कुर्ला पोलीसांची धडक कारवाई..गोळीबार करणा-या आरोपींना ठोकल्या बेडया..

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

मुंबई ( कुर्ला ) : कुर्ला पोलीस ठाणे गु.र.क. गु.र.क्र.०६/२०२३ कलम ३०७, ३४ भादविसह ३, २५, २७ भारतीय हत्यार कायदा

दिनांक ०९/०१/२०२३ रोजी १९.५५ वा.सु. श्री. सुरजप्रतापसिंग नरपतसिंग देवडा हि/ ३२ वर्षे व त्यांचा मित्र पंकज हे मोटार कार क्रमांक एम. एच. ०४ एच एम ६४१४ इन्होवा किस्ट्रा या वाहनाने सीएसटी रोड ने कपाडीया गेट समोरील रोड वरून कलीना मार्गे दहिसरला घरी जात असताना अंदाजे २५ ते ३० वर्ष वयोगटातील दोन संशयीत इसमांनी संगनमत करून फिर्यादी यांना जिवे ठार मारण्याचे उद्देशाने त्यांचे दिशेने रिव्हाल्वरने गोळीबार केला, तसेच दुसऱ्या इसमाने त्यांच्या कारचे समोर येथून कार अडवण्याचा प्रयत्न करून दोन्ही संशयित पळून गेले. फिर्यादी यांनी सदरचा हल्ला हा समीर सावंत व गणेश चुक्कल या दोघांच्या इशाऱ्याने केला असल्याची दाट संशय व्यक्त करून दिलेल्या तक्रारीवरून कुर्ला पोलीस ठाणे गु.र.क्र.०६ / २०२३ कलम ३०७, ३४ भादविसह ३.२५,२७, भारतीय हत्यार कायदा अन्वये नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्हा अतिशय क्लिष्ट स्वरूपाचा असल्याने गुन्हयातील पाहिजे आरोपीताचा शोध घेणे करीता मा. श्री मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-५, मुंबई, व मा. श्री. गोविंद गंभिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त, कुर्ला विभाग मुंबई यांनी गुन्हे उघडक्स आणणे करीता दिलेल्या सूचना प्रमाणे मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविद्र होवाळे कुला पोलीस ठाणे मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली कुर्ला, धारावी व व्हि. बी. नगर पोलीस ठाणेचे गुन्हेप्रकटीकरण पथकाचे वेगवेगळे पथक स्थापन करून तपास चालू केला होता.

विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सी. सी. टी. व्ही. फुटेज, सी डि आय एस डी आय व इतर तांत्रिक तपासाच्या

आधारे नमूद गुन्हयातील पाहिजे आरोपीतांना शांग्रीला रिसोर्ट समोर सिद्धू- दा ढाबा, मुंबई-आग्रा महामार्ग, तालुका भिवंडी,

जिल्हा ठाणे या ठिकाणावरुन ताब्यात घेवून अटक केलेली आहे..

अटक आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत.

१. सागर प्रदिप येरुणकर वय २९ वर्ष राठी, सहयाद्री गडकर चाल, रिटा सिग्नलच्या विरुद्ध बाजूस भटवाडी, घाटकोपर, मुंबई,

२. करण अविनाश थोरात वय २० वर्षे रा. ठी रूम क्र. ७. बर्वेनगर, एच १६ घाटकोपर मुंबई.

३. अभिषेक शंकर सावंत वय २६ वर्षे रा. टी. गणेश मंदिर, श्रीकृष्ण क्रिडा मंडळजवळ घाटकोपर, मुंबई

४. विनोद मधुकर कांबळे वय २९ वर्षे रा. ट असल्फा व्हिलेज, मौलाना चाळ कमिटी, गणेश मंदिराजवळ, घाटकोपर, मुंबई.

अटक आरोपींवर यापूर्वी देखील घाटकोपर, भोईवाडा पोलीस ठाणे अंतर्गत गंभीर गुन्हे नोंद आहेत.

सदरची कार्यवाही मा. श्री. सत्य नारायण चौधरी, सह पोलीस आयुक्त, का. व सु., मा. श्री. अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग, मुंबई, मा. श्री. मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-०५, मुंबई, मा. श्री. गोविंद गंभिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त, कुर्ला विभाग, मुंबई यांच्या सुचनां प्रमाणे व मा. श्री. रविद्र होवाळे, कुर्ला पोलीस ठाणे मुंबई. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालकृष्ण घाडीगावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक, कुलदिप व्हटकर, सपोनि नंदूलाल पाटील, सपोनि नागराळ, सपोनि राजगुरू, कुर्ला पोलीस ठाणे, सपोनि खंडागळे, धारावी, सपोनि कैलास तिरमारे/पोउनि सोनावणे, व्हि. बी. नगर पोउनि जाधव, पोउनि कामशेठे धारावी, पोउनि इंगळे, पोउनि शांतलिंग पाटील, पोउनि प्रविण लोकरे, पोउनि प्रणोद माने व गुन्हेप्रकटीकरण पथकातील पो.अ. ९१७४ पठाण, ३४५५२ / बाबर ९६११८५ / गुरव, ९८०१३५ / विनोद पवार, ००२६०/ लांडगे, ०६०६६१/धनगर, ०६००३५/ तायडे, ०६०७४२ / सुर्यवंशी, ०३१४८० / सागर निकम, ०७१११९/मानकरे, ०७०६६३/सांगळे, ०९००५१/ चव्हाण, ०९००७३ / गाडेकर, ०३२९०/ देठे, ०८०९६६ / चंदनशिवे, ११०३६८ / इंगळे, ११०२३६ / साबळे, पो.शि. ११०५४६ वावरे, पो.शि. १३०९६३ / लहामगे, पो.शि. १४००९३ कुल्हाडे, पोशिक. ११३२५१/ देवळे, पोशिक, ०९२८४३ / वाघ, पाशिक. १४१०४४/ पाटील, पोशिक, ०७१२३२ / राठोड यांनी केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बाळकृष्ण घाडीगावकर हे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट