लग्नाच्या साड्यांचा बस्ता एस.टी मध्ये विसरलेल्या प्रवासी कु.श्वेता डेंगाने यांना कंडक्टर श्री अनिल जाधव यांनी केला परत..

प्रतिनिधी-मंगेश उईके
पालघर:– महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पालघर विभाग पालघर आगार एसटीमध्ये कंडक्टर म्हणून कार्यरत असलेले आंबेडकर नगर पालघर पूर्व (काशिराम गायकवाड यांचे जावई) अनिल जाधव हे दी.२९/०३/२०२४ रोजी पालघरहुन विक्रमगडला दुपारी ०३.०० वा.जाणारी बस च्या ऑनड्युटी असताना.कुमारी श्वेता डेंगाणे हमरापुर यांनी लग्न खरेदी व साड्यांचा बस्ता बस मध्येच विसरून गेली होती.
सदर ऑनड्युटी कार्यरत असलेले अनिल जाधव यांनी जपून ठेवल्या होत्या आणि त्यांनी त्यांचा शोध घेत. हमरापुर गावांमध्ये जाऊन त्या प्रवासी मुलीला सुपूर्द केल्या अनिल जाधव कंडक्टर पालघर आगार यांच्या प्रामाणिकतेला प्रवासी हमरापूर गावातील श्वेता डेंगाणे यांच्या परिवाराने धन्यवाद करत शतशः आभार मानले. व पालघर आगर एसटी महामंडळाने त्यांच्या कार्याला सलाम केले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com