे कबड्डी मध्ये विजेतेपद, लहान गट मुली लंगडी उपविजेतेपद तसेच वैयक्तिक क्रीडाप्रकारामध्ये लहान गटामध्ये उंच उडी मध्ये मारुती गुंजीकर प्रथम क्रमांक, मोठा गट मुलगे लांब उडी मध्ये प्रशांत गोसावी प्रथम क्रमांक, उंच उडी मुलगे प्रथम क्रमांक आर्यन पावसकर, द्वितीय क्रमांक सत्यम सावंत, धावणे मुलगे तनिष किनरे प्रथम क्रमांक मिळवला आहे. लहान गट मुलगे यांनी साटवली केंद्राबरोबर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात 1 गुणाने विजय मिळवून तालुकास्तरीय क्रीडास्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये लांब उडी, उंच उडी, धावणे यामध्ये 6 मुलांची निवड तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.






या मुलांना शाळेच्या मुख्याध्यापिका चव्हाण मॅडम, शा. व्य. समिती अध्यक्ष व सदस्य तसेच शाळेतील क्रीडाशिक्षक वासुरकर सर, शिगम सर, साबळे सर, चव्हाण सर, गावडे मॅडम व शाळेतील इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.