कुंभे धबधब्यात पडून २७ वर्षीय तरुणी अन्वी कामदार हिचा जागीच मृत्य…

0
Spread the love

प्रतिनिधी- सचिन पवार

माणगांव :-माणगांव तालुक्यातील निजामपूर विभागातील कुंभे जलविद्युत प्रकल्प ,कुंभे बोगदा आणि त्यातील कुंभे गावापर्यंत पोहचताना लागणारे मनमोहक धबदबे हे पर्यटकांना भुरळ घालू लागले आहेत.

मात्र हे कुंभे येथील पर्यटन जीवघेणे ठरत आहेत. या कुंभे धबधब्यात १६ जुलै रोजी मुंबई येथून ७ मित्रमैत्रिणी सह अवनी कामदार नावाची तरुणी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आली होती.सकाळी १०:३० ते ११ वाजण्याच्या सुमारास अवनी धबधब्यात पडल्याची माहीती मिळताच माणगाव पोलीस उपविभागीय अधिकारी ,माणगांव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे व पोलीस टीम ,माणगांव तहसीलदार विकास गारूडकर तसेच साळुंके रेस्क्यू टीम माणगाव, सी स्केप रेस्क्यू टीम महाड,कोलाड रेस्क्यु टीम,महावितरण कर्मचारी,आरोग्य यंत्रणा हे घटनास्थळी दाखल झाले.

घटनास्थळी सर्व यंत्रणा झाल्यानंतर तब्बल ६ तासांच्या रेस्क्यु नंतर अवनी ला बाहेर काढण्यात आले,मात्र मोठ्या स्वरूपाच्या दुखापती झाल्याने अवनी कामदार हिचा माणगांव उपजिल्हा रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाला. अशी

माणगाव पोलीस निरीक्षक
निवृत्ती बोहाडे यानी दिली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट