कुन्हाडीचा धाक दाखवून पवनचक्कीची कॉपर वायर जबरदस्तीने चोरून नेणारी टोळी उंब्रज पोलीस ठाणे यांच्या तत्परतेने व पोलीस पाटील यांच्या मदतीने झाली जेरबंद…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा :- दिनांक ३०/१०/२०२३ रोजी रात्री २.४५ वा. थे सुमारास सडावाघापूर येथिल सुझलॉन कंपनीचे साईट वरील मी जांभेकरवाडी ता. पाटण येथिल कंपनीचे सुपरवाइझर फिर्यादी व साक्षीदार है पवनचक्की असणार परिसरामध्ये पेट्रोलोग करीत असताना त्यांना कंपनीचे इंजिनिअर यांचा फोन आला त्यावेळी त्यांनी सांगितले को एस ९६ या मशीनची कनेक्टीव्होटो गेली आहे. असे सांगितलेने त्यांनी तात्काळ सदर ठिकाणी एस १६ या टॉवरचे मशीन जवळ जावून पाहिले असता त्यांना कॉपर केवल कट केलेली दिसली ते कॉपर केबलचा शोध घेत असताना पहाटे ०३.३० वा. सुमारास सदर ठिकाणचे बाजूस असले यामध्ये टॉवरची कट केलेली केवल ७ ते ८ इसम उचलून घेवून जात असताना दिसलेने त्यांनी त्यांना हटकले असता सदर इसमांनी त्यांचेवर कुन्हाड उघारून अंगावर धावून आलेने ते सर्वजण भयभित झाले त्यामुळे ते परत फिरलेवर संतोष मुळीक पानी १९२ ला तसेच उंब्रज पोलीस स्टेशनला फोन करून सदरची घटना पोलीसांना सांगितलेने.

तात्काळ सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत बधे यांनी पोलीस टीम तयार करून पसार झालेले आरोपीचा शोध घेणे कामी योग्य सूचना देवून मार्गदर्शन कल्लेन, त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील, पो. हवा. सचिन जगताप, पो. हवा. संजय धुमाळ, पो. कॉ. निलेश पवार तसंच राहुल पुजारी पोलीस पाटील ढोरोशी, अधिकराव पवार पोलीस पाटील जळव, विजय मारुती कदम पोलीस पाटील शाकरवाडी यांनी गावातील पोलीस मित्र सोबत घेवून येवून त्यांचे सहकार्याने पाळून गेले आरोपीचा शोध घेत असताना जवळजवळ टेम्पो ट्रव्हलर क्र. एम एच १२ क्युजी ३४०० ही उभी असलेली त्यावेळी सदर ठिकाणी एक आरोपी दया बसलेला दिसलेने त्यास ताब्यात घेवून इतर पळून गेले पैकी काही आरोपीचा शोध रात्रीचे वेळी घेवून त्यांना ताब्यात घेण्यात आले. मिळून आले आरापी यांची नावे १) अनिल लक्ष्मण पवार म्हारखंड ता. पाटण जि. सातारा २) सुरेश बंडू निकम दोघे रा. महारचंड ता. पाटण जि. सातारा ३) दादासो बळीराम सपकाळ रा. बागलेवाडी ता. पाटण जि.सातारा ४) प्रकाश गुलाबराव जाधव रा. करा. पाटण जि. सातारा अशी असून त्यांचे ताब्यात मिळून आले टेम्पो ट्रॅव्हलर क्र. एम एच १२४०० तुकडे कुल्हाड, लाकडी दांडके, वायर कटर यांचे सह एकूण १५,४०,०००/- रुपये किमतीचा माल हस्तगत करणेत आला असून त्यांचे विरुद्ध उंब्रज पोलीस स्टेशन गु. र. नं. ६१२/ २०२३ भादवि कलम ३९५ प्रमाणे करत आला आहे.

तसेच सदर जबरी चोरी करून पळून गेलेले ०३ पाहिजे आरोपी याचा शोध घेवून त्यांना अटक करण्याचे काम चालू आहे.

अशा प्रकारे कुन्हाडीचा धाक दाखवून पवनचक्कीची कॉपर वायर जबरदस्तीने चोरून नेणारी
टोळी उंब्रज पोलीस ठाणे यांच्या तत्परतेने व पोलीस पाटील यांच्या मदतीने जेरबंद

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक, सातारा श्री समीर शेख साहेब, मा. अप्पर पोलीस अधिक्षक मो. आचल दालमंड मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल ठाकुर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक प्रशांत बधे, पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील, पो. हवा सचिन जगताप पो हो की निलेश पवार, तसेच राहुल पुजारी पोलीस पाटील डोणी ता. पाटण अधिकराव पवार पोलीस पाटील ता. पाटण, विजय मारुती कदम पोलीस पाटील जांभेकरवाडी ता. पाटणा तसेच पोलीस मित्र यांनी केली आहे. सदर गुन्याचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट