लग्न समारंभ आटोपून सोन्या चांदीचे दागिणे व प्रेझेंट पाकीट रिक्षात विसरलेल्या श्री भारत आरटे यांना सुपूर्द करण्यात एम.एच. बी.काॅलनी पोलीसांना मोठे यश..

उपसंपादक-रणजित मस्के
बोरीवली:-आज रोजी दिनांक 07/12/ 2023 रोजी 20.30 वा.चे दरम्यान इसम नामे भारत भूषण आरटे वय 70 वर्ष रा.ठि:- महाकाली सोसायटी, सेंट चर्च ,दहिसर पश्चिम, नवागाम, मुंबई हे आपल्या पत्नीसह त्यांचे मुलीचा लग्न सोहळा आटपून वैशाली नगर ते दहिसर असा ऑटो रिक्षाने प्रवास करत असताना त्यांचे सोन्याचे चांदीचे दागिने व लग्नाचे प्रेझेंट पाकीट असलेली असे एकूण 8,00,000/- ( आठ लाख रुपये ) किंमतीची मालमत्ता असलेली बॅग रिक्षात विसरल्याची तक्रार प्राप्त झाली.
नमूद तक्रारीचे गांभीर्य ओळखून गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि सुर्यकांत पवार, पोउनि भारत पौळ, पोलीस हवालदार खोत व पोलीस शिपाई योगेश मोरे यांनी तक्रारदार यांचे मार्गावरील सी.सी.टी.व्ही फुटेज प्राप्त करून ऑटो रिक्षा क्रमांक MH 01 VA 7590 ही ऑटो रिक्षा निष्पन्न व रिक्षा चालकाचा शोध घेऊन 1 तासाच्या आत रिक्षामध्ये राहिलेली तकरदाऱ यांची बॅग व त्यामधील संपूर्ण मालमत्ता हस्तगत करून त्यांना सुपूर्त करण्यात आली
अशी माहिती श्री. सुधीर कुडाळकर
वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
एम.एच.बी काॅलनी पोलीस ठाणे,मुंबई यांनी दिली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com