लग्नाचं अमिष देत वारंवार शारीरिक संबंध ठेवणारा फरार आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात…

लोणावळा: लोणावळा शहर पोलीस ठाणे हद्दीत आरोपी इरफान इस्माईल शेखने त्याच्या मित्राच्या रेल्वे गेट ,भांगरवाडी येथील रिकाम्या फ्लॅटवर फिर्यादी युवतीला बोलावून त्याठिकाणी तसेच नंतर डिसेंबर 2021 मध्ये चिंचवड येथील एका लॉजवर तिला घेवून जावून त्याठिकाणी तिच्याशी शरीर संबंध ठेवले.
युवतीला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन करत वेगवेगळ्या ठिकाणी तिची इच्छा नसताना तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवून नंतर फरार झालेल्या युवकाला लोणावळा पोलिसांनी मोठ्या शिताफीने गजाआड केले आहे.
संबंधित पीडित युवतीने लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असता, फिर्यादीनुसार आरोपी इरफान शेख याने फिर्यादी युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला आणि वारंवार तिचयाशी शारीरिक संबंध ठेवले.
आरोपीने त्याच्या मित्राच्या रेल्वे गेट भांगरवाडी येथील रिकाम्या फ्लॅटवर फिर्यादी युवतीला बोलावून त्याठिकाणी तसेच नंतर डिसेंबर 2021 मध्ये चिंचवड येथील एका लॉजवर तिला घेवून जावून त्याठिकाणी तिच्याशी शरीर संबंध ठेवले.
तसेच तिला मारहाण आणि शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडित युवतीने लोणावळा शहर पोलिसांकडे धाव घेतली असता सदर आरोपी फरार झाला होता.
परंतु लोणावळा शहर पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीला अटक केली असुन पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
dipakbhogal@surakshapolicetimes.com